दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त
अॅग्रो विशेष
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज
पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस महिनाअखेरपर्यंत कायम राहणार आहे. आज (ता.२७) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघर्जना, विजांसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस महिनाअखेरपर्यंत कायम राहणार आहे. आज (ता.२७) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघर्जना, विजांसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पावसाळी वातावरणामुळे कमाल व किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
राज्यात उन्हाचा चटक्यामुळे कमाल तापमान चांगलेच वाढले आहे. तर ढगाळ हवामान व पावसाळी वातावरणामुळे उकाडाही वाढतच आहे. सायंकाळनंतर पाऊस पडत असल्याने हवेत गारवा येऊन किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले. गुरूवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोल्यात यंदाच्या हंगामातील उच्चांकी ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जळगाव, मालेगाव, परभणी, चंद्रपूर येथेही उन्हाचा चटका कायम आहे. पावसाने हजेरी लावलेल्या भागात कमाल तापमानातही थोडीशी घट झाली आहे. कर्नाटकपासून कोकण, गुजरातपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह, तर विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
गुरूवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.३ (२०.९), जळगाव ३९.० (२१.४), कोल्हापूर ३५.६ (२१.९), महाबळेश्वर ३०.३ (१५.१), मालेगाव ३९.० (२१.४), नाशिक ३६.३ (१९.२), निफाड ३५.० (१६.६), सांगली ३७.०(२२.०), सातारा ३५.८ (२१.७), सोलापूर ३६.० (२२.३), अलिबाग ३३.७(२४.२), डहाणू ३१.९ (२४.१), सांताक्रूझ ३३.१ (२५.०), रत्नागिरी ३२.१ (२३.९), औरंगाबाद ३६.७ (१९.१), परभणी ३८.६ (२०.०),नांदेड ३७.८ (२१.४) अकोला ३९.५(२०.३), अमरावती ३६.८ (१८.४), बुलडाणा ३५.० (१९.२), चंद्रपूर ३८.० (१९.५), गोंदिया ३५.० (२०.५), नागपूर ३७.३ (१८.९), वर्धा ३७.५ (२०.४).
- 1 of 657
- ››