agriculture news in marathi rain predition in state today | Agrowon

वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाची आज शक्यता

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

आजपासून (ता.१०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज आहे.

पुणे : राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या असतानाच पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. आजपासून (ता.१०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर कोकणातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर कमाल तापमानात झालेली वाढही कायम राहण्याची शक्यता आहे.

राज्यात उन्हाचा चटका वाढला असतानाच पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने वारेही वाहू लागले आहे. त्यामुळे कमाल तापमानात काहीसे चढ-उतार होत आहेत. गुरूवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमानात थोडीशी घट झाल्याचे दिसून आले. तर विदर्भात मात्र तापमान वाढ झाली आहे. गुजरात राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातही तापमानात झालेली वाढ कायम राहणार आहे. गुरूवारी (ता.९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे सलग दुसऱ्या दिवशी उच्चांकी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

दरम्यान मध्य प्रदेश आणि विदर्भ परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यापासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. यामुळे पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असून, आजपासून (ता.१०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

गुरूवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.९, जळगाव ३८.४, धुळे ३८.६, कोल्हापूर ३५.९, महाबळेश्‍वर ३०.१, मालेगाव ४१.६, नाशिक ३४.३, निफाड ३४.५, सांगली ३६.०, सातारा ३६.१, सोलापूर ३९.१, डहाणू ३२.५, सांताक्रूझ ३२.१, रत्नागिरी ३३.४, औरंगाबाद ३६.६, परभणी ३९.१, नांदेड ३९.५, अकोला ४०.२, अमरावती ४०.०, बुलडाणा ३६.८, ब्रह्मपूरी ३९.६, गोंदिया ३८.२, नागपूर ३९.७, वर्धा ३९.५.


इतर अॅग्रो विशेष
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...
कृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...