दुष्काळी भागाला पावसाने दिलासा

पाऊस
पाऊस

पुणे : दोन  आठवड्यांपेक्षा अधिक काळापासून दडी मारल्यानंतर दोन दिवसांपासून पावसाने  पुन्हा जोर धरला आहे. दुष्काळी भागात झालेल्या पावसाने अडचणीत आलेल्या खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला आहे. मराठवाडा आणि कोकणात पावसाचा जोर अधिक आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागांतही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. रविवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सिंधुदुर्गमधील सावंतवाडी येथे सर्वाधिक १४८ मिलिमीटर तर मराठवाड्यातील अर्धापूर येथे १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.  दोन दिवसांपासून राज्यातच्या अनेक भागांत पाऊस पडत आहे. दुष्काळात होपळणाऱ्या मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील सर्वदूर हलका ते जोरदार पावसाने हजरी लावली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यातील सहा, जालना जिल्ह्यातील एका मंडळात मंडळांमध्ये १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे महसूल विभागातर्फे सांगण्यात आले. सलग दुसऱ्या दिवशी सर्वदूर हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावल्याने ओढे, नाले, नद्या प्रवाहित झाल्या. लघू तलावांच्या पाणीपातळीत थोडी वाढ झाली. धोक्यात आलेल्या खरीप हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मुगट मंडळांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कालवा फुटला आहे. पुरामध्ये दोन शेळ्या, दोन म्हशी वाहून गेल्या.  रविवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : डहाणू ३३, जव्हार ६६., मोखेडा ४५, तलासरी ३१, विक्रमगड ८७, वाडा १०९, भिरा ४३, कर्जत ६५, खालापूर ८९, महाड ५७, माथेरान १४१, म्हसळा ४७, मुरूड २३, पनवेल १०२, पेण ७०, पोलदापूर ६५, रोहा, श्रीवर्धन ४३, सुधागड पाली ४२, तळा ३९, चिपळूण २३, गुहागर २१,  खेड ९०, लांजा ५६, मंडणगड ४२, राजापूर ५२, रत्नागिरी ४७, संगमेश्वर ४१, देवगड ४६, दोडामार्ग १०५, कणकवली, कुडाळ, मालवण, सावंतवाडी १४८, वैभववाडी ५४, वेंगुर्ला ८५, अंबरनाथ ७२, भिवंडी २८, कल्याण ३६, शहापूर ६०, ठाणे ४४, उल्हासनगर ८४.  मध्य महाराष्ट्र : नेवासा ५२, पाथर्डी २०, शेवगाव ४१, धुळे ३५, अंमळनेर ४३, भाडगाव ३८, चाळीसगाव २९, दहीगाव ४९, एरंडोल २६, जामनेर ६२, चंदगड २४, गगणबावडा ९०, पन्हाळा २०, राधानगरी ३४, शाहूवाडी २६, आक्रणी २८, चंदगड ४०, इगतपुरी ३७, मालेगाव ३५, नांदगाव २०, ओझरखेडा ३१, पेठ ३१, इंदापूर १९, लोणावळा ५८, महाबळेश्वर ४७, बार्शी ३०, करमाळा २०. मराठवाडा : गंगापूर ३०, कन्नड ५७, पैठण ६०, फुलंब्री १००, वैजापूर ३३, आंबेजोगाई २४, गेवराई २५, माजलगाव ३९, परळी वैजनाथ २०, वाडवणी २५, औंढा नागनाथ ४५, हिंगोली ६८, कळमनुरी ३३, वसमत ४२, बदनापूर ५५, जफ्राबाद २८, जालना २५, अहमदपूर ४२, चाकूर २४, जळकोट ६६, रेनापूर ३५, अर्धापूर १४०, बिलोली ६५, देगलूर ५८, धर्माबाद ६४, कंधार ६७, लोहा ५१, मुदखेड १२७, मुखेड ६८, नायगाव खैरगाव ११८, नांदेड ४०, उमरी ५०, भुम ३६, परांडा २०, उमरगा ३५, गंगाखेड ६०, मानवत ३०, पालम ५२, परभणी २५, पाथरी ८०, पुर्णा २६, सेलू ३२, सोनपेठ ६२. विदर्भ : अकोला ३३, बालापूर ३१, बार्शीटाकळी ३६, मूर्तिजापूर २६, तेल्हारा ३९, चांदूरबाजार २३, धामणगाव रेल्वे २८, धारणी ४५, लाखणी ५२, सिंदखेड राजा २६, बल्लारपूर ५७, भद्रावती २७, मूल ८१, नागभिड २७, सावळी ५१, सिंदेवाही ८७, धानोरा ३७, गडचिरोली २८, मुलचेरा ४६, सिरोंचा ५१, काटोल २४, मौदा ३६, नरखेडा ९८, आष्टी ३९, मंगळरूळपीर २४, अर्णी २३, नेर ३१. 

तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज   मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकल्याने राज्यात पावसाला सुरवात झाली. बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे आज (ता. २) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यासे संकेत आहेत. ही स्थिती पूरक ठरल्याने राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. तर मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.  १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे  वाडा १०९ (पालघर), माथेरान १४१, पनवेल १०२ (रायगड), दोडामार्ग १०५, सावंतवाडी १४८ (सिंधुदुर्ग), फुलंब्री १०० (औरंगाबाद), अर्धापूर १४०, मुदखेड १२७, नायगाव खैरगाव ११८, अंतरवेली १०६, मुगट १५६, बारड १६५, कुंटूर ११७ (नांदेड). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com