agriculture news in marathi, rain predtiction in Vidharbha, Konkan | Page 2 ||| Agrowon

विदर्भ, कोकणात पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

पुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात वाढ झाली आहे. यातच ढगाळ हवामानामुळे उकाडाही वाढला आहे. पूर्व भारतात असलेले कमी दाबाचे क्षेत्र झारखंड आणि बिहारकडे सरकले आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे विदर्भात काही ठिकाणी पावसाची; तर कोकणातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी पावसाची उघडीप कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

पुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात वाढ झाली आहे. यातच ढगाळ हवामानामुळे उकाडाही वाढला आहे. पूर्व भारतात असलेले कमी दाबाचे क्षेत्र झारखंड आणि बिहारकडे सरकले आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे विदर्भात काही ठिकाणी पावसाची; तर कोकणातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी पावसाची उघडीप कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

पूर्व भारतात असलेल्या कमी दाब प्रणालीमुळे झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेशात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. विदर्भातही काही भागात पावसाच्या जोरदार सरींची शक्यता आहे; तर कर्नाटक, केरळच्या किनाऱ्यालगत असलेला कमी दाबाचा पट्टा आणि हवेचे पूर्वपश्चिम जोडक्षेत्र यामुळे दक्षिण भारतातील राज्यातही पावसाचा जोर वाढणार आहे. कोकणातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३० अंशांच्या पुढे गले आहे. सोमवारी (ता.१९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

सोमवारी (ता. १९) सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.४ (१.१), जळगाव ३१.४(०.५), कोल्हापूर २८.२ (१.९), महाबळेश्वर १९.५ (-०.१), मालेगाव ३२.८ (३.२), नाशिक २७.६ (-०.३), सांगली २८.५ (०.१), सातारा २७.७ (१.५), सोलापूर ३२.८ (१.८), अलिबाग ३२.० (२.६), डहाणू ३१.० (०.९), सांताक्रूझ ३१.७ (१.९), रत्नागिरी ३०.२ (१.८), औरंगाबाद ३१.० (१.९), परभणी ३३.५ (३.०), नांदेड ३२.५ (१.२), अकोला ३२.५ (१.९), अमरावती ३२.० (२.२), बुलडाणा ३०.५ (३.२), ब्रह्मपुरी ३४.४ (४.६), चंद्रपूर ३२.८ (२.४), गोंदिया ३२.५ (२.१), नागपूर ३४.० (३.४), वर्धा ३३.५ (३.५), यवतमाळ ३१.० (२.१). 

सोमवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रात ः हवामान विभाग) :

कोकण : दोडामार्ग, मालवण प्रत्येकी ३०, वैभववाडी, सावंतवाडी, मुलदे प्रत्येकी २०, राजापूर, कणकवली, श्रीवर्धन, तळा, माथेरान, ठाणे, मंडणगड, संगमेश्वर, भिरा, कुडाळ प्रत्येकी २०. 

मध्य महाराष्ट्र : पारोळा, भाडगाव प्रत्येकी ३०, पाचोरा, पेठ प्रत्येकी २०, ओझरखेडा, गगणबावडा, इगतपुरी, महाबळेश्वर, हर्सुल, धुळे, लोणावळा, त्र्यंबकेश्वर, चांदवड, राहुरी प्रत्येकी १०. 

मराठवाडा : नांदेड ४०, सोयगाव, निलंगा, चाकूर प्रत्येकी ३०, आंबेजोगाई, शिरूर अनंतपाळ, लोहा प्रत्येकी १०. 

विदर्भ : बुलडाणा २०, अहेरी, गडचिरोली, धारणी, सिंदेवाही, चामोर्शी, मुल, सिरोंचा, सावळी प्रत्येकी १०. 

घाटमाथा : आंबोणे, शिरगाव, दावडी, ताम्हिणी प्रत्येकी २०


इतर अॅग्रो विशेष
मत्स्यदुष्काळ का जाहीर होत नाही?शासनाचे मत्स्यदुष्काळाबाबतचे धोरण अत्यंत चुकीचे...
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...
साईप्रवरा शेतकरी कंपनीची उलाढाल पोचली...नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) परिसरातील...
उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोगकोल्हापूर : राज्यात उन्हाळी नाचणीचे यशस्वी...
बाजारात रानमेवा खातोय भावअकोला ः गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध...
बोगस कीडनाशकांची विक्री ४००० कोटींवर ! पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट...
शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी ‘...सोलापूर : ठाकरे सरकारकडून किचकट ऑनलाइन...
राज्यातील साखर उत्पादन घटणारपुणे: राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या...
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...
विदर्भापाठोपाठ खानदेशात थंडी वाढतेयपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे...
पणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारेअमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
नुकसानग्रस्तांना ५,३०० कोटींचा दुसरा...मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा...
साहेब, शेतीसाठी दिवसा वीज द्या हो...अकोला  ः रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू...
नोकरीला शेतीची जोड देत उंचावले अर्थकारणआसोदे (ता. जि. जळगाव) येथील नीलेश नारायण माळी एका...
प्रक्रिया उद्योगातून सोयाबीनचे...शहरी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड...