पुणे जिल्ह्यात पावसाची हजेरी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : जिल्‍ह्याच्या पश्‍चिम भागात असलेल्या तालुक्यांमध्ये तसेच धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे धरणांतील पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये लोणावळा येथे सर्वाधिक १३६ तर भोलावडे येथे १०५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पूर्व भागात असलेल्या तालुक्यांमध्ये ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे.   

जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांत पावसाचा जोर कायम आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड, हवेली तालुक्यांत दिवसभर पावसाच्या सरीमागून सरी येत आहेत. पूर्व भागातील शिरूर, पुरंदर, दौंड तालुक्यांत हलका पाऊस पडला तर बारामती आणि इंदापूर तालुक्यांत पावसाची उघडीप होती. मंगळवारी सकाळपासून जिल्ह्याच्या बहुतांशी भागात ढगाळ हवामान होते. बहुतांशी भागात पावसाची रिपरिप सुरू होती.

सोमवारी धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह धरण परिसरातही पावसाचा जोर काहीसा वाढला होता. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत टेमघर परिसरात ४७, वरसगाव धरणक्षेत्रात ३३, पानेशत धरणक्षेत्रात ३४, पवना धरणक्षेत्रात ६४, कासारसाई धरणक्षेत्रात २१, मुळशी धरणक्षेत्रात ७४, आंद्रा धरणक्षेत्रात ३१, वडीवळे धरणक्षेत्रात १६०, गुंजवणी धरणक्षेत्रात २५, भाटघर धरणक्षेत्रात २५, निरा देवघर धरण क्षेत्रात ४३ मिलीमीटर पाऊस पडला.

सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये सर्व धरणांमध्ये मिळून तब्बल साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यात ४५ टीएमसी (२१ टक्के) पाणीसाठा झाला असल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले. 

जिल्ह्यात मंगळवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये - स्रोत कृषी विभाग) : पौड ३२, घोटावडे ४३, माले ७४, मुठे ४७, भोलावडे १०५, आंबवडे ३६, संगमनेर ३०, निगुडघर ४३, वडगाव मावळ ३५, काले ६४, कार्ला ७२, खडकाळा ५९, लोणावळा १३६, वेल्हा ४७, पाणशेत ३७, विंझर ३४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com