agriculture news in marathi Rain prediction in scattered places in state | Agrowon

तुरळक ठिकाणी पूर्वमोसमीच्या सरींची शक्यता

अॅग्रोवन वृत्तसेवा
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते दक्षिण तमिळनाडू या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून, काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण तयार होत आहे. तुरळक ठिकाणी सरी बरसत आहे.

पुणे : मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते दक्षिण तमिळनाडू या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून, काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण तयार होत आहे. तुरळक ठिकाणी सरी बरसत आहे. रविवारी (ता. २५) सोमवारी (ता. २६) सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.    

राज्यात सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. मागील चार ते पाच दिवस ४३ अंश सेल्सिअसपर्यंत गेलेला पारा पुन्हा काहीसा कमी झाला आहे. सध्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. गुरुवारी (ता. २२) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. कमाल तापमानाबरोबर किमान तापमान कमीअधिक होत आहे. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्‍वर येथे सर्वांत कमी १८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

दोन दिवसांपासून दक्षिण तमिळनाडू या परिसरात चक्रीय वाऱ्याच्या स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. तसेच उत्तर भारतात जम्मू आणि काश्मीर व परिसरातही चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून २.१ आणि ३.६ किलोमीटर उंचीवर आहे. तर राजस्थानच्या आग्नेय भाग व परिसरात चक्रीय स्थिती सक्रिय असून, ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहे.  

शहरातील कमाल तापमान 

  • मुंबई (सांताक्रूझ)    ३२.६
  • अलिबाग      ३३.६
  • रत्नागिरी     ३३.५
  • पुणे     ३७.१
  • जळगाव     ३८
  • कोल्हापूर    ३६.५  
  • महाबळेश्‍वर    ३१.२
  • मालेगाव    ३८.२
  • नाशिक    ३५.८
  • सांगली     ३८.२
  • सातारा    ३७.४
  • सोलापूर    ३९.७    
  • औरंगाबाद    ३७
  • परभणी     ३९.७
  • नांदेड     ३९.५
  • अकोला     ३९.१
  • अमरावती    ३८
  • बुलडाणा      ४०.४
  • चंद्रपूर     ४१
  • गोंदिया    ३८
  • नागपूर     ३९.२
  • वर्धा      ४०.१

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही...
कृषी सेवा केंद्रचालक, कर्मचाऱ्यांना लस...पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे...सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात केळीची कमी दरात खरेदी जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू...
निर्यातीच्या केळीला १३०० रुपये दर जळगाव ः खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी...
शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी...
भुईमूग खर्चालाही महागअकोला ः उन्हाळी हंगामात यंदा लागवड केलेल्या...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
जोरदार पावसाची शक्यता पुणे : मराठवाडा ते मध्य प्रदेशचा मध्य भाग या...
बाजार समित्याबंदमुळे खरीप नियोजन ‘...पुणे: कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन...
शेततळे अनुदानाचे वीस कोटी वितरित नगर ः राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ‘मागेल...
साखर कारखान्यांकडून ९२ टक्के ‘एफआरपी’...कोल्हापूर : राज्यात एप्रिलअखेर एकूण रकमेच्या ९२...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत पुणे : राज्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडत...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
मॉन्सून यंदा वेळेवर पुणे : सध्या मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक...
शेतकऱ्यांकडे २९ लाख क्विंटल घरचे बियाणे पुणे ः कृषी विभागाने ग्रामबिजोत्पादन मोहिमेतून...
मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी पुणे : मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत...
पावसाचा प्रभाव वाढणार पुणे : कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्याची...