agriculture news in marathi, rain in ratnagiri, maharashtra | Agrowon

राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर तालुक्यांत पाऊस

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर तालुक्यात पाऊस सुरू आहे. ऐन भात कापणीत पावसाचा व्यत्यय आला आहे. विजांच्या कडकडाटासह पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. कापणी केलेल्या भातात पाणी साचून राहिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी भात पडून नुकसान झाले आहे. 

शनिवारी (ता. १९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत दापोली येथे सरासरी ७, खेड येथे १४, गुहागर येथे ३ चिपळूण येथे ६, संगमेश्ववर येथे ५, रत्नागिरी येथे १२, लांजा येथे ९, राजापूर येथे ५२ मिमी. पावसाची नोंद झाली.

रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर तालुक्यात पाऊस सुरू आहे. ऐन भात कापणीत पावसाचा व्यत्यय आला आहे. विजांच्या कडकडाटासह पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. कापणी केलेल्या भातात पाणी साचून राहिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी भात पडून नुकसान झाले आहे. 

शनिवारी (ता. १९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत दापोली येथे सरासरी ७, खेड येथे १४, गुहागर येथे ३ चिपळूण येथे ६, संगमेश्ववर येथे ५, रत्नागिरी येथे १२, लांजा येथे ९, राजापूर येथे ५२ मिमी. पावसाची नोंद झाली.

आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ४८५७ मिमी. पाऊस झाला. गेले तीन दिवस सायंकाळच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळत होत्या; मात्र शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी राजापूर, रत्नागिरीत संततधार पावसाला सुरवात झाली जोडीला वेगवान वारे आणि विजांचा कडकडाटही सुरू होता. 

सकाळच्या सत्रात आकाश निरभ्र असल्याने अनेक शेतकऱ्‍यांनी भातकापणीला सुरवात केली होती; मात्र दुपारच्या सत्रात पावसाने सुरुवात केली आणि सर्वांचीच तारांबळ उडाली. कापणी करून वाळण्यासाठी ठेवलेले भातपीक गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरू झाली. अनेक ठिकाणी कापणी केलेले भातपिक भिजून गेले. पाऊस थांबल्यानंतर हे पीक पुन्हा सुकवावे लागणार आहे.


इतर बातम्या
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
किटकनाशकांचा अतिवापर टाळावा ः घाडगेपुणे : ‘‘खरीप हंगामात पिकांवर रोग किडीवर मोठ्या...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
टोमॅटोवर जिवाणूजन्य ठिपक्या रोगाचा...नाशिक: चालू वर्षी टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा ५०...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पातील उपयुक्त...
परस्पर पुनर्गठन केल्याने शेतकरी...दानापूर, जि. अकोला ः येथील सेवा सहकारी सोसायटीने...
राज्यातील साखर कारखान्यांकडून एफआरपीचे...पुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी लॉकडाउन आणि...
शेतमाल नियमनमुक्ती : आहे मनोहर, तरी... पुणे ः संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीचे स्वागतच आहे....
कृषी सुविधा निधीला आजपासून प्रारंभनवी दिल्ली ः कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या...