agriculture news in Marathi rain in Pune, Nagar and Solapur Maharashtra | Agrowon

पुणे, नगर, सोलापूरात पूर्वमोसमीचा दणका 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 एप्रिल 2020

वादळीवारे गारपीटीसह पडणाऱ्या पूर्वमोसमी पावसाने राज्याच्या विविध भागात हजेरी लावली आहे. सोमवारी (ता.२०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पुणे, नगर, सोलापूरमधील काही तालुक्यात पुन्हा दणका दिला आहे.

पुणे: वादळीवारे गारपीटीसह पडणाऱ्या पूर्वमोसमी पावसाने राज्याच्या विविध भागात हजेरी लावली आहे. सोमवारी (ता.२०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पुणे, नगर, सोलापूरमधील काही तालुक्यात पुन्हा दणका दिला आहे. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे शेतातच अडकून पडलेल्या पिकांचे या पावसामुळे नुकसान होत आहे. 

पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, भोर, मावळ तालुक्यात रविवारी (ता.१९) दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने इंदापूर तालुक्यात गहू, ऊस, भाजीपाला, डाळिंब, द्राक्षे, आंबा, चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बारामतीमध्ये जोरदार वारे, गारांसह झालेल्या पावसामुळे शेतात उरली सुरली फळांची झाडे तसेच कडवळ, मका, केळी, बाजरी, कारले आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. भोर तालुक्यात गहू, हरभरा, कांदा, बागायतीमधील घेवडा, भुईमूग, पालेभाज्यांना फटका बसला आहे. दौंड तालुक्यात झालेल्या हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे कलिंगड, खरबूज, द्राक्षे, आंबे, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. 

नगर जिल्‍ह्यातील कर्जत, श्रीगोंदा तालुक्यात रविवारी (ता.१९) सायंकाळी जोरदार गारांसह वादळी पाऊस झाला. या पावसाचा पाचशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला फटका बसला आहे. द्राक्ष, संत्रा, मोसबी फळबागांचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. नगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुक्यातील शेडगावसह दहा गावांच्या परिसरात तर कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रीक, ताजू, तळवडी, कुळधरण, जलालपूर, घोगरगाव परिसरात रविवारी रात्री जोरदार वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाला. यात चारापिकांसह भाजीपाला, फळांचे नुकसान झाले. 

सोलापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.२०) पहाटे पावणे एकच्या सुमारास पुन्हा एकदा सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दोन दिवसांत शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागला. जिल्ह्यात पंढरपूर, सांगोला, माढा, करमाळा, उत्तर सोलापूर, मोहोळ या भागात शनिवारी रात्री आणि रविवारी काही भागात सलगपणे पाऊस झाला. त्यानंतर सोमवारी पहाटे पावणेएकच्या सुमारास वादळवारे आणि विजेच्या कडकडाटासह पावसाने मोहोळ, बार्शी, उत्तर सोलापूर, पंढरपूर भागात हजेरी लावली. द्राक्ष, डाळिंब, केळी, कांदा, भाजीपाला पिकांना तडाखा बसला.


इतर अॅग्रो विशेष
लेखाजोखा मोदी सरकारचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...
झळाळी पिवळ्या सोन्याची!मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...