agriculture news in marathi, Rain prediction in state | Agrowon

राज्यात हलक्या पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. उर्वरित राज्यात मात्र चार ते पाच दिवसांपासून ऊन, सावल्याच्या खेळात श्रावण सरी हजेरी लावत आहेत. आज (ता. १५) राज्यात हलक्या सरींची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बुधवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पूर्व विदर्भात अतिवृष्टी झाली असून, गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथे सर्वाधिक १६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. उर्वरित राज्यात मात्र चार ते पाच दिवसांपासून ऊन, सावल्याच्या खेळात श्रावण सरी हजेरी लावत आहेत. आज (ता. १५) राज्यात हलक्या सरींची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बुधवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पूर्व विदर्भात अतिवृष्टी झाली असून, गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथे सर्वाधिक १६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी (ता. १४) छत्तीसगड आणि परिसरावर सक्रिय होते. या कमी दाब क्षेत्रामुळे पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यांत काही ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद होत अतिवृष्टी झाली. तर उर्वरित राज्यात मात्र पावसाच्या हलक्या सरी पडल्या. बुधवारी दुपारी विदर्भात ढगांची दाटी होती, तसेच उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही हलके ढग जमा झाले होते. काही ठिकाणी हलक्या सरी सुरू होत्या. आज (ता. १५) राज्यात हलक्या सरींची शक्यता आहे.

बुधवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : 
कोकण :
पोलादपूर ३०, जव्हार, मंडणगड, भिरा, मोखेडा, ठाणे, कुडाळ, दोडमार्ग प्रत्येकी २०.
मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर ७०, गगनबाडा, हर्सुल, त्र्यंबकेश्वर प्रत्येकी २०.
मराठवाडा : उमरी, मुदखेड प्रत्येकी ३०, आष्टी, अहमदपूर प्रत्येकी २०, जळकोट, धर्माबाद, शिरुर अनंतपाळ, बीड, नांदेड, अर्धापूर, मानवत, उदगीर प्रत्येकी १०.
विदर्भ : एटापल्ली १६०, साकोली १५०, कुरखेडा, धानोरा, देसाईगंज प्रत्यकी १४०, पवनी १३०, तिरोडा, भिवापूर, अरमोरी प्रत्येकी १२०, गडचिरोली ११०, चामोर्शी, मूल, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावळी प्रत्येकी १००, नागभिड ९०, कोर्ची ८०, लाखनी, पोंभुर्णा, मुलचेरा, सडक अर्जुनी, लाखंदूर, चिमूर प्रत्येकी ७०, चंद्रपूर, गोंदिया, उमरेड प्रत्येकी ६०, बल्लारपूर, गोरेगाव, मोहाडी, अर्जुनी मोरगाव, भद्रावती, तुमसर, चिखलदरा, आमगाव, वरोरा प्रत्येकी ५०.
घाटमाथा : आंबोणे ६०, शिरगाव ५०, दवडी, डुंगरवाडी प्रत्येकी ४०, लोणवळा, कोयना नवजा प्रत्येकी ३०. 

इतर अॅग्रो विशेष
मदत हवी दिलासादायकअवकाळी पावसाने राज्यात शेतीच्या झालेल्या...
स्वतःच्या गरजेनुसार यंत्रांची केली...बदलत्या काळात शेतीत मजुरांची संख्या कमी झाली....
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
एफआरपीची जुळवाजुळव करताना यंदाही कसरतचकोल्हापूर : गेल्या वर्षी वेळेत साखर विक्री न...
व्यापाऱ्यांनी शेतमाल बाजारातील बदल...पुणे ः बाजार समित्या बरखास्त केल्यास सक्षम...
नांदेड : सोयाबीनचा पेरणीपेक्षा अधिक...नांदेड  ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात...
पंचनाम्यांची ‘अतिवृष्टी’; रातोरात ९३...पुणे ः राज्य शासनाची यंत्रणा पिकाचे पंचनामे...
पीकविम्यापासून वंचित राहिल्यास कंपनी...अकोला ः जिल्ह्यात गेल्या महिन्यातील पावसाने...
उसावर आता तांबेरा, तपकिरी ठिबकेकोल्हापूर: सातत्याने पडणारे धुके व जमिनीतील...
राजू शेट्टीं थेट काश्‍मीरात;...कोल्हापूर : काश्मीरमधील सफरचंद, अक्रोड, केशर...
खरीप पिकांसाठी आठ हजार तर, फळबागांसाठी...मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने नुकसान...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा कायमपुणे : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या विविध भागात...
बांबू कलाकारीतून तयार केली ओळखकला पदवीधर असलेल्या सौ. संगीता दिलीप वडे यांनी...
पर्यावरण संवर्धन, लोक शिक्षणामध्ये ‘...अकोला, वाशीम जिल्ह्यांतील सुमारे तीस...
सत्ता अन् जीवन संघर्षराज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २२ दिवस...
नुकसानीचा बोजा केंद्रप्रमुख, जिनिंग...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस...
गडचिरोलीत रब्बी मक्‍यावर लष्करी अळीचा...गडचिरोली  ः धानकाढणीनंतर मका लागवड होणाऱ्या...
काटेकोर शेतीत द्राक्ष उत्पादक अग्रेसर:...पुणे : कष्ट व कौशल्याच्या बळावर कोणताही आकार आणि...
चीनमधील संत्रा खरेदीदारांचे शिष्टमंडळ...नागपूर ः चीनची बाजारपेठ मोठी असल्याने संत्रा...