agriculture news in marathi, Rain prediction in state from tommorow | Agrowon

राज्यात उद्या, परवा कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पुणे : मराठवाड्यात रविवारी (ता. १५) दुपारनंतर वादळी वारे, गारपिटीसह पूर्वमोसमी पावसाने दणका दिला. सोमवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर सांगलीसह दक्षिण मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोलीमध्ये तर विदर्भामतील यवतमाळ आणि नागपूरसह अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडल्या. अचानक आलेल्या पावसामुळे भाजीपाल्यासह फळपिकांचे नुकसान झाले. बुधवारी राज्यात, तर गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

पुणे : मराठवाड्यात रविवारी (ता. १५) दुपारनंतर वादळी वारे, गारपिटीसह पूर्वमोसमी पावसाने दणका दिला. सोमवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर सांगलीसह दक्षिण मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोलीमध्ये तर विदर्भामतील यवतमाळ आणि नागपूरसह अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडल्या. अचानक आलेल्या पावसामुळे भाजीपाल्यासह फळपिकांचे नुकसान झाले. बुधवारी राज्यात, तर गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्रापासून तमिळनाडूपर्यंत असलेली खंडित वाऱ्यांची स्थिती पावसाला पोषक ठरत असून, दोन दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. पहाटे सुटणारी गार हवा, सकाळपासून वाढणारा उन्हाचा चटका, दुपारनंतर गोळा होणारे ढग आणि पाठोपाठ ढगांचा गडगटाट, विजा आणि गारपिटीसह होणारा पाऊस अशीच स्थिती राज्याच्या विविध भागांत दिसून येत आहे. तर उन्हाचा चटकाही कायम असल्याने मालेगाव येथे उच्चांकी ४२ अंश तर उस्मानाबाद येथे रात्रीच्या नीचांकी १६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सोमवारी सकाळपर्यंत मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. बीडच्या पाली ११, म्हालसजावळा १२, कित्तीअडगाव येथे १० मिलिमीटर, लातूरच्या औसामध्ये ३६, किणी १७, खांडळी २५, निलंगा ३३, अंबुळगा २२, मदनसुरी २५, रेणापूर १०, साकोल १२, उस्मानाबादमधील लोहारा ११, नांदेडमधील तुप्पा १०, वसरणी ११, विष्णुपरी ११, लिंबगाव १५, तरोडा १३, फुलवल ११, सोनखेड १२, कळंबार २५, हदगाव ३४, निवघा २३, तामसा १९, भोकर २६, मोघाळी ११, मुदखेड १६, मुगट १८, बराड १२, माहूर ३२, सिंधखेड १०, मालेगाव येथे ११ मिलिमीटर, हिंगोलीतील कळमनुरी येथे १९ मिलिमीटर पाऊस पडला.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे ३७, मैंदार्गी १०, सोनंद १८, कोळा येथे १९ मिलिमीटर, सांगलीमधील मडग्याळ १३, जत १६, उमडी २०, शेगाव येथे १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. विदर्भातील यवतमाळमधील घरफळ १०, आर्णी १३, उमरखेड १६, नागपूरमधील कामठी ४१, वडोदा ११, दिघारी १२, कन्हान २५, मौदा १७, धानळा १२, खापा ११, शिर्सी १०, पाचगाव १०, भिवापूर २४, कुही १७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

सोमवार (ता. १६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.६, जळगाव ३९.५, कोल्हापूर ३६.४, महाबळेश्वर ३२.२, मालेगाव ४२.०, नाशिक ३८.७, सांगली ३७.८, सातारा ३८.४१, सोलापूर ३९.३, मुंबई ३३.०, अलिबाग ३३.८, रत्नागिरी ३२.२, डहाणू ३३.४, आैरंगाबाद ३९.७, परभणी ४१.६, नांदेड ३८.१, अकोला ४२.०, अमरावती ४०.४, बुलडाणा ३८.८, ब्रह्मपुरी ३८.५, चंद्रपूर ४०.८, गोंदिया ३७.५, नागपूर ३७.६, वर्धा ४०.२, यवतमाळ ३९.०. 

इतर अॅग्रो विशेष
पावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
बाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...
वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...
नीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण...
मराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटातऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान...
खरिपावर दुष्काळाचे सावट गडदपुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग...
चोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा,...
उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात...
राज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा...सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे...
देशात २४ राज्यांमध्ये पावसात तूटपुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून,...
चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...