तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता

अवकाळी पावसाची शक्यता
अवकाळी पावसाची शक्यता

पुणे : मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश ते पूर्व राजस्थान आणि कर्नाटकाचा दक्षिण उत्तर भाग ते मराठवाडा या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. राज्यातील काही भागात हवामान अंशतः ढगाळ झाले आहे. त्यामुळे आज (ता. २) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.    पश्चिम मध्य प्रदेश, राजस्थान या भागात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्याला अडथळा तयार होत आहे. त्यामुळे खान्देशातील किमान तापमानात दोन दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसापूर्वी खान्देशात तीन अंशांपर्यंत खाली आलेला पारा शुक्रवारी आठ अंश सेल्सिअसपर्यंत पोचला आहे. गेल्या आठ दिवसापासून वाढलेल्या थंडीचा जोर पुन्हा कमी होण्यास सुरवात झाली आहे. शुक्रवारी (ता. १) सकाळी आठ वाजेपर्यंत नाशिकमधील निफाड येथे ८.२ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली.   कर्नाटकाच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून सुमारे नऊशे मीटर उंचीवर आहे. त्याचाही राज्यातील  वातावरणावर काहीसा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. विदर्भातील नागपूर, गोंदिया, जळगाव, धुळे, नाशिक, नगर या शहराच्या परिसरात बऱ्यापैकी थंडी होती. कोकणातही थंडीची ऊब काही प्रमाणात असून मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भागात थंडी किंचित कमी झाली आहे.     शुक्रवारी (ता. १) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः  मुंबई (सांताक्रूझ) १६.४ (-१), अलिबाग १७.४, रत्नागिरी १७.७ (-१), डहाणू १६.० (-२), पुणे ११.७ (१), नगर १०.२ (-२), जळगाव ९.४ (-३), कोल्हापूर १७.० (१), महाबळेश्वर १४.४ (-१), मालेगाव १२.४ (१), धुळे कृषी महाविद्यालय ९.६, नाशिक ११.०, निफाड ८.२, सांगली १२.५ (-३), सातारा १३.० (-१), सोलापूर १५.५ (-२), औरंगाबाद १२.१ (-१), बीड १४.८ (१), परभणी १३.६ (-२), उस्मानाबाद १३.४, नांदेड १४.७ (-१), अकोला १३.५ (-१), अमरावती १२.४ (-३), बुलढाणा १४.४ (-१), चंद्रपूर १३.६ (-२), गोंदिया ८.४ (-६), नागपूर ९.२ (-५), वर्धा १२.९ (-२), यवतमाळ १२.४ (-४)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com