सोलापुरात पावसाला पुन्हा सुरुवात

सोलापुरात पावसाला पुन्हा सुरुवात
सोलापुरात पावसाला पुन्हा सुरुवात

सोलापूर : खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आणि रब्बी हंगाम तोंडावर आला तरी, जिल्ह्यात अद्यापही पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. मंगळवारी (ता. २४) पहाटे पुन्हा सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. पण, तो सरसकट नाही, शिवाय हलकाच आहे. त्यात अद्यापही म्हणावा तसा जोर नाही. त्यामुळे अजूनही पावसासाठी सोलापूरकरांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. 

गेल्या पाच-सहा दिवसांपासून वातावरण चांगलेच बदलले आहे. दिवसभर कडक ऊन आणि प्रचंड उकाडा जाणवत आहे. दुपारनंतर काहीसे ढगाळ वातावरण अनुभवास येते. पण, गेल्या दोन दिवसांत पावसाने पुन्हा सुरुवात केल्याचे चित्र आहे. रविवारी (ता. २२) एकाच रात्री फक्त सोलापूर शहरात ११८ मिलिमीटर एवढा पाऊस झाला. पण ग्रामीण भागात नेमके उलटे चित्र होते.

अनेक ठिकाणी पाऊसच झाला नाही. तर झाला तिथे केवळ हलका शिडकावा, पण सलग पाऊस सुरू आहे. विशेषतः रविवार, सोमवार असे दोन्ही दिवस पावसाने हलकी हजेरी लावली. मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पुन्हा पावसाने सुरुवात केली. सुमारे अर्धा तास त्यात चांगलाच जोर होता, हा जोर वाढेल, असे वाटत असताना, काही वेळातच तो कमी झाला.

जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, मोहोळ, बार्शीचा काही भाग, उत्तर सोलापूर, पंढरपूर या भागात प्रामुख्याने या पावसाने हजेरी लावली. पण, तो सरसकट सारखा पडला नाहीच, शिवाय त्यात जोर नसल्याने अजूनही दमदार पावसासाठी प्रतीक्षाच वाट्याला आली आहे. 

खरीप वाया, रब्बीचे भवितव्य पावसावर

मंगळवारी अनेक भागांत दिवसभर कधी ऊन, कधी ढगाळ असे वातावरण अनुभवास येत होते. आता खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. पण पावसाअभावी हा हंगाम वाया गेला आहे. आता रब्बी हंगाम सुरू होईल, पण त्याचेही भवितव्य पावसावरच आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com