agriculture news in Marathi rain in Pune and Nashik District Maharashtra | Page 2 ||| Agrowon

पुणे, नाशिकमध्ये पावसाची दाणादाण

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 मार्च 2021

राज्यातील अनेक भागांत गारपीटीसह अवकाळी पावसाने दाणादाण उडवली आहे. सोमवारी (ता.२२) दुपारनंतर पुणे, नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

पुणे : राज्यातील अनेक भागांत गारपीटीसह अवकाळी पावसाने दाणादाण उडवली आहे. सोमवारी (ता.२२) दुपारनंतर पुणे, नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांच्या नुकसानीत भर पडत आहे. 

मराठवाडा व विदर्भात मागील तीन दिवस गारपीटीने चांगलेच नुकसान केले. त्यापाठोपाठ मध्य महाराष्ट्रातही अवकाळी पावसाचा प्रभाव वाढला आहे. सोमवारी सकाळपासून अंशतः ढगाळ वातावरण होते. त्यामुळे वाढलेला उन्हाचा चटका काहीसा कमी झाला असून कमाल तापमानातही बऱ्यापैकी घट झाली आहे. दुपारनंतर अचानक पुणे शहर व परिसरात जोरदार पाऊस पडला. शिरूर, भोर, खेड, पुरंदर या भागातही व पुणे शहराच्या उपनगरातही हवामान चांगलेच ढगाळ होते. 

काही ठिकाणी जोरदार वारे वाहत होते. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील पश्चिम भागात अंतापूर, ताहाराबाद, तळवाडे, पटावे भागातही हलक्या सरी पडल्या. तर वादळवारा वाहत असल्याने अडचणी वाढण्याची भीती शेतकऱ्यांपुढे आहे. अनेक भागात रविवारीही पाऊस व गारपीट झाल्याने नुकसान झाले आहे.    

आज गारपिटीचा इशारा
मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भाग ते कर्नाटकाची किनारपट्टी या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. यामुळे सोमवार (ता.२२) मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलडाणा या जिल्ह्यांत पुन्हा गारपीट होण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणार असून विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल. इतर जिल्ह्यांत तुरळक सरी पडणार असून आज (ता.२३) अशीच स्थिती कायम राहणार आहे. गुरुवारपासून (ता.२५) राज्यात ढगाळ वातावरणाचा प्रभाव कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

सोमवारी (ता.२२) सकाळपर्यंतच्या २४ तासात विविध शहरातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः

 • मुंबई (सांताक्रुझ) ३२.२
 • अलिबाग ३०.७  
 • रत्नागिरी ३२.९  
 • डहाणू ३३.४  
 • पुणे ३५.८
 • जळगाव ३६.२
 • कोल्हापूर ३६.५  
 • महाबळेश्वर ३०.८    
 • नाशिक ३५.१
 • सांगली ३५.१
 • सातारा ३४.५
 • सोलापूर ३७.४  
 • औरंगाबाद ३४.३
 • परभणी ३४.८
 • नांदेड ३७.५
 • अकोला ३५.७
 • अमरावती ३५.८
 • बुलडाणा ३३.६
 • ब्रम्हपुरी ३८.३
 • चंद्रपूर ३७.२  
 • गोंदिया ३५.४
 • नागपूर ३६.३
 • वर्धा ३६.०
   

इतर अॅग्रो विशेष
सोयापेंडेसाठी आयातदारांची अनेक देशांत...पुणे ः केंद्र सरकारने जनुकीय सुधारित...
फळगळ विषयक ‘त्या’ संदेशापासून राहा सावधनागपूर ः केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या...
प्रत्येक शाळेमध्ये उभारणार लोकसहभागातून...पुणे : वेगाने बदलत असलेल्या हवामानाची शाळेतील...
सेंद्रिय उत्पादनांचा ‘सात्त्विक कृषिधन...नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीप्रणीत शेतकरी उत्पादक...
आंबा, काजू, फणसापासून चॉकलेट मोदकांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोरे (वाडोस) येथील...
विमा कंपन्यांवर पूर्वसूचनांचा पाऊस !...पुणे : राज्याच्या विविध भागांत झालेल्या...
लाळ्या खुरकूत लसींची प्रतीक्षाच;...पुणे ः पावसाळा संपत आला तरी अद्याप राज्यातील दोन...
मॉन्सूनच्या परतीचा मुहूर्त लांबणारपुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून)...
राज्यात पावसाच्या उघडिपीची शक्यतापुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
श्रमदानातून ‘चुंब’ गाव झाले जल...स्वच्छता, रस्ते, भूमिगत गटार आदी विविध पायाभूत...
राज्यात हलक्या पावसाची शक्यता पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. आज (ता. १६...
सोयाबीनचा उच्चांकी दर मिळतोय अत्यल्प...अकोला ः सध्या बाजारात सोयाबीनला कुठे दहा हजार,...
...तर ‘त्या’ नेत्यास एकरभर जमीन बक्षीस...कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारकडून एकरकमी...
पाणलोट चळवळीचे आधारवड फादर हर्मन बाखर...नगर ः महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी आयुष्‍य...
रब्बी हंगामात होणार ८४८३ शेतीशाळा पुणे ः रब्बी हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना...
सोयाबीन उत्पादकांनी टार्गेट ठेवूनच...पुणे : मध्य प्रदेशात सोयाबीनची आवक हळूहळू वाढत...
खानदेशात केळी दर स्थिरजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची आवक दिवसागणिक...
घोटभर पाणी बेतले मायलेकीच्या जिवावरउंडवडी, जि. पुणे :  पिण्यासाठी पाणी काढताना...
हरभरा पीक करणार यंदाही रब्बीचे नेतृत्व पुणे ः राज्यात खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून...
मोसंबी, शेडनेटसह सेंद्रिय पद्धतीने...पारंपरिक मोसंबी बागेतील लागवड अंतर व वाणातील बदल...