agriculture news in Marathi, rain prediction in Vidarbha and Marathwada, Maharashtra | Agrowon

विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

कोजेन्सिस वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

पुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील तापमान आणि उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. मध्य भारतातील कमी दाब क्षेत्रामुळे विदर्भ, मराठवाड्यात आज (ता. २१) पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात जोराच्या सरी येण्याची शक्यता आहे. तर कोकणातही काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील तापमान आणि उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. मध्य भारतातील कमी दाब क्षेत्रामुळे विदर्भ, मराठवाड्यात आज (ता. २१) पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात जोराच्या सरी येण्याची शक्यता आहे. तर कोकणातही काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मध्य भारतातील उत्तर प्रदेश आणि झारखंड राज्यात हवेचे कमी दाब क्षेत्र सक्रीय आहे. तर मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा (मॉन्सून ट्रफ) पश्चिमेकडील भाग हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातही पाऊस थांबला आहे. तर मॉन्सून ट्रफचा पूर्व भाग कमी दाब क्षेत्राच्या केंद्रातून जात आहे. परिणामी, उत्तर आणि पूर्व भारतातील राज्यात पाऊस सुरू आहे. आज (ता. २१) विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाला पोषक हवामान आहे. 

पावसाच्या उघडपीमुळे राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३० अंशांच्या पुढे गले आहे. मंगळवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे सर्वाधिक ३४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील तापमान २० ते ३५ अंशांच्या दरम्यान आहे. तर कोकणात ३० ते ३३ अंश, मराठवाड्यात २९ ते ३४ अंश आणि विदर्भात २९ ते ३४ अंशांच्या आसपास आहे. 

मंगळवारी (ता. २०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.६ (२.९), जळगाव ३२.०(१.०), कोल्हापूर २९.८(२.८), महाबळेश्वर २०.६ (०.९), मालेगाव ३२.४ (२.२), नाशिक २९.० (१.०), सांगली ३०.६ (१.७), सातारा २९.६ (३.१), सोलापूर ३४.९ (३.६), अलिबाग ३२.७ (३.१), डहाणू ३१.३ (१.१), सांताक्रूझ ३१.२ (१.३), रत्नागिरी ३०.२ (१.४), औरंगाबाद ३२.२ (३.०), बीड ३४.३ (४.१), परभणी ३४.० (३.३), नांदेड २९.० (-२.४), उस्मानाबाद ३२.२ (३.०), अकोला ३२.६ (२.०), अमरावती ३०.४ (०.२), बुलडाणा २९.४ (२.१), ब्रह्मपुरी ३३.१ (२.८), चंद्रपूर ३२.४(१.६), गोंदिया ३१.५(१.०), नागपूर ३३.८ (३.३), वर्धा ३३.० (२.८), यवतमाळ ३०.५(१.३). 
 

मंगळवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :

कोकण : सावंतवाडी ३०, मोखेडा २०, विक्रमगड, जव्हार, शहापूर, भिरा प्रत्येकी १०. 

मध्य महाराष्ट्र : गिरणा धरण ३०, भुसावळ, यावल प्रत्येकी २०, ओझरखेडा, रावेर, मुक्ताईनगर, इगतपुरी, बोधवड प्रत्येकी १०.
मराठवाडा :  निलंगा, वाशी प्रत्येकी १०. 

विदर्भ : लाखणी ५०, भिवापूर, नागपूर प्रत्येकी ४०, सिंदेवाही, उमरेड, आष्टी, चिमूर, सेलू प्रत्येकी ३०, गोंदिया, बल्लारपूर, मौदा, भंडारा, कळमेश्वर,आर्वी, खारंघा, हिमायतनगर, साकोली, समुद्रपूर प्रत्येकी २०.  

घाटमाथा : दवडी ३०, आंबोणे २०, शिरगाव, ताम्हिणी, लोणावळा, ठाकूरवाडी, डुंगरवाडी, भिरा प्रत्येकी १०. 


इतर अॅग्रो विशेष
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...
साईप्रवरा शेतकरी कंपनीची उलाढाल पोचली...नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) परिसरातील...
उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोगकोल्हापूर : राज्यात उन्हाळी नाचणीचे यशस्वी...
बाजारात रानमेवा खातोय भावअकोला ः गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध...
बोगस कीडनाशकांची विक्री ४००० कोटींवर ! पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट...
शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी ‘...सोलापूर : ठाकरे सरकारकडून किचकट ऑनलाइन...
राज्यातील साखर उत्पादन घटणारपुणे: राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या...
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...
विदर्भापाठोपाठ खानदेशात थंडी वाढतेयपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे...
पणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारेअमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
नुकसानग्रस्तांना ५,३०० कोटींचा दुसरा...मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा...
साहेब, शेतीसाठी दिवसा वीज द्या हो...अकोला  ः रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू...
नोकरीला शेतीची जोड देत उंचावले अर्थकारणआसोदे (ता. जि. जळगाव) येथील नीलेश नारायण माळी एका...
प्रक्रिया उद्योगातून सोयाबीनचे...शहरी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड...
शेवतींच्या फुलांनी जिंकले मन !...मांजरी, पुणे : विविधरंगी शेवंतीच्या फुलांनी...