agriculture news in marathi, Rain prediction in vidarbha | Agrowon

विदर्भात वादळी पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 एप्रिल 2019

पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे राज्यातील कमी झालेला उन्हाचा चटका पुन्हा वाढणार आहे. सोमवारपर्यंत (ता. २२) कमाल तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याचा अंदाज आहे. तर पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २०) विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे राज्यातील कमी झालेला उन्हाचा चटका पुन्हा वाढणार आहे. सोमवारपर्यंत (ता. २२) कमाल तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याचा अंदाज आहे. तर पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २०) विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

गेल्या काही दिवसांत वादळी पावसाने हजेरी लावल्याने राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ४० अंशांच्या खाली घसरले आहे. शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४२.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर येथेही तापमान ४२ अंशांवर पाचले, तर नांदेड येथे ४०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दोन दिवसांपासून राज्यात पूर्वमोसमी पाऊस थांबला असून, मुख्यत: निरभ्र आकाश होते. शुक्रवारी दुपारनंतर गडचिरोलीसह पूर्व विदर्भात हलके ढग जमा झाले होते. 

विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती, मराठवाड्यापासून कोमोरीन भागापर्यंत खंडीत झालेल्या वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे असलेली द्रोणीय स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात आज (ता. २०) आणि उद्या (ता. २१) वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर कमाल तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

शुक्रवारी (ता. १९) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.७ (-१.१), धुळे ३६.६, जळगाव ३८.२ (-३.६), कोल्हापूर ३६.७ (-०.३), महाबळेश्वर ३१.५ (-०.४), मालेगाव ३६.४ (-३.९), नाशिक ३५.२ (-२.७), सांगली ३७.५ (-१.१), सातारा ३७.१ (०.३), सोलापूर ३९.५(-१.०), अलिबाग ३०.९ (-१.०), डहाणू ३२.३ (-०.५), सांताक्रूझ ३२.८ (०.०), रत्नागिरी ३३.५ (१.४), औरंगाबाद ३६.५ (-२.३), नांदेड ४०.५ (-०.५), परभणी ३९.५ (-१.०), अकोला ३८.५ (-२.६), अमरावती ३८.४ (-३.०), बुलडाणा ३५.६ (-२.०), बह्मपुरी ४२.१ (१.५), चंद्रपूर ४२.० (०.३), गोंदिया ३८.० (-२.४), नागपूर ३८.० (-२.६), वाशिम ३७.०, वर्धा ३९.५ (-२.१), यवतमाळ ३८.० (-२.७).

इतर अॅग्रो विशेष
पावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
बाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...
वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...
नीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण...
मराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटातऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान...
खरिपावर दुष्काळाचे सावट गडदपुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग...
चोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा,...
उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात...
राज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा...सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे...
देशात २४ राज्यांमध्ये पावसात तूटपुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून,...
चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...