Papaya crop
Papaya crop

पपईला अतिपावसाचा फटका 

अतिपावसात खानदेशात पपईचे पीक खराब झाले आहे. अनेक भागात आगाप लागवडीच्या पपई बागेत काढणी सुरू झाली आहे.

जळगाव ः अतिपावसात खानदेशात पपईचे पीक खराब झाले आहे. अनेक भागात आगाप लागवडीच्या पपई बागेत काढणी सुरू झाली आहे. १६ ते १८ रुपये प्रतिकिलो दर जागेवरच मिळत आहेत. कमी दर्जाच्या पपईचे दर ८ ते ९ रुपये प्रतिकिलो, असे आहेत. 

पपईची लागवड खानदेशात वाढली होती. यंदा उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा होती. परंतु या महिन्यातील अतिपावसात पपईचे पिकही हातचे गेल्याची स्थिती आहे. यामुळे यातच आगाप लागवडीच्या बागांमध्ये फळगळही मध्यंतरी झाली. नव्याने फुले लागत नसल्याची स्थिती आहे. कारण झाडावरील पानांची गळती वाढली आहे. एका झाडावर चार - पाच हिरवी पाने आहेत. वाढही कमी आहे. काळ्या कसदार जमिनीत पपईचे मोठे नुकसान झाले आहे. 

नव्याने पपईचा हंगामच येणार नाही, अशी स्थिती आहे. कारण ढगाळ, प्रतिकूल वातावरण आहे. पाऊसही सुरू आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी एकाच वेळी काढणीवरील फळांची जागेवरच सरासरी दरात विक्री केली आहे. ही विक्री आठ ते नऊ रुपये प्रतिकिलो, या दरात झाली आहे. तर दर्जेदार फळांची विक्री १६ ते १८ रुपये प्रतिकिलो या दरात झाली आहे. सध्या नंदुरबारमधील शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर व जळगावमधील चोपडा, जामनेर, मुक्ताईनगर भागात काढणी सुरू आहे. रावेर, यावल भागातही आगाप बागांमध्ये सौदे झाले आहेत. खरेदी जागेवरच सुरू असून, खरेदीसाठी राजस्थान, मध्य प्रदेश व स्थानिक खरेदीदार येत आहेत. 

नंदुरबार व धुळ्यात मिळून रोज २० ते २१ ट्रक (एक ट्रक ९ टन क्षमता) पपईची काढणी सुरू आहे. काढणी वाढत असल्याने दरांवर दबाव येत आहे. पुढे दरात चढउतार होऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. कारण यंदा लागवड वाढली होती.  प्रतिक्रिया पपईचे दर सध्या स्थिर आहेत. परंतु कमी दर्जाचा मुद्दा सांगून खरेदीदार दर कमी देत आहेत. दर्जेदार पपईला १६ ते १८ रुपये कमाल दर काही भागात आहेत.  - अंशुमन पाटील, शेतकरी, शहादा (जि.नंदुरबार) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com