मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार सरी

पाऊस
पाऊस

पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडण्यास सुरवात झाली. शुक्रवारी (ता.१९) मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांतील ५२ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. औरंगाबादमधील धोंदलगाव, जालन्यातील लोणार, भायगाव, अंबड, लालवाडी, नांदेडमधील बितनाळ, वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा या ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी बरसल्या. राज्यात आजपासून (ता.२०) बहुतांशी ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.   गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला होता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाला आवश्यक असेलेली पोषक स्थिती तयार होत आहे. यामुळे गुरुवारी दुपारी मध्य महाराष्ट्रातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीडमधील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. विदर्भातील वाशीम जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकणातील वेंगुर्ला येथे सर्वाधिक १५० मिलिमीटर पाऊस पडला; तर कणकवली, माथेरान, मालवण, मानगाव, अंबरनाथ, मुरबाड, कुडाळ येथे जोरदार झाला. मध्य महाराष्ट्रातील हातकणंगले येथे ६० मिलिमीटर पाऊस पडला. गगनबावडा, आरजा येथे पावसाच्या अधूनमधून सरी कोसळल्या. मराठवाड्यातील मुदखेड, बिलोली, रेनापूर, शिरूर, अनंतपाल, भोकर, उमरी, नायगाव, निलंगा, सेनगाव, विदर्भातील मौंढा, रामटेक, उमरेर, कळमेश्वर, जयोती, कुही, अर्जुनीमध्ये मोरगाव जोरदार पाऊस झाला.   गुरुवारी (ता. १८) सकाळी साडेआठपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्राेत ः हवामान विभाग)  कोकण ः वेंगुर्ला १५०, कणकवली ५०, माथेरान, मालवण, मानगाव ४०, अंबरनाथ, तला, मुरबाड, कुडाळ ३०, मंडणगड, संगमेश्वर देवरुख, महाड, उल्हासनगर, सावंतवाडी, लांजा, रत्नगिरी, पनवेल, रामेश्वर २०, ठाणे, कल्याण, भिवंडी, मुलदे, दोडामार्ग, भिरा १०  मध्य महाराष्ट्र ः हातकणंगले ६०, गगनबावडा ३०, आरजा १०,  मराठवाडा ः मुदखेड ५०, बिलोली ३०, रेनापूर, शिरूर, अनंतपाल, भोकर ३०, उमरी, नायगाव, निलंगा, सेनगाव २०, सेलू, उमरगा, धर्माबाद लोहा, परतूर, कंधार, परभणी, हिंगोली, गंगाकेड १०   विदर्भ ः मौंढा ९०, रामटेक, उमरेर, कळमेश्वर ३०, जयोती, कुही, अर्जुनी मोरगाव, देवळी, ब्रम्हपुरी, गोंडपिंपरी, देसाईगंज, सावनेर, वरोरा २०, वनी, पेरसावनी, गोरेगाव, पौनी, अरमोरी, सावली, राळेगाव, हिंगणघाट, शिंदेवाही, आर्वी, समुद्रपूर १०.  मॉन्सूनने देश व्यापला नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी (ता. १९) पश्चिम राजस्थानातील उर्वरित भागात प्रगती करत संपूर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. साधारणतः १५ जुलै रोजी देश व्यापणारा मॉन्सून यंदा चार दिवस उशिराने देशाच्या सर्व भागात पोचला आहे. १८ मे रोजी अंदमानात पोचलेल्या मॉन्सूनने ३० मे रोजी संपूर्ण अंदमान व्यापून ८ जूनला देवभूमी केरळात डेरेदाखल झाला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com