agriculture news in Marathi rain reduced in Kolhapur Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

 जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परिणामी पूरस्थिती आटोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोल्हापूर: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परिणामी पूरस्थिती आटोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

रविवारी(ता.) दुपारी नदीची पातळी धोका पातळीपेक्षा दोन इंचाने कमी राहिली. याच बरोबर राधानगरी धरणातून होणारा विसर्ग ही थांबला आहे. यामुळे पाणी दोन दिवसात ओसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी दुपारी दोन वाजता पंचगंगा नदीची पातळी राजाराम बंधारा जवळ ४२ फूट १० इंच इतकी होती. या ठिकाणी पाणी धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. 

राधानगरी धरणाच्या दोन दरवाजातून होणारा विसर्ग रविवारी सकाळी पूर्णपणे थांबला. सध्या राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून केवळ १४०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत होत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

धरणातून विसर्ग घटल्याने भोगावती पर्यायाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत येत्या दोन दिवसात घट होण्याची शक्यता पाटबंधारे विभागातून व्यक्त करण्यात आली. पश्चिम भाग वगळता जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यामध्ये पावसाचा जोर ओसरला आहे. थांबून थांबून हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी सुरू होत्या. 

जिल्ह्यात अन्य ठिकाणी दोन तीन तासांनी एखादी हलकी सर पावसाचे स्वरूप आहे. वारणा धरणातून ८००० क्युसेक पाण्याचा विसर्ग विसर्ग सुरू आहे. अन्य धरणातून पाण्याचा विसर्ग काही प्रमाणात कमी केल्याने पूरस्थिती लवकर नियंत्रणात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांमध्ये गगनबावडा तालुक्‍यात सर्वाधिक ६५ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील विविध नद्यांवरील ६७ बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत. 
 


इतर अॅग्रो विशेष
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...
नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...
कुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...
काजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...
सोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...
झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...