agriculture news in Marathi rain in several places in state Maharashtra | Agrowon

राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

दोन दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक भागांत पाऊस वाढला आहे. अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला.

पुणे ः दोन दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक भागांत पाऊस वाढला आहे. अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. त्यातुलनेत मध्य महाराष्ट्र, कोकण व विदर्भात पावसाचा जोर कमी असला तरी बहुतांशी भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मंगळवारी (ता.१५) सकाळी आठ वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील देवणी येथे ८४ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे या भागात शेतकऱ्यांची कामे खोळंबल्याची स्थिती आहे.  

राज्यात बदलत असलेल्या वातावरणामुळे अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. कोकणात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या उघडिपीसह काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. सिंधुदुर्गामधील मालवण येथे सर्वाधिक पाऊस पडला असून इतर भागातही बऱ्यापैकी पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या भात पिकांना दिलासा मिळत असून पिके चांगलीच तरारली आहेत.

मध्य महाराष्ट्रातही ढगाळ हवामानासह अधूनमधून ऊन पडत आहे. नगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर इंदापूर, माढा, माळशिरस परिसरात पावसाने चांगलीच दाणादाण उडवली. त्यामुळे ओढे, नाले व शेतातून भरून वाहत होते. नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार परिसरात पावसाची उघडीप होती.

मराठवाड्यातील दुष्काळी ओळख असलेल्या बीड, लातूर, उस्नानाबाद, नांदेड, परभणी जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. या जिल्ह्यातील सर्वच भागात हलका ते मध्यम पाऊस पडल्याने दुसऱ्या दिवशी शेतात पाणी साचल्याने नुकसान होण्याची भिती शेतकऱ्यांना होती.

देवणीपाठोपाठ नांदेड, कंधार, चाकूर, अर्धापूर परिसरातही जोरदार पाऊस पडला. विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडला. तर अनेक भागात पावसाच्या हलक्या सरीचा शिडकावा झाला. त्यामुळे पिकांना दिलासा मिळाला असून अनेक ठिकाणी पिकांची काढणी वेगाने सुरू आहे.

मंगळवारी (ता.१५) सकाळी आठ वाजेपर्यत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्त्रोत, हवामान विभाग): कोकण : खेड २७, लांजा २७, रत्नागिरी ४०.९, देवगड ४८, कणकवली ३३, कुडाळ २८, मालवण ५६, वैभववाडी २७, अंबरनाथ ३२, ठाणे ३२, उल्हासनगर ३०. मध्य महाराष्ट्र ः जामखेड ४७, पाथर्डी ४०, शेवगाव २२, इंदापूर ७१.२, बार्शी ३५, जेऊर ६०, माढा ७०.४, माळशिरस ५१, मोहोळ २०. मराठवाडा : आष्टी ४०, पाटोदा ४५, अहमदपूर ३३, चाकूर ५०, देवणी ८४, लातूर ३०, रेणापूर ४३, शिरूर अनंतपाळ ४०, अर्धापूर ५४, बिलोली ४०, देगलूर ४२, धर्माबाद ३०, कंधार ५३, मुखेड ४०, नांदेड ६७.४, भूम ४१, उस्मानाबाद ६७.४, परांडा ३०, वाशी ४०, पालम ५१, 
विदर्भ : आर्वी २८.२, वर्धा २६.५, नेर २०.२.

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...