नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसामुळे शेतीपिकांना दिलासा

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसामुळे शेतीपिकांना दिलासा
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसामुळे शेतीपिकांना दिलासा

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६ तालुक्यांतील १०८ मंडळांत शुक्रवारी (ता. ९) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस झाला. त्यामुळे शेतीपिकांना दिलासा मिळाला.

नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ५३ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. किनवट, माहूर, हदगाव तालुक्यांतील मंडळांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी  २६ मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी २९ मंडळांतही हलका ते मध्यम पावसाची नोंद झाली. 

मंडळनिहाय पाऊस (मिमी) 

नांदेड जिल्हा तरोडा ७, बारड १२, हदगांव १०,तामसा ८, मनाठा १४, पिंपरखेड १३, आष्टी ७, निवघा १४, तळणी ११, माहूर ३२, वाई ३७, वानोळा ३७, सिंदखेड ३४, किनवट १८, इस्लापूर २४, मांडवी २७, बोधडी १४, दहेली ४७, जलधारा १७, शिवणी १६, हिमायतनगर १२, सरसम १४, जवळगाव १३, भोकर ७, किनी १४, मोघाली ७, मातुल ८, मुखेड ७, जाहूर ३८.
परभणी जिल्हा झरी ६, बोरी ९, चारठाणा ५, बामणी ८, सावंगी म्हाळसा  ५, आडगाव ५, सेलू १०, देऊळगाव ८, कुपटा ७, वालूर ७, चिकलठाणा ६, हदगाव १०.
हिंगोली जिल्हा हिंगोली ८,   खंबाळा ७, माळहिवरा १३, सिरसम ९, बासंबा ६, नरसी नामदेव ५, डिग्रस ५, कळमनुरी १०, नांदापूर ११, आखाडा बाळापूर १०, डोंगरकडा ८, वारंगा फाटा ८, वाकोडी ६, वसमत ५, हट्टा ९, कुरुंदा १७, टेम्बुर्णी ६, औंढा नागनाथ ८, जवळा बाजार ८, येळेगाव ९, साळणा ७, सेनगाव ९, गोरेगाव ११, आजेगाव ११, साखरा १२, पानकनेरगाव १०, हत्ता १४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com