Agriculture news in Marathi The rain rose on the roots of the crops | Page 3 ||| Agrowon

मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 सप्टेंबर 2021

आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने मराठवाड्यातील खरिपाची पुरती दैना मांडली आहे. प्राथमिक अंदाजात जवळपास १४ लाख हेक्‍टरला दणका बसला आहे.

औरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने मराठवाड्यातील खरिपाची पुरती दैना मांडली आहे. प्राथमिक अंदाजात जवळपास १४ लाख हेक्‍टरला दणका बसला आहे. दुसरीकडे थांबण्याचे नाव घेत नसलेल्या पावसामुळे नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

मराठवाड्यात थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. आधी पावसाच्या खंडाने काही भागांतील पिकांचे नुकसान केले. तर त्यानंतर अतिवृष्टीने विविध भागांतील पिके हातची जात आहेत. बहुतांश भागातील उडीद, मुगावर संक्रांत आली असताना आता मोठ्या प्रमाणात क्षेत्र असलेल्या कपाशी व काढणीला आलेले सोयाबीनचे पीकही संकटात सापडले आहे. काही ठिकाणी कपाशी पूर्णत: पोळून निघाली, तर काही ठिकाणी हिरव्या असलेल्या कपाशीची वाढ झाली नाही, तिला अपेक्षित पाते, बोंड लागली नाही. आता पुन्हा पावसाने जोर धरल्याने काही प्रमाणात काढणी सुरू झालेल्या सोयाबीनच्या पिकावरही संकटाचे ढग गडद झाले आहेत. त्यामुळे कपाशीसोबतच सोयाबीनच्या उत्पादनातही मोठी घट येणार हे जवळपास निश्‍चित मानले जात आहे.

२१ लाखांवर शेतकऱ्यांना दणका
प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जवळपास २१ लाख ४१ हजार २७६ शेतकऱ्यांच्या १५ लाख ३८ हजार ४७२ हेक्‍टर ६८ गुंठ्यावरील शेतीपिके अतिवृष्टीमुळे बाधित झाले. प्राथमिक अंदाजानुसार नुकसान झालेल्या क्षेत्रापैकी २२ सप्टेंबरपर्यंत जवळपास १० लाख ३४ हजार ७३३ हेक्‍टर १९ गुंठ्यावरील अर्थात बाधित क्षेत्राच्या तुलनेत ६७.२६ टक्‍क्‍यांवरील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. त्यामध्ये हिंगोली, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे संपले होते. विमा परताव्याचं भिजत घोंगड आहे.

६१७ हेक्‍टर जमीन खरडली
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ६१७ हेक्‍टर ३७ गुंठे जमीन पावसामुळे खरडून गेल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ३७६ हेक्‍टर ५७ गुंठे, जालना १५० हेक्‍टर ४० गुंठे, लातूर ८९ हेक्‍टर ९० गुंठे, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ५० गुंठे क्षेत्राचा समावेश आहे.


इतर बातम्या
पूर्णाथडी म्हशीला राजमान्यतेचा प्रस्ताव...अकोला ः पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या फिकट...
देशी गाईंच्या प्रजातींचे संवर्धन गरजेचेपुणे : देशात गाईच्या पारंपरिक जाती नष्ट...
पहिली उचल ३३०० द्यावी ः राजू शेट्टी...कोल्हापूर : यंदा तुटणाऱ्या उसाला पहिली उचल ३३००...
कृषी पदव्युत्तर प्रवेशासाठी १३...पुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर...
अकोला : दोन दिवसांतील अतिवृष्टीने  ४०...अकोला : जिल्ह्यात १६ व १७ ऑक्टोबरला झालेल्या...
यवतमाळ : सोयाबीन-कपाशी झाले मातीमोल यवतमाळ : जिल्ह्याभरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस...
आठ कारखान्यांना  सांगलीतील गाळप परवाना  सांगली : जिल्ह्यात गतवर्षी १५ साखर कारखान्यांना...
कोजागरीनिमित्त  दुधाचे दर वाढले पुणे : कोजागिरी पौर्णिमेसाठी गणेश पेठेतील घाऊक...
जागतिक स्पर्धेत टिकणारे द्राक्ष वाण...पिंपळगाव बसवंत, ता. निफाड : नाशिकचे द्राक्ष...
गावांचा विद्युतपुरवठा  खंडित करणार नाही कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या...
पूरबाधित ऊसप्रश्‍नी  उद्या कोल्हापुरात...कोल्हापूर : पूरबाधित उसाची प्राधान्याने तोड...
निळ्या भातांनी बहरली  आंबेगावमधील...फुलवडे, जि. पुणे : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम...
जळगाव जिल्हा बँकेच्या  निवडणुकीसाठी २७९...जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या सार्वत्रिक...
एकरकमी ‘एफआरपी’साठी आता आंदोलन सातारा : कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील काही...
वरणगाव परिसरात पिकांवर पावसाचे पाणीवरणगाव, जि. जळगाव : यंदाच्या पावसाने...
अनुदानित हरभरा बियाणे उपयोगात आणावे :...नाशिक : ‘‘राज्यात २४ ऑक्टोबरपर्यंत हरभरा प्रमाणित...
नांदेड जिल्हा बॅंकेची मदार २३०...नांदेड : नांदेड जिल्हा बॅंकेत कर्मचाऱ्यांची वानवा...
किसान रेल्वेला सोलापुरातून प्रतिसादसोलापूर ः मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून किसान...
खानदेशात रब्बीसाठी पीककर्जाचे वितरण सुरूजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची तयारी सुरू आहे....
धर्माबादेत डीएपीची खताची कृत्रीम टंचाईनांदेड : धर्माबाद येथील कृषी सेवा केंद्र चालक...