जनावरांच्या शरीरावरील गोचिड निर्मुलन करण्यासाठी ग्रामीण पातळीवर सहज उपलब्ध होईल, अशा औषधी
अॅग्रो विशेष
पूर्व विदर्भात गुरुवारी पावसाची शक्यता
गुरुवारी (ता. २८) पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व वर्धा या भागांत तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.
पुणे : मराठवाडा ते बिहार या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांत वातावरणात बदल होतील. गुरुवारी (ता. २८) पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व वर्धा या भागांत तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.
गेल्या सहा महिन्यांपासून चक्रीवादळाची मालिका सुरू आहे. राज्यासह देशातील वातावरणात वेगाने बदल होत आहे. सध्या थंडीत चढउतार होत असून, उत्तर भारतातील अनेक भागांत थंडीची लाट येत आहे. तर काही भागांत पाऊस पडत असल्याने थंडी कमीअधिक स्वरूपात होत आहे. यातच मागील पाच ते सहा दिवसांपासून हवामान कोरडे झाल्याने थंडी वाढली आहे.
राज्यातील काही भागातील किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली उतरल्यानंतर पुन्हा दोन दिवसांपासून वाढ झाली आहे. रविवारी (ता. २४) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथे नीचांकी ११.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंदविले गेले.
देशात रविवारी (ता. २४) झारखंड, छत्तीसगड आणि विदर्भात कमी दाबाचा पट्टा, तर उत्तर मध्य महाराष्ट्राच्या चक्रीय वाऱ्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे गुरुवारपासून वातावरणात आणखी बदल होतील. सध्या राज्यातील मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागांत थंडी असून, किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने घट झाली आहे.
येत्या दोन ते तीन दिवस ही थंडी काही प्रमाणात राहणार आहे. त्यानंतर थंडी कमी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, जळगाव भागांत बऱ्यापैकी थंडी आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात थंडी किचित कमी आहे. कोकण, मराठवाडा व विदर्भातही काही प्रमाणात थंडी आहे. त्यामुळे राज्यात किमान तापमानाचा पारा ११ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.
शहरातील किमान तापमान (कंसात वाढ, घट झालेले तापमान)
- मुंबई (सांताक्रूझ) १७.४ (१)
- ठाणे १८.८
- अलिबाग १६.६ (-१)
- रत्नागिरी १९.८ (१)
- डहाणू १७.८ (१)
- पुणे १५.१ (४)
- जळगाव १२.५
- कोल्हापूर १९.६ (४)
- महाबळेश्वर १५.७ (२)
- मालेगाव १५.४ (५)
- नाशिक १३.५ (३)
- निफाड ११
- सांगली १७.३ (३)
- सातारा १६ (३)
- सोलापूर १८.१ (२)
- औरंगाबाद १५.५ (३)
- बीड १७.३ (३)
- परभणी १७.६ (३)
- परभणी कृषी विद्यापीठ १५.१
- नांदेड १७ (३)
- उस्मानाबाद १६ (१)
- अकोला १६.४ (२)
- अमरावती १५.७ (१)
- बुलडाणा १८.६ (४)
- चंद्रपूर १८ (३)
- नागपूर १४.९ (१)
- वर्धा १५.५ (१)
- यवतमाळ १५.५.
- 1 of 670
- ››