agriculture news in Marathi rain setback to crops in state Maharashtra | Agrowon

`अवकाळी’चा पिकांना फटका 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 मार्च 2021

उन्हाळ्याच्या झळा वाढू लागताच पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यात गुरुवारी (ता.१८) सायंकाळी अकोला, बुलडाणा, नांदेड, परभणी, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांत ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी पडल्या. 

पुणे : उन्हाळ्याच्या झळा वाढू लागताच पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यात गुरुवारी (ता.१८) सायंकाळी अकोला, बुलडाणा, नांदेड, परभणी, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांत ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी पडल्या. काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. यामुळे काढणीयोग्य असलेल्या गहू, हरभरा, द्राक्षे, कांदा अशा पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण झाले आहे. पावसासाठी पोषक वातावरण आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यांतील तेल्हारा, मलकापूर, कोल्हापुरातील पन्हाळा, नांदेडमधील तालुक्यातील सोमेश्‍वर, राहटी, जैतापूर, परभणी जिल्ह्यांतील रवळगाव (ता. सेलू), जिंतूर तालुक्यातील बेलखेडा, नाशिकमधील कळवण, निफाड, चांदवड, पेठ या भागात २.३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. कोरेगाव भिवर या ठिकाणी पूर्वमोसमीच्या हलक्या सरी पडल्या. 

मराठवाडा व परिसरात आणि विदर्भ व परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. तर राजस्थान ते अरबी समुद्र, सौराष्ट्र आणि कच्छच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. तसेच हिंदी महासागर आणि परिसर व बंगालचा उपसागर, श्रीलंका या परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय असल्याने राज्यातील वातावरणात बदल होत आहे.

उत्तर कर्नाटक ते मध्य प्रदेशाचा आग्नेय भाग व महाराष्ट्र या भागात कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत कमीअधिक प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. यामुळे शुक्रवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यतच्या चोवीस तासांत सोलापूर येथे ३८.९ अंश सेल्सिअसची सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. 

पुढील तीन दिवस पावसाची शक्यता 
सध्या ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पहाटेचा गारठाही गायब झाल्याने कमाल तापमानासह, किमान तापमानातही वाढ झाली. पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस होईल. गुरुवारपासून (ता. २५) ढगाळ वातावरणाची स्थिती निवळून पुन्हा उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. 

शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः 

 • मुंबई (सांताक्रूझ) ३४.२ 
 • अलिबाग ३०.७ 
 • रत्नागिरी ३३ 
 • डहाणू ३३.६ 
 • पुणे ३६.९ 
 • कोल्हापूर ३५.८ 
 • महाबळेश्‍वर ३०.७ 
 • नाशिक ३६.१ 
 • सांगली ३६.३ 
 • सातारा ३६.१ 
 • सोलापूर ३८.६ 
 • औरंगाबाद ३७.४ 
 • परभणी ३८.३ 
 • अकोला ३८.६ 
 • अमरावती ३६ 
 • बुलडाणा ३६.७ 
 • ब्रम्हपुरी ३४.९ 
 • चंद्रपूर ३३.६ 
 • गोंदिया ३२ 
 • नागपूर ३१.६ 
   

इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...