agriculture news in Marathi rain setback to Mahavitaran Maharashtra | Agrowon

वादळी पावसाचा महावितरणला तडाखा

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 एप्रिल 2020

जिल्ह्यात गुरुवारी (ता.१) रात्री साडेदहाच्या सुमारास झालेल्या प्रचंड वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठमोठे वृक्ष वीजवाहिन्यांवर उन्मळून पडल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागाला याचा प्रचंड तडाखा बसला आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात गुरुवारी (ता.१) रात्री साडेदहाच्या सुमारास झालेल्या प्रचंड वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठमोठे वृक्ष वीजवाहिन्यांवर उन्मळून पडल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागाला याचा प्रचंड तडाखा बसला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार महावितरणचे ४५४ वीज खांब जमीनदोस्त झाले आहेत. तर हजारो खांबावरील तारा तुटल्या आहेत. अशा परिरिस्थितीतही वीज कर्मचाऱ्यांनी आज दिवसभरात शहर व गावठाणचा वीजपुरवठा युद्धपातळीवर सुरळीत केला आहे.

महावितरणच्या मागील संकटाची मालिका काही केल्या कमी होत नाही. आधी महापूर आणि आता अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे वीज यंत्रणेला मोठा फटका बसला आहे. त्यात अवकाळीने भर घातली आहे. कोल्हापूर शहरातील शिरोली एमआयडीसी, कसबा बावडा, शिये, भुये, वडगणे या भागात जुने व मोठमोठे वृक्ष मुळासकट उन्मळून वीजवाहिन्यांवर पडले. एमआयडीसी भागातील पत्र्यांची शेड तारांवर अडकले. सर्वात मजबूत समजले जाणारे ‘रेल पोल’ सुध्दा अक्षरश: मोडून पडले.

एमआयडीसीतील बहुतांश उद्योग लॉकडाऊनमुळे बंद असले तरी वृत्तपत्र व आदी औद्योगिक ग्राहक ज्यांना लॉकडाऊनमधून वगळले आहे, त्यांचा वीजपुरवठा मार्केटयार्ड उपविभागाने रात्रीतून सुरु केला. कसबा बावडा व नागाळापार्क भागाला जिथे शक्य आहे, तिथे पर्यायी मार्गाने सुरु करण्यात आले आहे. गडहिंग्लज शहर पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा शुक्रवारी दुपारी युध्दपातळीवर पूर्ववत करण्यात आला.

प्राथमिक माहितीनुसार गुरुवारी रात्रीच्या अवकाळी पावसात उच्चदाबाचे १७० व लघुदाबाचे २८४ असे ४५४ वीजखांब पडले होते. तर ११ रोहित्रसुध्दा जमीनदोस्त झाले आहेत. विजेच्या कडकडामुळे शेकडो खांबावरील ‘इन्सुलेटर’ फुटून तारा खांबावर निखळून पडल्या आहेत. लॉकडाऊनमुळे कंत्राटदारांना कामगार मिळत नसल्याने काल रात्रीपासून कर्मचारी अहोरात्र झटत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...