agriculture news in marathi, rain prediction in south maharashtra | Agrowon

दक्षिण भागात पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 एप्रिल 2019

पुणे : उष्णतेच्या लाटेत होरपळणाऱ्या विदर्भात तीव्र लाटेचा (ऑरेंज अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. यातच बंगालच्या उपसागरात घोंगावणाऱ्या फोणी चक्रीवादळाच्या प्रभावाने राज्याच्या दक्षिण भागात ढगाळ हवामान होत आहे. आज (ता. २९) कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शनिवारी (ता. २८) कोल्हापूरातील आजरा तालुका आणि परिसरात गारांसह पाऊस पडला.  

पुणे : उष्णतेच्या लाटेत होरपळणाऱ्या विदर्भात तीव्र लाटेचा (ऑरेंज अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. यातच बंगालच्या उपसागरात घोंगावणाऱ्या फोणी चक्रीवादळाच्या प्रभावाने राज्याच्या दक्षिण भागात ढगाळ हवामान होत आहे. आज (ता. २९) कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शनिवारी (ता. २८) कोल्हापूरातील आजरा तालुका आणि परिसरात गारांसह पाऊस पडला.  

रविवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुणे, नगर, जळगाव, सातारा, परभणी, अकोला, अमरावती, बुलडाणा, बह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे उष्णतेची लाट आली आहे. आज (ता. २९) विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण लाट कायम राहणार असून, रात्रीच्या वेळी तापमान वाढून रात्रीही उष्ण ठरण्याची शक्यता आहे. 

बंगालच्या उपसागरात ‘फोणी’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. पूर्व किनारपट्टीकडे झेपावत असलेल्या चक्रीवादळामुळे आज (ता. २९)  तमिळनाडू, आंध्र प्रदेशालगत समुद्र खवळून उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. केरळ, कर्नाटक, आंध्र, तमिळनाडूमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. मंगळवारपर्यंत (ता. ३०) हे चक्रीवादळ तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येणार असून, बुधवारी (ता. १) उत्तरेकडे ओडिशाच्या दिशेने सरकून जाण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.  

रविवारी (ता. २८) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४२.९ (५.०), नगर ४५.१ (५.६), जळगाव ४५.० (२.३), कोल्हापूर ३९.९ (२.९), महाबळेश्वर ३५.७ (४.०), मालेगाव ४४.६ (४.१), नाशिक ४२.७ (४.४), सांगली ४१.५ (२.९), सातारा ४१.५ (४.८), सोलापूर ४३.१(२.३), अलिबाग ३४.९ (२.६), डहाणू ३६.३ (२.९), सांताक्रूझ ३५.८ (२.६), रत्नागिरी ३२.६ (०.०), औरंगाबाद ४३.६ (३.६), बीड ४४.४ (३.९), परभणी ४५.७ (४.२), नांदेड ४४.६ (२.५), उस्मानाबाद ४३.६ (४.४), अकोला ४६.७ (४.७), अमरावती ४६.० (३.९), बुलडाणा ४३.३ (५.१), बह्मपुरी ४६.४ (४.७), चंद्रपूर ४६.५ (३.८), गोंदिया ४३.० (१.५), नागपूर ४५.३ (३.३), वाशिम ४४.६, वर्धा ४६.० (३.८), यवतमाळ ४५.२(३.७). 

अकोला ठरले जगात सर्वांत उष्ण
सूर्य तळपल्याने महाराष्ट्र चांगलाच भाजून निघत आहे. रविवारी (ता. २८) अकोला जगातील सर्वांत उष्ण शहर ठरले आहे. जगातील दहा उष्ण ठिकाणांत महाराष्ट्रातील अकोल्यासह चंद्रपूर, बह्मपुरी, अमरावती, वर्धा या पाच ठिकाणांचा समावेश आहे. तर नागपूर, परभणी, यवतमाळ नगर यांचा पहिल्या १५ उष्ण ठिकाणांमध्ये क्रमांक लागला आहे. अमेरिकेतील ‘अल-डोरॅडो वेदर’ या हवामानविषयक नोंदी घेणाऱ्या जागतिक संकेतस्थळावर दररोज ही माहिती मिळते. 

ठिकाण आणि  तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
अकोला ४६.७, खारगोणे (मध्य प्रदेश) ४६.६, चंद्रपूर ४६.५, बह्मपुरी ४६.४, अमरावती ४६, वर्धा ४६, बानदा (उत्तर प्रदेश) ४५.६, होशनंगाबाद
(मध्य प्रदेश) ४५.५, खांडवा (मध्य प्रदेश) ४५.५, आदीलाबाद (तेलंगणा) ४५.३
 

इतर अॅग्रो विशेष
सर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...
बहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...
कृषी निर्यातीला धोरणात्मक पाठबळ हवे :...जागतिक स्तरावर कृषी निर्यातीत भरपूर संधी आहे,...
शेतकऱ्यांसाठी निवडणुका फक्त...देशात असो किंवा राज्यात ज्या वर्षात निवडणुका...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
‘मिरॅकल बीन’चा लुप्त होतोय चमत्कारदोन दिवसांपासून ढगाने व्यापलेल्या आकाशाने...
स्वस्त थाळी शेतकऱ्यांना पडू शकते महागातशिवसेनेच्या जाहीरनाम्यातील, त्यांच्या शब्दात ''...
नारळ, सुपारीत फुलली दर्जेदार काळी मिरीरत्नागिरी जिल्ह्यात पावसापासून काही अंतरावरील...