agriculture news in marathi, rain in pune district, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पुणे  : जिल्ह्यात गुरुवारी (ता. १६) सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. पश्‍चिम भागात पावसाचा जोर अधिक असला तरी दुष्काळी पट्ट्यातील शिरूर, बारामती, इंदापूर, दाैंड, पुरंदर तालुक्यात मोठ्या खंडानंतर पडलेल्या हलक्या ते मध्यम पावसाने दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जुन्नर तालुक्यातील राजूर येथे सर्वाधिक २१० मिलिमीटर पावसाची नाेंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

पुणे  : जिल्ह्यात गुरुवारी (ता. १६) सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. पश्‍चिम भागात पावसाचा जोर अधिक असला तरी दुष्काळी पट्ट्यातील शिरूर, बारामती, इंदापूर, दाैंड, पुरंदर तालुक्यात मोठ्या खंडानंतर पडलेल्या हलक्या ते मध्यम पावसाने दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जुन्नर तालुक्यातील राजूर येथे सर्वाधिक २१० मिलिमीटर पावसाची नाेंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. यातच बुधवारपासून (ता. १५) सुरू झालेल्या पावसाने गुरुवारी दिवसभर रिपरिप सुरूच ठेवल्याने खरिपाला मोठा दिलासा मिळाला अाहे. पश्‍चिम भागातील तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार कोसळणाऱ्या पावसाने कोरडवाहू पूर्व पट्ट्यातही समाधानकारक हजेरी लावली. शिरूर तालुक्यात १५ ते २५, बारामतीमध्ये ६ ते २०, इंदापुरात ११ ते २५, दौंडमध्ये ११ ते २८ तर पुरंदर तालुक्यात ५ ते ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस भिज पाऊस स्वरूपाचा असल्याने पिकांना अधिक फायदेशीर ठरणार आहे.

शुक्रवारी (ता. १७) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) : पुणे : माले ४०, मुठे ५१, निगुडघर ३८, काले ४२, कार्ला ४२, खडकाळा ४३, लोणावळा ११७, वेल्हा ३१, जुन्नर ४०, निमगाव सावा ३७, बेल्हा ३८, राजूर २१०, डिंगोरे ४६, आपटाळे ९५, वाडा ५८, कुडे ४५, घोडेगाव ५५, आंबेगाव ६६, मंचर ३८.  
 

जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. धरणे पूर्णपणे भरल्याने यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करावा लागत आहे. वरसगाव, पानशेतमधून पाणी सोडण्यात आल्याने शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता खडकवासला धरणातून विसर्ग वाढवून १८ हजार ४९१ क्युसेक वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात येत हाेते.

सकाळी वीर धरणातून सर्वाधिक २३ हजार १८५ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. डिंभे १५ हजार, चासकमान ९ हजार, मुळशी ८ हजार, निरा देवघर ८ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.भीमेच्या खोऱ्यातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

इतर ताज्या घडामोडी
राज्यात हिरव्या मिरचीला १८०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला...
अकोल्यात कृषी सहायकांचे पदोन्नतीच्या...अकोला  ः अमरावती विभागातील कृषी सहायकांच्या...
सांगलीच्या पूर्व भागातील अग्रणी कोरडीठाकसांगली  ः  सांगली जिल्ह्याच्या चार...
सातारा जिल्ह्यातील ‘मराठवाडी’च्या...ढेबेवाडी, जि. सातारा : गेल्या काही...
नगर जिल्ह्यात चार महसूल मंडळांत पावसाची...नगर : जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाने...
हलक्या सरींना सुकलेल्या पिकांना...उस्मानाबाद/ लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद...
‘पोकरा’तील शेतकऱ्यांनाही मिळणार सूक्ष्म...अकोला  ः राज्यात दुष्काळाच्या झळा सहन...
राज ठाकरे यांची दिवसभर चौकशीमुंबई ः कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत...
मागासवर्गीय शेतकऱ्यांना विहिरींसाठी ३७४...पुणे  : राज्यातील मागास गटातील शेतकऱ्यांना...
एचटी कापूस वाण परवानगीची बियाणे...नागपूर ः शेतकऱ्यांकडून अवैधरीत्या तणाला सहनशील (...
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...