agriculture news in marathi, rain in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यात पावसाच्या सर्वदूर सरी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

पुणे : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून, पूर्व भागात मात्र हलक्या ते मध्यम सरी येत आहेत. जवळपास आठवडाभर असलेल्या ढगाळ हवामानामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांत सूर्यदर्शन झाले नाही. मावळ भागात भातखाचरे ओसंडून वाहत आहेत. पेरणी झालेल्या भागात पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पावसाने उघडीप न दिल्याने काही भागात पेरण्या व शेतीची कामे खोळंबली आहेत. 

पुणे : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून, पूर्व भागात मात्र हलक्या ते मध्यम सरी येत आहेत. जवळपास आठवडाभर असलेल्या ढगाळ हवामानामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांत सूर्यदर्शन झाले नाही. मावळ भागात भातखाचरे ओसंडून वाहत आहेत. पेरणी झालेल्या भागात पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पावसाने उघडीप न दिल्याने काही भागात पेरण्या व शेतीची कामे खोळंबली आहेत. 

बुधवारी (ता.३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुळशी, भोर, मावळ, वेल्हा व जुन्नर तालुक्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. लोणावळा येथे सर्वाधिक १४४ मिलिमीटर पाऊस पडला. तर खेड, आंबेगाव तालुक्यात पावसाचा जोर काहीसा कमी होता. हवेलीसह पूर्व भागातील शिरूर, बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर तालुक्यात सातत्याने हलक्या ते मध्यम सरी येत राहिल्या.  

धरणातून विसर्ग सुरूच

धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने अनेक धरणांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने अनेक धरणांमधून विसर्ग सुरूच आहे. भीमा नदीच्या पाण्यामुळे उजनीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. बुधवारी जिल्ह्यातील वीर, खडकवासला, कासारसाई, आंद्रा, चासकमान, कलमोडी, वडज, येडगाव या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. खडकवासला धरणातून सुमारे ९ हजारहून अधिक, तर वीर धरणातून १४ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. 

मंडळनिहाय पाऊस (मिमी) स्रोत : महसूल विभाग) 

पौड  ७९
घोटावडे ८५
माले ९५
मुठा  ९० 
पिरंगुट ८१
भोलावडे   १४८ 
आंबवडे ४२ 
संगमनेर   ६५ 
निगुडघर ८५
काळे १३० 
कार्ला  ९२ 
खडकाळा ६४
लोणावळा १४४ 
शिवणे ५५ 
वेल्हा  १०६ 
पानशेत ७८ 
विंझर ७३ 
आंबवणे ६६
जुन्नर ४० 
राजूर १५७ 
डिंगोरे  ४९ 
आपटाळे ७८
वाडा  ५२
कुडे ४८
आंबेगाव (डिंभे)   ४४

 

इतर ताज्या घडामोडी
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...
वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाअकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या...
विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्यासोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने...
मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक...नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन...
कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी...मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी...
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के...कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार...
जळगावात वांगी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१८...
तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, की...सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता...
मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे...औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या...