राज्यात आज ढगाळ वातावरण, उद्यापासून पावसाचा अंदाज

राज्यात उद्यापासून पावसाचा अंदाज
राज्यात उद्यापासून पावसाचा अंदाज

पुणे : दक्षिण महाराष्ट्राच्या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राज्यातील बहुतांश भागांत गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. त्यामुळे किमान तापमानात चढ-उतार होत आहे. राज्यात आजही (ता. ६) दिवसभर हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. उद्यापासून (ता. ७) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ढगाळ हवामान राहणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. बुधवारी (ता. ८) विदर्भात काही ठिकाणी वादळी वारे व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. अरबी समुद्र व कर्नाटक, लक्षद्वीप या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ ते २.१ किलोमीटर उंचीवर आहे. मध्य प्रदेशाच्या परिसरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तसेच मध्य प्रदेश व तमिळनाडू या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होत आहे. शनिवारपासून राज्यात ढगाळ हवामानाची स्थिती आहे. यामुळे थंडीत चढ-उतार होत आहे. किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. रविवारी (ता. ५) सकाळी धुळे येथील कृषी महाविद्यालय परिसरात सर्वात कमी किमान तापमान ६.६ अंश सेल्सिअस होते. कोकणातही किंचित थंडी वाढली असून किमान तापमान १६ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. त्यामुळे या भागात चांगलीच थंडी होती. नाशिक, जळगाव, महाबळेश्वर, पुणे, मालेगाव या भागात किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअस होते. सातारा, सांगली, सोलापूर भागात १४ ते १६ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. मराठवाड्यातही औरंगाबाद, बीड, जालना या भागात काही प्रमाणात ढगाळ हवामान असले तरी थंडी बऱ्यापैकी होती. या भागात किमान तापमानाचा पारा १० ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता. विदर्भात बहुतांशी भागांत थंडी कायम आहे. गोंदिया, चंद्रपूर, बुलडाणा या भागात दहा अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमान होते. रविवारी (ता. ५) सकाळी असलेले विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई १९.०, सांताक्रूझ १७.५, अलिबाग १७.५, रत्नागिरी १६.९, डहाणू १६.५, पुणे ११.७, अकोला १०.२, औरंगाबाद १०.६, बीड १३.६, नांदेड १४.०, जळगाव ११.०, कोल्हापूर १५.७, महाबळेश्वर १०.६, नागपूर १२.०, नाशिक १०.६, मालेगाव ११.८, निफाड १३.२, परभणी ११.७, परभणी कृषी विद्यापीठ १३.५, सांगली १५.७, सातारा १४.६, सोलापूर १६.५, उस्मानाबाद १०.७, बुलडाणा १०.२, अमरावती १२.२, वाशीम १२.०, चंद्रपूर १०.१, ब्रह्मपुरी ११.८, गोदिया १०.२, वर्धा १२.६, यवतमाळ १४.०. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com