पुणे, नाशिकमध्ये पावसाची दाणादाण

राज्यातील अनेक भागांत गारपीटीसह अवकाळी पावसाने दाणादाण उडवली आहे. सोमवारी (ता.२२) दुपारनंतर पुणे, नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
Hawaman
Hawaman

पुणे : राज्यातील अनेक भागांत गारपीटीसह अवकाळी पावसाने दाणादाण उडवली आहे. सोमवारी (ता.२२) दुपारनंतर पुणे, नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांच्या नुकसानीत भर पडत आहे. 

मराठवाडा व विदर्भात मागील तीन दिवस गारपीटीने चांगलेच नुकसान केले. त्यापाठोपाठ मध्य महाराष्ट्रातही अवकाळी पावसाचा प्रभाव वाढला आहे. सोमवारी सकाळपासून अंशतः ढगाळ वातावरण होते. त्यामुळे वाढलेला उन्हाचा चटका काहीसा कमी झाला असून कमाल तापमानातही बऱ्यापैकी घट झाली आहे. दुपारनंतर अचानक पुणे शहर व परिसरात जोरदार पाऊस पडला. शिरूर, भोर, खेड, पुरंदर या भागातही व पुणे शहराच्या उपनगरातही हवामान चांगलेच ढगाळ होते. 

काही ठिकाणी जोरदार वारे वाहत होते. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील पश्चिम भागात अंतापूर, ताहाराबाद, तळवाडे, पटावे भागातही हलक्या सरी पडल्या. तर वादळवारा वाहत असल्याने अडचणी वाढण्याची भीती शेतकऱ्यांपुढे आहे. अनेक भागात रविवारीही पाऊस व गारपीट झाल्याने नुकसान झाले आहे.     आज गारपिटीचा इशारा मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भाग ते कर्नाटकाची किनारपट्टी या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. यामुळे सोमवार (ता.२२) मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलडाणा या जिल्ह्यांत पुन्हा गारपीट होण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणार असून विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल. इतर जिल्ह्यांत तुरळक सरी पडणार असून आज (ता.२३) अशीच स्थिती कायम राहणार आहे. गुरुवारपासून (ता.२५) राज्यात ढगाळ वातावरणाचा प्रभाव कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

सोमवारी (ता.२२) सकाळपर्यंतच्या २४ तासात विविध शहरातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः

  • मुंबई (सांताक्रुझ) ३२.२
  • अलिबाग ३०.७  
  • रत्नागिरी ३२.९  
  • डहाणू ३३.४  
  • पुणे ३५.८
  • जळगाव ३६.२
  • कोल्हापूर ३६.५  
  • महाबळेश्वर ३०.८    
  • नाशिक ३५.१
  • सांगली ३५.१
  • सातारा ३४.५
  • सोलापूर ३७.४  
  • औरंगाबाद ३४.३
  • परभणी ३४.८
  • नांदेड ३७.५
  • अकोला ३५.७
  • अमरावती ३५.८
  • बुलडाणा ३३.६
  • ब्रम्हपुरी ३८.३
  • चंद्रपूर ३७.२  
  • गोंदिया ३५.४
  • नागपूर ३६.३
  • वर्धा ३६.०  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com