agriculture news in marathi, rain prediction in central maharashtra, Marathwada, vidharbha | Agrowon

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 मार्च 2020

पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस महिनाअखेरपर्यंत कायम राहणार आहे. आज (ता.२७) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघर्जना, विजांसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस महिनाअखेरपर्यंत कायम राहणार आहे. आज (ता.२७) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघर्जना, विजांसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पावसाळी वातावरणामुळे कमाल व किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

राज्यात उन्हाचा चटक्यामुळे कमाल तापमान चांगलेच वाढले आहे. तर ढगाळ हवामान व पावसाळी वातावरणामुळे उकाडाही वाढतच आहे. सायंकाळनंतर पाऊस पडत असल्याने हवेत गारवा येऊन किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले. गुरूवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोल्यात यंदाच्या हंगामातील उच्चांकी ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जळगाव, मालेगाव, परभणी, चंद्रपूर येथेही उन्हाचा चटका कायम आहे. पावसाने हजेरी लावलेल्या भागात कमाल तापमानातही थोडीशी घट झाली आहे. कर्नाटकपासून कोकण, गुजरातपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह, तर विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

गुरूवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.३ (२०.९), जळगाव ३९.० (२१.४), कोल्हापूर ३५.६ (२१.९), महाबळेश्‍वर ३०.३ (१५.१), मालेगाव ३९.० (२१.४), नाशिक ३६.३ (१९.२), निफाड ३५.० (१६.६), सांगली ३७.०(२२.०), सातारा ३५.८ (२१.७), सोलापूर ३६.० (२२.३), अलिबाग ३३.७(२४.२), डहाणू ३१.९ (२४.१), सांताक्रूझ ३३.१ (२५.०), रत्नागिरी ३२.१ (२३.९), औरंगाबाद ३६.७ (१९.१), परभणी ३८.६ (२०.०),नांदेड ३७.८ (२१.४) अकोला ३९.५(२०.३), अमरावती ३६.८ (१८.४), बुलडाणा ३५.० (१९.२), चंद्रपूर ३८.० (१९.५), गोंदिया ३५.० (२०.५), नागपूर ३७.३ (१८.९), वर्धा ३७.५ (२०.४). 


इतर बातम्या
पुणे बाजार समितीत तिसऱ्या दिवशीही...पुणे: कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनमध्ये बाजार...
मुंबईत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर आगमुंबई : मुंबईत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर...
राज्यात ३० टक्के दूध वापराविनापुणे: कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू...
औरंगाबाद : शेतकरी गटामार्फत ग्राहकांना...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
भंडाऱ्यात ‘बीटीबी’ भाजी बाजाराच्या...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या...
खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव...जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प...
नँचरल उद्योग समूह सुद्धा करणार...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच...
नगर जिल्ह्यात पाचशे टन भाजीपाला...नगरः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनमुळे...
जगभरात कोरोनामुळे ३० हजार मृत्यूः...जिनिव्हा: जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच...
अमरावतीत गरजूंना स्वयंसेवी संस्थांकडून...अमरावती  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सांगलीत खतांची दुकाने सुरू; पोलिसांची...सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे कृषी...
अकोल्यात पीककर्ज व्यवहारास ३१ मेपर्यंत...अकोला ः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या...
कोल्हापूरात कृषी निविष्ठा केंद्रे दहा...कोल्हापूर : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रे...
सोलापूर बाजार समितीतील विस्कळीतपणा कायमसोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
उपासमार होणार नाही याची काळजी घ्या ः...नांदेड ः ‘कोरोना’च्या परिस्थितीमुळे जिल्ह्यासह...
विदर्भात विजांसह पावसाची शक्यतापुणे : राज्यात सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस काहीशी...
परराज्यातील ४५० कामगारांची...सोलापूर : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील...
थेट विक्रीने सोडविला दराचा प्रश्‍नऔरंगाबाद: कोरोनामुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न...
पुणे, मुंबईतील सोसायटीधारकांनी...पुणे ः शहरी भागातील हाउसिंग सोसायटी भागातील...