agriculture news in Marathi, rain in several places in Marathwada, Maharashtra | Agrowon

मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार सरी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जुलै 2019

पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडण्यास सुरवात झाली. शुक्रवारी (ता.१९) मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांतील ५२ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. औरंगाबादमधील धोंदलगाव, जालन्यातील लोणार, भायगाव, अंबड, लालवाडी, नांदेडमधील बितनाळ, वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा या ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी बरसल्या. राज्यात आजपासून (ता.२०) बहुतांशी ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.  

पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडण्यास सुरवात झाली. शुक्रवारी (ता.१९) मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांतील ५२ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. औरंगाबादमधील धोंदलगाव, जालन्यातील लोणार, भायगाव, अंबड, लालवाडी, नांदेडमधील बितनाळ, वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा या ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी बरसल्या. राज्यात आजपासून (ता.२०) बहुतांशी ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.  

गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला होता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाला आवश्यक असेलेली पोषक स्थिती तयार होत आहे. यामुळे गुरुवारी दुपारी मध्य महाराष्ट्रातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीडमधील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या.

विदर्भातील वाशीम जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकणातील वेंगुर्ला येथे सर्वाधिक १५० मिलिमीटर पाऊस पडला; तर कणकवली, माथेरान, मालवण, मानगाव, अंबरनाथ, मुरबाड, कुडाळ येथे जोरदार झाला. मध्य महाराष्ट्रातील हातकणंगले येथे ६० मिलिमीटर पाऊस पडला. गगनबावडा, आरजा येथे पावसाच्या अधूनमधून सरी कोसळल्या. मराठवाड्यातील मुदखेड, बिलोली, रेनापूर, शिरूर, अनंतपाल, भोकर, उमरी, नायगाव, निलंगा, सेनगाव, विदर्भातील मौंढा, रामटेक, उमरेर, कळमेश्वर, जयोती, कुही, अर्जुनीमध्ये मोरगाव जोरदार पाऊस झाला.
 
गुरुवारी (ता. १८) सकाळी साडेआठपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्राेत ः हवामान विभाग)
 कोकण ः वेंगुर्ला १५०, कणकवली ५०, माथेरान, मालवण, मानगाव ४०, अंबरनाथ, तला, मुरबाड, कुडाळ ३०, मंडणगड, संगमेश्वर देवरुख, महाड, उल्हासनगर, सावंतवाडी, लांजा, रत्नगिरी, पनवेल, रामेश्वर २०, ठाणे, कल्याण, भिवंडी, मुलदे, दोडामार्ग, भिरा १० 
मध्य महाराष्ट्र ः हातकणंगले ६०, गगनबावडा ३०, आरजा १०, 
मराठवाडा ः मुदखेड ५०, बिलोली ३०, रेनापूर, शिरूर, अनंतपाल, भोकर ३०, उमरी, नायगाव, निलंगा, सेनगाव २०, सेलू, उमरगा, धर्माबाद लोहा, परतूर, कंधार, परभणी, हिंगोली, गंगाकेड १०  
विदर्भ ः मौंढा ९०, रामटेक, उमरेर, कळमेश्वर ३०, जयोती, कुही, अर्जुनी मोरगाव, देवळी, ब्रम्हपुरी, गोंडपिंपरी, देसाईगंज, सावनेर, वरोरा २०, वनी, पेरसावनी, गोरेगाव, पौनी, अरमोरी, सावली, राळेगाव, हिंगणघाट, शिंदेवाही, आर्वी, समुद्रपूर १०. 

मॉन्सूनने देश व्यापला
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी (ता. १९) पश्चिम राजस्थानातील उर्वरित भागात प्रगती करत संपूर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. साधारणतः १५ जुलै रोजी देश व्यापणारा मॉन्सून यंदा चार दिवस उशिराने देशाच्या सर्व भागात पोचला आहे. १८ मे रोजी अंदमानात पोचलेल्या मॉन्सूनने ३० मे रोजी संपूर्ण अंदमान व्यापून ८ जूनला देवभूमी केरळात डेरेदाखल झाला होता.


इतर बातम्या
नगर जिल्ह्याच्या विकासासाठी ९७१ कोटींची...नगर ः जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडे ९७१...
खानदेशातील ‘रब्बी’ला ढगाळ वातावरणाचे...जळगाव : खानदेशात यंदा हुडहुडी भरविणारी थंडी दोन-...
उद्योगमंत्र्यांनी जाणली रेशीम...औरंगाबाद : जिल्ह्यात रेशीम कोषाचे उत्पादन,...
फुलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे काजू...सिंधुदुर्ग : ढेकण्या, शेंडेमर, फांदीमर रोगांमुळे...
दहा वर्षांत सातारा जिल्ह्यातील १३८०...सातारा  ः जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी...
मुळा, भंडारदरा धरणांतून आजपासून आवर्तननगर  ः यंदा पाऊस चांगला झाल्याने...
पुणे कृषी महाविद्यालयातील ...पुणे  ः विद्यार्थी वसतिगृहाचे प्रवेशद्वार...
भीमा खोऱ्यातील धरणांमध्ये ८५ टक्के पाणीपुणे  : जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात यंदा दमदार...
हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांत...हिंगोली : पाऊस लांबल्यामुळे हिंगोली, नांदेड,...
‘पोकरा’अंतर्गत तांत्रिक सहकार्यासाठी...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या...
शिरवाडे वणीत जलसंधारणासाठी...नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि...
अनियमित थंडी ऊस रिकव्हरीच्या मुळावरकोल्हापूरः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही ऊस...
कुरखेडा तालुक्यात सेवा सोसायट्यांचा धान...गडचिरोली  ः कमिशन व हमालीची रक्‍कम मिळत...
देशात केवळ ३५ तेलबिया हबनिर्मितीनवी दिल्ली: देशातील तेलबिया उत्पादन वाढावे आणि...
नवव्या जागतिक कृषी महोत्सवास उद्यापासून...नाशिक : श्रीस्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी...
राज्यात गारठा कमी, उकाडा वाढलापुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...
संवादासाठी तंत्रज्ञान महोत्सव फायदेशीर...सोलापूर : ‘‘शेतीतील नवे ज्ञान, तंत्रज्ञान, बदल...
धान खरेदी केंद्रासाठी शेतकऱ्यांचा...भंडारा  ः गेल्या दोन महिन्यांपासून बंद...
काँग्रेसचा दर बुधवारी मुंबईत ‘लोकदरबार’ मुंबई  : विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या...
अलिबागचा पांढरा कांदा ‘जीआय’च्या वाटेवरपुणे : औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेल्या...