agriculture news in marathi, Rain prediction in Kokan, Central Maharashtra, Marathwada | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 मे 2019

पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील १२हून अधिक ठिकाणी उष्ण लाट आली आहे. तर तापमान ४५ अंशांच्या पुढे गल्याने चंद्रपूर, ब्रह्मपुरी, वर्धा, नागपूर, परभणी, सोलापूर, अमरावती अक्षरश: भाजून निघत आहे. बुधवारी (ता. २२) चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४६.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. उन्हामुळे होरपळ होत असतानाच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील १२हून अधिक ठिकाणी उष्ण लाट आली आहे. तर तापमान ४५ अंशांच्या पुढे गल्याने चंद्रपूर, ब्रह्मपुरी, वर्धा, नागपूर, परभणी, सोलापूर, अमरावती अक्षरश: भाजून निघत आहे. बुधवारी (ता. २२) चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४६.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. उन्हामुळे होरपळ होत असतानाच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

राज्यात बहुतांशी ठिकाणी तापमान चाळीशी पार गेल्याने, उन्हाचा ताप असह्य होत आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातील उस्मानाबाद, परभणी, तर विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे उष्ण लाट आहे. ही उष्ण लाट आणखी काही दिवस कायम राहणार आहे. सायंकाळनंतर होत असलेल्या ढगाळ हवामानामुळे कोकणातील सिंधुदूर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, मराठवाड्यातील लातूर आणि परिसरात आज (ता. २३) वादळी पावसाचा अंदाज हवामान आहे.

बुधवारी (ता.२२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४१.१ (४.९), जळगाव ४४.० (१.७), कोल्हापूर ३७.३(२.४), महाबळेश्वर ३४.४ (५.०), नाशिक ४०.१ (२.७), सांगली ४४.४ (५.०), सातारा ४१.४ (६.७), सोलापूर ४५.१(५.१), अलिबाग ३३.९ (०.७), डहाणू ३५.१ (०.७), सांताक्रूझ ३४.० (०.५), रत्नागिरी ३२.८ (-०.१), औरंगाबाद ४२.६ (३.४), नांदेड ४४.५ (३.०), परभणी ४५.६ (३.८), उस्मानाबाद ४४.४ (५.६), अकोला ४२.२ (३.३), अमरावती ४५.० (३.०), बुलडाणा ४३.० (५.१), बह्मपुरी ४६.५ (३.९), चंद्रपूर ४६.६ (३.४), गोंदिया ४४.४ (१.७), नागपूर ४५.६ (२.८), वाशीम ४३.०, वर्धा ४६.४ (३.६), यवतमाळ ४४.५(२.८). 

उन्हाने होरपळलेली ठिकाणे : चंद्रपूर ४६.६, ब्रह्मपरी ४६.५, वर्धा ४६.४, नागपूर ४५.६, परभणी ४५.६, सोलापूर ४५.१, अमरावती ४५. 

वादळी पाऊस, गारपिटीने नुकसान
उन्हाने होरपळ वाढली असताना, सायंकाळनंतर ढग गोळा होऊन सांगली, सिंधुदूर्ग, परभणीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, सांगलीतील मिरज, तासगावात गारपीटही झाली. तासगाव तालुक्यात द्राक्ष बागांना गारपिटीचा जबर तडाखा बसला. सावळज परिसरात ३ हजार एकर द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह वादळी पाऊस झाला. पावसामुळे आंबा पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

मॉन्सून जैसे थे
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. १८) दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भाग व्यापला, मात्र त्यानंतर बुधवारपर्यंत (ता. २२) पाच दिवस मॉन्सूनची कोणतही वाटचाल झाली नाही. मॉन्सूनची प्रगती जैसे थे असून, दोन ते तीन दिवसांत उत्तर अंदमानापर्यंत मॉन्सूनची प्रगती होण्यास पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.


इतर बातम्या
रताळे वनस्पती गंधाद्वारे देते अन्य...एखाद्या हल्ल्याची चाहूल लागल्यास बहुतांश सजीव...
शेतमाल तारण योजनेअंतर्गत कारंजा बाजार...कारंजालाड, जि. वाशीम  ः शेतकऱ्यांचा शेतमाल...
खानदेशात कापूस दर स्थिर; खेडा खरेदीला...जळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
अधिक ओलावा असलेल्या कापसासाठी हवी...वर्धा ः कापसात ओलावा असल्यामुळे प्रक्रिया उद्योजक...
मराठवाड्यात पाच मोठे प्रकल्प तुडुंब औरंगाबाद : मराठवाड्यातील ११ पैकी पाच मोठे...
शेतमालाच्या शिवार खरेदीवर लक्ष द्या :...जळगाव  ः खानदेशात कापसापाठोपाठ केळी, कांदा व...
सोलापुरात चारा छावण्यांवर २४५ कोटी...सोलापूर ः दुष्काळामध्ये जिल्ह्यात चारा छावण्यांवर...
नाशिक : पणन मंडळाच्या केंद्रातून दुबईला...नाशिक : कसमादे पट्ट्यात सटाणा, कळवण, मालेगाव...
शेतीपूरक उद्योगाची कास धरा ः पोकळे जालना  : ‘‘निसर्गाच्या लहरीपणामुळे कोरडवाहू...
परभणी जिल्ह्यात ज्वारीची ८७ हजार...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात गुरुवार...
कांदा व्यापाऱ्यांच्या साठा तपासणीची...नाशिक  : कांदा दराने मोठी उसळी घेतल्याने व...
सोलापूर जिल्ह्यात मदतीचे अनुदान...सोलापूर : दोन महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात...
सांगली : पूरग्रस्तांसाठी १०२ कोटी...सांगली : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांमध्ये...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
पुणे विभागात रब्बीचा साडेसात लाख...पुणे  ः चार ते पाच दिवसांपूर्वी अनेक भागांत...
शिरुरमधील साडेसहा हजारांवर शेतकरी...पुणे  ः यंदा ऑगस्ट, सप्टेंबर आणि...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
सरकारच्या निर्णयाचा जिल्हा परिषदेला...नगर  ः राज्य सरकारने मागील सरकारच्या काळात...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...