ठिकठिकाणी पावसाची हजेरी

पाऊस
पाऊस

पुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने राज्यातील बहुतांशी भागांत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. गुरुवारी (ता. १९) कोकणातील रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर खानदेशातील पाचोरा, भडगाव, धरणगाव, जळगाव, जामनेर, पारोळा, एरंडोल, धुळ्यातील सिंदखेडा, साक्री, धुळे येथे हलका पाऊस पडला. औरंगाबादमधील सिल्लोड, सोयगाव, ढोरकीन, जालन्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसर विदर्भातील जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागांत पावसाने हजेरी लावली.   गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत ढगांची दाटी होत आहे. यामुळे सकाळपासून काही भागात पावसास सुरवात होत आहे. दुपारी काही प्रमाणात विश्रांती घेत असला तरी, अधूनमधून पुन्हा पावसास सुरवात होत आहे. गुरुवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत कोकणातील हर्णे येथे ९०.८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गुरुवारी (ता. १९) दिवसभर कोकणातील बहुतांशी भागात सरी कोसळत होत्या. घाटमाथ्यावरही पावसाचा चांगलाच जोर होता. यामुळे ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्याच्या पूर्व भागात अधूनमधून सरी बरसत होत्या. खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. मराठवाड्यातही हवामान अंशतः ढगाळ असून, तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत होत्या. विदर्भातील पूर्व पट्ट्यातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातही अधूनमधून सरी कोसळत होत्या. पश्चिम पट्ट्यातील बुलडाणा, अमरावती, वाशीम या जिल्ह्यांत हवामान ढगाळ असून, अधूनमधून ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. कोकणातील मुंबई, पोलादपूर, तला, रोहा येथे जोरदार पाऊस पडला आहे. तर रत्नागिरी, संगमेश्वर देवरूख, उल्हासनगर, मुरूड, कर्जत, कुडाळ, कल्याण, शहापूर, चिपळून सुधागड पाली येथेही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. खानदेशातील चाळीसगाव येथे सर्वाधिक ६७ मिलिमीटर पाऊस पडला. तर श्रीगोंदा, शिरूर, इंदापूर, कडेगाव, कोपरगाव, चांदवड, फलटण, खटाव, सिन्नर येथेही मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. मराठवाड्यातील कन्नड येथे सर्वाधिक ५६ मिलिमीटर पाऊस पडला. तर बीड, माजलगाव, भोकरदन, चाकूर, देगलूर, गंगाखेड, विदर्भातील अरमोरी, गडचिरोली, नागभीड, धानोरा येथेही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.  

कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि गुजरातच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या परिसरात समुद्रसपाटीपासून २.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच बंगालच्या उपसागर, आंध्र प्रदेश या भागातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात कमी अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.   गुरुवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत हवामान विभाग)   कोकण ः मुंबई ६९.४, वाडा २८, अलिबाग २३.४, कर्जत ४३.४, खालापूर २३, महाड २०, माथेरान ३७.७, म्हसळा ३२. मुरूड ४२, पनवेल ४२, पेण २०, पोलादपूर ७०, रोहा ६०, श्रीवर्धन ४२, सुधागड पाली ५४, तला ६५, चिपळून ४९, हर्णे ९०.८, खेड २३, मंडनगड २२, रत्नागिरी ५८.१, संगमेश्वर देवरूख ४८, वाकवली २०.२, देवगड ३८, कुडाळ ४०, मुलदे ३०.९, अंबरनाथ ३८.१, भिवंडी २५, कल्याण ४१.४, मुरबाड ४५, शहापूर ४६, ठाणे ४३, उल्हासनगर ४५, मध्य महाराष्ट्र ः कोपरगाव ४३, अकोले ३७, कर्जत २५, श्रीगोंदा ५८, साक्री ३९, शिरपूर २०, चाळीसगाव ६७, चोपडा ४२, धरणगाव ३६, गगनबावडा ३९, तळोदा ३३, चांदवड ४१, मालेगाव २१, मुल्हेर २५.७, निफाड २३.७, सटाना २२, सिन्नर ५१, येवला ३१, दौंड ३१, इंदापूर ५१, पुणे २५.९, पुरंदर ३७, शिरूर ५५, आटपाडी ३६, कडेगाव ५०, विटा ३०, दहीवडी ३५, खटाव ४७.४, कोरेगाव ३१, पाटण २५, फलटण ४७, माढा २२.४, सोलापूर ५८.५, मराठवाडा ः कन्नड ५६, सोयगाव २१, बीड ३०, गेवराई २०, माजलगाव ३५, भोकरदन ३७, घनसांगवी २०, चाकूर ३९, देगलूर ३२, उमरगा २५, कळंब २०, गंगाखेड ४०, विदर्भ ः अकोट २१.६, तेल्हारा २७.६, चिखलदा २९.७, चिखली २९.७, चिमूर २१.३, कोरपना २०.६, नागभीर ३६.३, धानोरा ३९.७, अरमोरी ४१.६, इटापल्ली २७.४, गडचिरोली ३७.५, कुरखेडा २१.५, आष्टी २९.१, 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com