कोरोनाचा धसका; त्यात पावसाचा तडाखा; आजही अंदाज

राज्याच्या विविध भागात गारपीट, वादळी वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाने दणका दिला आहे. यातच उन्हाचा चटका वाढत असल्याने तापमानातही वाढ होत आहे.
Rain prediction, पावसाचा तडाखा; आज पुन्हा अंदाज
Rain prediction, पावसाचा तडाखा; आज पुन्हा अंदाज

पुणे: राज्याच्या विविध भागात गारपीट, वादळी वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाने दणका दिला आहे. यातच उन्हाचा चटका वाढत असल्याने तापमानातही वाढ होत आहे. बुधवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोल्यात यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. २६) राज्यात सर्वदूर वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  सकाळपासून उन्हाचा चटका वाढत असून, अनेक भागात ढग दाटून येत आहे. उकाड्यातही चांगली वाढ झाली आहे. दुपारनंतर जोरदार वारे वाहून, धुळीच्या वावटळी उठत आहे. पाठोपाठ ढगांच्या गडगडाटासह गारपीट आणि पावसाला सुरुवात होत आहे. मंगळवारी आणि बुधवारी पुणे, सातारा, नगर, नाशिक, सांगली, जालना जिल्ह्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पाऊस पडला. या पावसामुळे काढणीस आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, भाजीपाला, द्राक्ष, संत्रा, मोसंबीच्या बागा, आंबा पिकांचे नुकसान होणार होणार आहे. दरम्यान अरबी समुद्रापासून कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, दक्षिण मध्य प्रदेशापर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर, तसेच राजस्थानपासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटकपर्यंत समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ही स्थिती पोषक ठरल्याने आज (ता.२६) राज्यात सर्वदूर वादळी पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची इशाराही हवामान विभागाने दिला आहे.   राज्यात उन्हाचा ताप वाढला असून, अकोल्यात यंदा प्रथमच तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. त्यापाठोपाठ सोलापुरात ३९.६, अमरावती ३९.४ अंश, मालेगाव ३९.२ अंश, तर जळगाव ३९ अंश तापमान नोंदले गेले. सांगली, सातारा, परभणी, चंद्रपूर येथेही तापमान ३८ अंशांच्या पुढे आहे. उन्हाचा चटक्याने झळा वाढत असून, दुपारच्या वेळी बाहेर पडणे असह्य होत आहे. तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.    

बुधवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमान व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.६ (१९.३), जळगाव ३९.० (२२.०), कोल्हापूर ३७.६ (२४.१), महाबळेश्‍वर ३१.५ (१९.०), मालेगाव ३९.२ (२२.८), नाशिक ३६.६ (२२.३), निफाड ३४.२ (१८.३), सांगली ३८.०, सातारा ३८.१ (२२.९), सोलापूर ३९.६ (२२.६), अलिबाग ३०.७, डहाणू ३२.० (२४.१), सांताक्रूझ ३४.१ (२६.०), रत्नागिरी ३१.२ (२४.०), औरंगाबाद ३७.९ (२१.९), परभणी ३८.७ (२२.५), अकोला ४०.३ (२३.५), अमरावती ३९.४ (२२.८), बुलडाणा ३५.६ (२३.६), चंद्रपूर ३८.० (२०.५), गोंदिया ३४.८ (२०.३), नागपूर ३७.० (२०.३), वर्धा ३७.७ (२३.४).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com