agriculture news in Marathi rain in several places in kokan ans central Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

 मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सोलापूर व कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी पडत आहेत.

पुणे ः मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सोलापूर व कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी पडत आहेत. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाने उघडीप दिली आहे. या पावसामुळे शेतीकामे प्रभावित होत आहेत. 

सध्या कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ हवामान आहे. त्यामुळे दिवसभर पावसाची उघडीप असली तरी दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होत आहे. सायंकाळी काही प्रमाणात ढग भरून येत असल्याने जोरदार पाऊस पडत आहे. रोज तुरळक ठिकाणी पाऊस होत असल्याने शेती कामे खोळंबत असल्याची स्थिती आहे. संगमेश्वर देवरूख येथे सर्वाधिक ७३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर राजापूर, वेंगुर्ला, लांजा, पोलादपूर, म्हसळा, महाड येथेही पावसाच्या जोरदार पाऊस पडला आहे. 

मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने रविवारी सायंकाळी हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील पौड येथे ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे भात पिकांना दिलासा मिळाला असला तरी जोरदार पावसामुळे नुकसान झाल्याची स्थिती आहे. नगर, सातारा, सांगली भागातही पावसाच्या बऱ्यापैकी सरी पडत आहेत. या भागात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून 
परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 

मराठवाडा व विदर्भात पाऊस थांबला आहे. त्यामुळे शेतातील पाणी कमी होण्यास सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी अजूनही शेतात पाणी असल्याने पिके हातातून गेली आहेत. हलक्या जमीनी असलेल्या भागात वाफसा येत असल्याने शेती कामांना वेग येत आहे. त्यामुळे शेतात बाजरी, सोयाबीन, कापूस अशा पिकांची काढणी सुरू आहे. मात्र, नुकसान झाल्याने हातात फार काही उत्पादन मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी सोडून दिली आहे. विदर्भात गेल्या आठवड्यापासून पाऊस नसल्याने रब्बी हंगामाची तयारी वेगाने सुरू आहे. काही ठिकाणी रब्बी ज्वारीच्या पेरण्यांना सुरूवात झाल्याची स्थिती आहे. 

सोमवारी (ता.२६) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटर ः स्त्रोत - हवामान विभाग 
कोकण ः महाड ५३, म्हसळा ४३, मुरूड २८, पोलादपूर ४९, श्रीवर्धन २३, लांजा ३०, मंडणगड २६, राजापूर ५८, देवड २२, मालवण ३५, वैभववाडी ३७, वेंगुर्ला ४४. 
मध्य महाराष्ट्र ः पौड ४०, शिरूर २०, कडेगाव २३, कवठेमहाकाळ ३०, तासगाव १६, जावळी मेढा १५.१, पाटण ३६, सातारा २४.५, सोलापूर २९.२ 


इतर अॅग्रो विशेष
...येथे कांदा रोपे राखणीसाठी...विसापूर, जि. सातारा  : सोन्याचे दाग-दागिने,...
कृषी विभागात आगामी बदल्या समुपदेशनाने...पुणे : कोविड-१९ साथीमुळे कृषी विभागात यंदा...
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...पुणे :  निवार चक्रीवादळाचा प्रभाव निवळत...
कृषी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश...पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत...
सातत्य राखलेले पशुपालन ठरले शेतीलाही...यवतमाळ जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील...
अतिदुर्गम भागात दुग्धव्यवसायातून...आदिवासी व अतिदुर्गम असलेल्या शेलद- मुंढेवाडी (ता...
प्रक्रिया उद्योगाअभावी संत्रा...नागपूर : राज्यात सध्या संत्र्याखालील सर्वाधिक...
वीस हजार अन्न प्रक्रिया उद्योग होणार...पुणे : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग उन्नयन...
महाबळेश्वरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर...मुंबई : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर आता...
पदवीच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश...पुणे ः कृषी व मत्स्य विद्याशाखेच्या पदवी...
दुर्गम भागातील गावकऱ्यांनी स्वतःच केला...जामली, जि. अमरावती ः चिखलदरा तालुक्‍यातील...
बारदान्याच्या ६५ कोटींची शेतकऱ्यांना...भंडारा: गेल्या खरीप व रब्बी हंगामात स्वतःचा...
ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक...सांगली ः : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ...
ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरला पसंती पुणे : मजूर टंचाईमुळे राज्यातील साखर...
‘ऑपरेशन ग्रीन’ डिसेंबरपर्यंत चालणार पुणे : ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत भाजीपालावर्गीय...
शासकीय केंद्रातं खरेदीत कापूस कटतीतून...जळगाव ः शासकीय कापूस खरेदीने शेतकऱ्यांना आधार...
गगनबावड्यात यंदा सर्वाधिक पाऊस पुणे ः देशात यंदा परतीचा मॉन्सून अधिक काळ...
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...
खासगीकरणाचा वारू किती उधळणार?सरकारने उद्योगधंद्यात सामील असता कामा नये, अशी...