agriculture news in marathi, rain prediction in some parts state | Agrowon

राज्यात हलक्या पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

पुणे : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पडणाऱ्या पावसाने राज्याच्या काही भागात उघडीप दिली आहे. राज्याच्या दक्षिण भागात असलेल्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये मात्र वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत आहे. पावसाची उघडीप असलेल्या भागात ऑक्टोबर हीटचा चटका वाढला आहे. राज्यात शुक्रवारपासून (ता. ११) वादळी पावसाचा जोर काहीसा ओसरलेला आहे. आज (ता. १३) कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

पुणे : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पडणाऱ्या पावसाने राज्याच्या काही भागात उघडीप दिली आहे. राज्याच्या दक्षिण भागात असलेल्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये मात्र वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत आहे. पावसाची उघडीप असलेल्या भागात ऑक्टोबर हीटचा चटका वाढला आहे. राज्यात शुक्रवारपासून (ता. ११) वादळी पावसाचा जोर काहीसा ओसरलेला आहे. आज (ता. १३) कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. राज्यातही मॉन्सूनच्या माघारीसाठी पोषक हवामान होत आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिल्याने कोरडे हवामान असून, या भागातून लवकर मॉन्सून निरोप घेणार आहे. तर दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. पावसाची उघडीप असलेल्या भागात तापमान वाढले आहे. महाबळेश्वर, कोल्हापूर, सातारा वगळता सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा तिशीपार गेला आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे सर्वाधिक ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर विदर्भातील अकोला येथे ३४.२ आणि ब्रह्मपुरी येथे ३४ अंश तापमान नोंदले गेल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.     

शनिवारी (ता. १२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये : पुणे ३०.६ (-१.०), जळगाव ३४.४(-०.६), कोल्हापूर २९.०(-२.०), महाबळेश्वर २४.१ (-१.०), मालेगाव ३३.२ (-०.१), नाशिक ३१.३ (-१.०), सातारा २९.५ (-१.०), सोलापूर ३१.७ (-१.३), अलिबाग ३२.४ (०.४), डहाणू ३२.९ (०.६), सांताक्रूझ ३३.८ (१.१), रत्नागिरी ३३.४ (२.२), औरंगाबाद २८.२ (-३.१), परभणी ३१.५ (-१.५), अकोला ३४.२ (०.३), अमरावती ३२.६ (-१.२), बुलडाणा २९.६ (-१.२), ब्रह्मपुरी ३४.० (१.३), चंद्रपूर ३२.०(-१.४), गोंदिया ३२.०(-०.८), नागपूर ३३.७ (०.६), वर्धा ३३.० (-०.३), यवतमाळ ३१.५ (-०.९).

शनिवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :

  • कोकण : सुधागडपाली ५२.
  •  मध्य महाराष्ट्र : नेवासा ४१, पाथर्डी ६१, शेवगाव ३९, श्रीरामपूर २४, शाहूवाडी २२, जत ५७, कवठेमहांकाळ १८.
  • मराठवाडा : लातूर २४, भोकर ३०, देगलूर ४४, मुदखेड ४४, वाशी ३९. 
  • विदर्भ : जेवती २२. 

इतर अॅग्रो विशेष
औरंगाबाद : केंद्रीय पथकाने अनुभवली पीक...औरंगाबाद  : मराठवाड्यात केंद्राच्या...
‘कोरडवाहू’चे वैचारिक सिंचनकोरडवाहू (जिरायती) शेती समस्यांबाबत दोन दिवसांचे...
पीकविम्या वरून शेतकऱ्यांनी केंद्रीय...अमरावती  ः पीकविमा हप्ता भरायची जशी सक्‍ती...
बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निधी शेतकरी...मुंबई  : लवकरच राज्यात सत्तेवर येणाऱ्या...
बोगस खतांची तक्रार केली होती : मिश्रखत...पुणे: राज्यात काही भागांमध्ये मिश्रखताचे बोगस...
संपूर्ण कर्जमाफीसाठी लागणार 'एवढी'...सोलापूर : मागील दोन वर्षांत दुष्काळ, पूर,...
कृषी कर्मचाऱ्यांवर दबाव कुणासाठी?पुणे : राज्याच्या कृषी विभागाकडून गेल्या काही...
केंद्र शासनाचे आदेश धाब्यावरपुणे : मिश्रखतांमधील बोगस उत्पादनाला पायबंद...
ढगाळ हवामानामुळे गारठा कमीपुणे: ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होऊन...
टेरेसगार्डनवर विषमुक्त फळे-भाज्यांची...रासायनिक अवशेषमुक्त अन्नाची निर्मिती हाच एकमेव...
रब्बी पिकांना 'इथे' आहे टोळधाडीचा धोका !नवी दिल्ली: देशात मॉन्सूनचा परतीचा प्रवास...
एकत्र कुटूंब कसतेय शेती, नियोजनातून...अविरत कष्टांची तयारी, एकत्रित कुटूंब पध्दतीमुळे...
संघर्षमय हंगामगेल्या वर्षीच्या गळीत हंगामात राज्यात विक्रमी...
द्राक्ष शेतीला चालना कशी मिळेल?संपूर्ण भारत देशामध्ये द्राक्ष लागवड १.३९ लाख...
जमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदानजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून,...
ईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...
जळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...
केंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...
‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...
योजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...