agriculture news in marathi Rain prediction in state | Agrowon

कोरोनाचा धसका; त्यात पावसाचा तडाखा; आजही अंदाज

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 मार्च 2020

राज्याच्या विविध भागात गारपीट, वादळी वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाने दणका दिला आहे. यातच उन्हाचा चटका वाढत असल्याने तापमानातही वाढ होत आहे.

पुणे: राज्याच्या विविध भागात गारपीट, वादळी वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाने दणका दिला आहे. यातच उन्हाचा चटका वाढत असल्याने तापमानातही वाढ होत आहे. बुधवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोल्यात यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. २६) राज्यात सर्वदूर वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

सकाळपासून उन्हाचा चटका वाढत असून, अनेक भागात ढग दाटून येत आहे. उकाड्यातही चांगली वाढ झाली आहे. दुपारनंतर जोरदार वारे वाहून, धुळीच्या वावटळी उठत आहे. पाठोपाठ ढगांच्या गडगडाटासह गारपीट आणि पावसाला सुरुवात होत आहे. मंगळवारी आणि बुधवारी पुणे, सातारा, नगर, नाशिक, सांगली, जालना जिल्ह्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पाऊस पडला. या पावसामुळे काढणीस आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, भाजीपाला, द्राक्ष, संत्रा, मोसंबीच्या बागा, आंबा पिकांचे नुकसान होणार होणार आहे.

दरम्यान अरबी समुद्रापासून कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, दक्षिण मध्य प्रदेशापर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर, तसेच राजस्थानपासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटकपर्यंत समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ही स्थिती पोषक ठरल्याने आज (ता.२६) राज्यात सर्वदूर वादळी पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची इशाराही हवामान विभागाने दिला आहे.  

राज्यात उन्हाचा ताप वाढला असून, अकोल्यात यंदा प्रथमच तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. त्यापाठोपाठ सोलापुरात ३९.६, अमरावती ३९.४ अंश, मालेगाव ३९.२ अंश, तर जळगाव ३९ अंश तापमान नोंदले गेले. सांगली, सातारा, परभणी, चंद्रपूर येथेही तापमान ३८ अंशांच्या पुढे आहे. उन्हाचा चटक्याने झळा वाढत असून, दुपारच्या वेळी बाहेर पडणे असह्य होत आहे. तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.    

बुधवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमान व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.६ (१९.३), जळगाव ३९.० (२२.०), कोल्हापूर ३७.६ (२४.१), महाबळेश्‍वर ३१.५ (१९.०), मालेगाव ३९.२ (२२.८), नाशिक ३६.६ (२२.३), निफाड ३४.२ (१८.३), सांगली ३८.०, सातारा ३८.१ (२२.९), सोलापूर ३९.६ (२२.६), अलिबाग ३०.७, डहाणू ३२.० (२४.१), सांताक्रूझ ३४.१ (२६.०), रत्नागिरी ३१.२ (२४.०), औरंगाबाद ३७.९ (२१.९), परभणी ३८.७ (२२.५), अकोला ४०.३ (२३.५), अमरावती ३९.४ (२२.८), बुलडाणा ३५.६ (२३.६), चंद्रपूर ३८.० (२०.५), गोंदिया ३४.८ (२०.३), नागपूर ३७.० (२०.३), वर्धा ३७.७ (२३.४).

 


इतर बातम्या
राज्यात २३ लाख क्विंटल अन्नधान्याचे वाटपमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या...
दुधासाठीचा हमीभाव आम्हाला लागू नाही;...पुणे : राज्यातील जादा दूध खरेदी अनुदान योजना फक्त...
कोरोनाच्या जनुकीय आराखड्यासाठी प्रयत्न...नवी दिल्ली : ‘कोविड -१९' (कोरोना) विषाणूचा जनुकीय...
...अन् तामिळनाडूत महाराष्ट्रातील ऊसतोड...नवी दिल्ली : पोटाची खळगी भरण्यासाठी थेट...
‘लॉकडाउन’मध्ये कमाल... शेतकऱ्याच्या...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : लॉकडाउन न सारच थांबल......
हापूसची १०५ टन निर्यातरत्नागिरी ः हापूसच्या निर्यातीला चालना देण्यासाठी...
कोठारी ग्रुपतर्फे पंधरा लाखांचा मदत...सोलापूर ः कोरोना संकटात प्रशासनाला मदत व्हावी,...
यूपीएल लिमिटेडकडून पंतप्रधान मदत निधीला...पुणे : भारतातील सर्वात मोठी पीक संरक्षण...
मदतीच्या झऱ्याने ओलावले शिवार; अतिरिक्त...कोल्हापूर: दररोज निघणारा व बाजारपेठेत उठाव...
कृषीशास्त्रज्ञांचा व्हिडीओ...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
वरूडमध्ये ‘कोरोना’मुळे बागांतील...जालना : जवळपास दीडशे एकरवर विस्तारलेल्या...
वर्धा जिल्ह्यात दूध, भाजीपाल्यावर आयात...वर्धा ः विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात ‘कोरोना’...
राज्यात कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी वर्धा ः शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याबाबत सीसीआय...
हरभरा, तूर विक्रीसाठी गावातच नोंदणीची...अर्धापूर, जि. नांदेड : ‘‘‘कोरोना’च्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८५ व्यक्ती ‘होम...सिंधुदुर्ग : ‘‘‘होम क्वारंटाईन’ केलेल्या ८५...
घरातील कापूस खरेदी करा, महिला...परभणी : उन्हाळा सुरु झाला आहे. तापमानात वाढ...
सोलापुरात १२७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह सोलापूर : ‘कोरोना’चे संशयित असलेल्या जिल्ह्यातील...
‘उजनी’तून सोडले सोलापूरसाठी पाणी सोलापूर : सोलापूर शहरातील लोकांना पिण्याच्या...
बीड जिल्ह्यातील तूर, हरभऱ्याची केवळ...बीड : ‘‘जिल्ह्यात हमी दराने तूर व हरभरा खरेदीसाठी...
सांगली जिल्ह्यात डाळिंबांच्या विम्याचे...सांगली : जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ,...