agriculture news in marathi, Rain in Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यात पाऊस बरसला
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 जून 2019

सांगली : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) ठिकठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. शिराळा, वाळवा, कडेगाव, तासगाव तालुक्यांत जोरदार; तर पलूस, खानापूर, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी तालुक्यांत तुरळक पाऊस पडला. पाऊस नसल्याने या भागातील पेरण्या रखडल्या होत्या. झालेल्या पावसामुळे भुईमूग, सोयाबीन आदी पेरण्यांना गती येण्याची चिन्हे आहेत. एकूणच वरुणराजा बरसल्याने बळीराजा सुखावला आहे.

सांगली : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) ठिकठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. शिराळा, वाळवा, कडेगाव, तासगाव तालुक्यांत जोरदार; तर पलूस, खानापूर, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी तालुक्यांत तुरळक पाऊस पडला. पाऊस नसल्याने या भागातील पेरण्या रखडल्या होत्या. झालेल्या पावसामुळे भुईमूग, सोयाबीन आदी पेरण्यांना गती येण्याची चिन्हे आहेत. एकूणच वरुणराजा बरसल्याने बळीराजा सुखावला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाचे वातावरण होते. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. पाचच्या सुमारास सांगली, मिरजेत जोरदार सरी बरसल्या. सायंकाळी चार ते साडेपाच या कालावधीत पुन्हा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र पाणी-पाणी झाले. मिरज तालुक्यातील टाकळी, म्हैसाळ, एरंडोली, मल्लेवाडी या गावांना दुपारी पावसाने झोडपले. 

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील शिराळा, वाळवा, तासगाव, कडेगाव या तालुक्यांत बहुतेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्यात मांजर्डे परिसरात दुपारनंतर मान्सूनने दमदार हजेरी लावली. तालुक्यातील मांजर्डे, आरवडे, हातनूर, बस्तवडे, डोर्ली, मोराळे, पेड, खुजगाव या भागात चांगला पाऊस झाला. अनेक ठिकाणी शेतातील बांध फुटले. हा पाऊस पेरणीसाठी उपयुक्त ठरणार आहे. 

निंबळक परिसरातील चिखलगोठण, आळते, लिंब, बोरगाव, शिरगाव व विसापूर परिसरात उशिरा का होईना पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले. अचानक आलेल्या पावसाने उसाच्या सरी व बागेचे वाफे पाण्याने तुडुंब भरून वाहू लागले.

कडेगाव शहरासह  वाळवा तालुक्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. कडेपूर, वांगी, चिंचणी, देवराष्ट्रे, शाळगाव, विहापूर, नेर्ली, अपशिंगे, हिंगणगाव, शिवाजीनगर आदी गावांमध्ये हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. पलूस, खानापूर, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी तालुक्यांत ठिकठिकाणी पाऊस झाला. पावसाने दांडी मारल्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. खरिपासाठी पावसाच्या प्रतीक्षेत शेतांची मशागत करून ठेवलेल्या शेतकऱ्यांमध्ये पावसामुळे आनंदाचे वातावरण आहे. आडसली लागणीला वेग वाढणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...