कोकण, विदर्भात हलक्या सरींची शक्यता

कोकण, विदर्भात हलक्या सरींची शक्यता
कोकण, विदर्भात हलक्या सरींची शक्यता

पुणे ः  गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहणार आहे. आज (ता. १३) आणि उद्या (ता. १४) कोकण आणि विदर्भात हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.  सध्या बंगाल उपसागराच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. तर बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची संकेत आहेत. तर गुजरातच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल. कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडल्यानंतर काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली आहे. तरीही कोकण, मध्य महाराष्ट्रात सोमवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे सर्वाधिक ७० मिलिमीटर पाऊस पडला.  सोमवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत हवामान विभाग) कोकण ः माथेरान ५०, लांजा ४०, भिरा, कणकवली, कुडाळ, पोलादपूर, सावंतवाडी, सुधागड पाली ३०, कानकोना, जव्हार, खालापूर, मंडणगड, म्हसळा, मोखेडा, पेण, राजापूर, संगमेश्वर देवरूख, सांगे, शहापूर, ठाणे, वैभववाडी, वेंगुर्ला २०, अंबरनाथ, बेलापूर, चिपळून, देवगड, कल्याण, कर्जत, खेड, महाड, मालवण, माणगाव, मुरबाड, पालघर, पेडणे, केपे, रत्नागिरी, रोहा, तलासरी, विक्रमगड, वाडा १०.  मध्य महाराष्ट्र ः महाबळेश्वर ७०, पौड, मुळशी ५०, चांदगड, गगनबावडा, लोणावळा, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी ४०, खेड, राजगुरुनगर, त्र्यंबकेश्वर, वेल्हे ३०, इगतपुरी, जावळीमेधा, पाटण, पेठ २०, आजरा, अक्ककुवा, भोर, गडहिंग्लज, गारगोटी, हरसूल, कराड, कोल्हापूर, नंदुरबार, सातारा, शहादा, वडगाव, मावळ १० मराठवाडा ः देगलूर १०  विदर्भ ः पारशिवनी, सिरोंचा, यवतमाळ १०  घाटमाथा ः शिरगाव ११०, ताम्हिणी ९०, दावडी ८०, लोणावळा, डुंगरवाडी ५०, वळवण ४०, खंद, शिरोटा, कोयना, वाणगाव ३०, तुलसी, वैतरणा २०, तानसा १०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com