agriculture news in Marathi, rain prediction in Ratnagiri and Sindhudurg, Maharashtra | Agrowon

रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

पुणे: मध्य भारतातील कमी दाबक्षेत्रामुळे विदर्भात जोरदार, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. गडचिरोलीतील अरमोरी येथे १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज (ता. २७) राज्यात हलक्या पावसाची शक्यता असून, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे: मध्य भारतातील कमी दाबक्षेत्रामुळे विदर्भात जोरदार, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. गडचिरोलीतील अरमोरी येथे १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज (ता. २७) राज्यात हलक्या पावसाची शक्यता असून, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मध्य प्रदेशात असलेले कमी दाबाचे क्षेत्र मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबक्षेत्रात मिसळून गेले आहे, तर बुधवारी (ता. २८) बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. तापमानातही चढ-उतार सुरूच असून, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तापमान ३० अंशांच्या खाली घसरले आहे. सोलापूर येथे सर्वाधिक ३३.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. आज (ता. २६) दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर राज्याच्या बहुतांशी भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.  

सोमवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : उल्हासनगर, अंबरनाथ प्रत्येकी ३०, खालापूर, कर्जत, माथेरान प्रत्येकी २०, हर्णेख मानगाव, मंडणगड, सावंतवाडी, वसई, मुरूड, सुधागड, मुरबाड, कल्याण, जव्हार, वैभववाडी, कुडाळ प्रत्येकी १०.
मध्य महाराष्ट्र : मुक्ताईनगर ४०, नगर, इगतपुरी, रावेर प्रत्येकी ३०, लोणावळा २०, महाबळेश्वर, भुसावळ, जळगाव प्रत्येकी १०,
मराठवाडा : वाडवणी, पाटोदा, बीड प्रत्येकी ३०, निलंगा, रेनापूर, उस्मानाबाद, चाकूर प्रत्येकी २०, आंबेजागाई, केज, मुखेड, शिरूर कासार, उदगीर प्रत्येकी १०.
विदर्भ : अरमोरी १००, समुद्रपूर ९०, ब्रह्मपुरी ८०, सेलू, चिखलदरा, चिमूर, नागभिड, कुरखेड, पवनी प्रत्येकी ७०, देसाईगंज, सिंदेवाही, धानोरा प्रत्येकी ६०, गोंदिया, कामठी, भिवापूर प्रत्येकी ५०, गडचिरोली, आर्वी, वर्धा, अर्जुनी मोरगाव, चांदूरबाजार, अमरेड, मूल, पारशिवणी, लाखंदूर, धारणी, सावळी प्रत्येकी ४०, काटोल, खारंघा, सावनेर, परतवाडा, गोंडपिंपरी, तिवसा, एटापल्ली, मलकापूर, वरोरा, नरखेडा, सिरोंचा, खामगाव, मोर्शी प्रत्येकी ३०. घाटमाथा : शिरगाव ३०, लोणावळा २०.  


इतर अॅग्रो विशेष
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
`सक्ती’चे होईल स्वागतयुरिया विकत घेताना सोबत जैविक (जीवाणू) खते...
देशाला स्वातंत्र्य मिळाले पण...शेतमालाचेच भाव का कोसळतात? कांदा, टोमॅटो ...
नवी बाजार व्यवस्था नवी आव्हानेसध्यातरी बाजार समितीचा कर नाही म्हणून व्यापारी...
आकडे, आरोग्य अन् आयातखाद्यतेलावरील आयातशुल्कात वाढ करून आयातीवर...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि...नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  ...
कर्जमाफीसाठी दीड हजार कोटीमुंबई: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत...
राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना ...लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
राज्यात पावसाची रिपरिप सुरुच पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून...
निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटलेवाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे...
चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५...मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
पावसाचा जोर कायम राहणार पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...