agriculture news in marathi Rain prediction in Maharashtra | Agrowon

राज्यात हलक्या पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

पुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर आता उघडीप देण्यास सुरूवात केली आहे. मात्र, काही भागात असलेल्या ढगाळ  हवामानामुळे तुरळक ठिकाणी शिडकावा होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सुत्रांनी वर्तविली आहे.  

पुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर आता उघडीप देण्यास सुरूवात केली आहे. मात्र, काही भागात असलेल्या ढगाळ  हवामानामुळे तुरळक ठिकाणी शिडकावा होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सुत्रांनी वर्तविली आहे.  

उत्तर भारतातून लवकरच परतीचा प्रवास सुरू होणार असल्याने राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. त्यातच मध्य महाराष्ट्र ते कोमोरीन परिसर व कर्नाटक आणि केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा असल्याने तुरळक ठिकाणी काही प्रमाणात दुपारनंतर ढग जमा होत आहे. यामुळे राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या सरी पडत आहे. तर दिवसभर कोकण, मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात हवामान ढगाळ तर अधूनमधून ऊन पडत होते.

मराठवाडा व विदर्भातही उन्हाचा चटका वाढला होता. शुक्रवारी (ता.२५) सकाळी आठ वाजेपर्यत नागपूर येथे सर्वाधिक ३४.६ अंश सेलिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली होती. पुण्यातही सरासरीच्या तुलनेत उणे एक अंश सेल्सिअसने कमाल तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे उकाड्यात सकाळपासून वाढ होत आहे.

येत्या चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भात तुरळक सरी पडतील. रविवारपासून (ता.२७) राज्यातील काही भागात काही अंशी ढगाळ राहणार असून अनेक भागात ऊन पडेल. त्यामुळे काही प्रमाणात उकाड्यात वाढ होऊन कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही ढगाळ हवामानासह अधूनमधून ऊन पडणार असून तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे.


इतर अॅग्रो विशेष
मोह फुलांचा वाढेल गोडवाराज्यामध्ये ऐन नवरात्रीमध्ये मॉन्सून देवतेने...
देखो तो कहीं चुनाव है क्या?‘स रहद पर तनाव है क्या, देखो तो कहीं चुनाव है...
कांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांना मिळणार...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...
मराठवाड्यात साठ टक्के कपाशीवर गुलाबी...नांदेड : ‘‘मराठवाड्यात लवकर येणारे कापूस वाण...
कंपन्यांनी सर्वेक्षण न केल्यास विमा...पुणे: राज्यात विमा कंपन्यांनी पीक नुकसानीचे...
इथेनॉल दरात तीन रुपयांपर्यंत वाढकोल्हापूर : यंदाच्या हंगामात इथेनॉलनिर्मितीला गती...
एक लाख टन कांदा आयातीची शक्यतानवी दिल्ली ः देशातील कांदा दरवाढीवर नियंत्रण...
कापूस खरेदीसाठी तीस केंद्रे अंतिमनागपूर : गेल्या हंगामात नव्वद केंद्र आणि १५०...
फळ पीकविमा योजनेवर केळी उत्पादकांचा...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी...
द्राक्ष निर्यातदार, पॅकहाउसवरील निलंबन...नाशिक: नाशिकमधून गेलेल्या ४१ कंटेनरमध्ये कीड...
हातचं सारं गेलं, आता जगावं कसं?नाशिक : यंदा वेळेवर पाऊस नसल्याने भाताची रोपे...
धानाच्या हमीभावात ११ वर्षांत केवळ एक...भंडारा: व्यवस्थापन खर्चात दरवर्षी होणारी वाढ,...
राज्यात उन्हाची तीव्रता वाढली पुणे ः राज्यातील अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढली...
कांदा लिलाव सुरू करण्याचे आदेशनाशिक : जिल्ह्यात विविध बाजार समित्यांमध्ये...
सर्वांगीण विकासातून गुंडेगावचा झाला...गुंडेगाव (ता. जि. नांदेड) या गावाने शेती,...
कृषी उद्योजकतेची ‘एबीसी’सन २०२० च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी ...
आयकर भरणाऱ्या ६५१ शेतकऱ्यांना नोटिसाशहादा, जि. नंदुरबार : आयकर भरत असूनही केंद्र...
कांद्याची कोट्यवधीची उलाढाल ठप्प नाशिक: केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या दरावर...
करार शेतीची जबाबदारी कृषी विभागाकडेचपुणे: करारशेतीचा नवा कायदा अस्तित्वात आल्यानंतर...
मॉन्सूनने घेतला देशातून निरोपपुणे ः परतीच्या पावसाला देशातून माघार घेण्यासाठी...