विदर्भ, कोकणात पावसाची शक्यता

विदर्भ, कोकणात पावसाची शक्यता
विदर्भ, कोकणात पावसाची शक्यता

पुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात वाढ झाली आहे. यातच ढगाळ हवामानामुळे उकाडाही वाढला आहे. पूर्व भारतात असलेले कमी दाबाचे क्षेत्र झारखंड आणि बिहारकडे सरकले आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे विदर्भात काही ठिकाणी पावसाची; तर कोकणातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी पावसाची उघडीप कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   पूर्व भारतात असलेल्या कमी दाब प्रणालीमुळे झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेशात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. विदर्भातही काही भागात पावसाच्या जोरदार सरींची शक्यता आहे; तर कर्नाटक, केरळच्या किनाऱ्यालगत असलेला कमी दाबाचा पट्टा आणि हवेचे पूर्वपश्चिम जोडक्षेत्र यामुळे दक्षिण भारतातील राज्यातही पावसाचा जोर वाढणार आहे. कोकणातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३० अंशांच्या पुढे गले आहे. सोमवारी (ता.१९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  सोमवारी (ता. १९) सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.४ (१.१), जळगाव ३१.४(०.५), कोल्हापूर २८.२ (१.९), महाबळेश्वर १९.५ (-०.१), मालेगाव ३२.८ (३.२), नाशिक २७.६ (-०.३), सांगली २८.५ (०.१), सातारा २७.७ (१.५), सोलापूर ३२.८ (१.८), अलिबाग ३२.० (२.६), डहाणू ३१.० (०.९), सांताक्रूझ ३१.७ (१.९), रत्नागिरी ३०.२ (१.८), औरंगाबाद ३१.० (१.९), परभणी ३३.५ (३.०), नांदेड ३२.५ (१.२), अकोला ३२.५ (१.९), अमरावती ३२.० (२.२), बुलडाणा ३०.५ (३.२), ब्रह्मपुरी ३४.४ (४.६), चंद्रपूर ३२.८ (२.४), गोंदिया ३२.५ (२.१), नागपूर ३४.० (३.४), वर्धा ३३.५ (३.५), यवतमाळ ३१.० (२.१).  सोमवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रात ः हवामान विभाग) :

कोकण : दोडामार्ग, मालवण प्रत्येकी ३०, वैभववाडी, सावंतवाडी, मुलदे प्रत्येकी २०, राजापूर, कणकवली, श्रीवर्धन, तळा, माथेरान, ठाणे, मंडणगड, संगमेश्वर, भिरा, कुडाळ प्रत्येकी २०. 

मध्य महाराष्ट्र : पारोळा, भाडगाव प्रत्येकी ३०, पाचोरा, पेठ प्रत्येकी २०, ओझरखेडा, गगणबावडा, इगतपुरी, महाबळेश्वर, हर्सुल, धुळे, लोणावळा, त्र्यंबकेश्वर, चांदवड, राहुरी प्रत्येकी १०. 

मराठवाडा : नांदेड ४०, सोयगाव, निलंगा, चाकूर प्रत्येकी ३०, आंबेजोगाई, शिरूर अनंतपाळ, लोहा प्रत्येकी १०. 

विदर्भ : बुलडाणा २०, अहेरी, गडचिरोली, धारणी, सिंदेवाही, चामोर्शी, मुल, सिरोंचा, सावळी प्रत्येकी १०. 

घाटमाथा : आंबोणे, शिरगाव, दावडी, ताम्हिणी प्रत्येकी २०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com