Agriculture news in marathi Rain showers in the city; The sowing was sown | Agrowon

नगरमध्ये पावसाची दडी;  पेरण्या खोळंबल्या

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जून 2021

नगर जिल्ह्यामध्ये अजूनही पाऊस सुरू झाला नाही. सध्या जिल्ह्यामधील महत्त्वाच्या असलेल्या मुळा धरणात साडे एकतीस टक्के म्हणजे आठ टीएमसी तर भंडारदऱ्यात ४७ टक्के म्हणजे पाच टीएमसी पाणीसाठा आहे.

पुणे नगर : नगर जिल्ह्यामध्ये अजूनही पाऊस सुरू झाला नाही. सध्या जिल्ह्यामधील महत्त्वाच्या असलेल्या मुळा धरणात साडे एकतीस टक्के म्हणजे आठ टीएमसी तर भंडारदऱ्यात ४७ टक्के म्हणजे पाच टीएमसी पाणीसाठा आहे. जिल्ह्यामध्ये केवळ अकोल्याच्या पश्चिम भागात मात्र पाऊस सुरू आहे. गेल्या वर्षीच्या जून महिन्यापेक्षा यंदा धरणात अधिक पाणीसाठा आहे. 

नगर जिल्ह्यात यंदा पूर्वमोसमी पावसाने चांगली हजेरी लावली, मात्र मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर पावसाने दडी मारली. पाऊस नसल्याने पेरणी करायची राहिली आहे. कापसाची लागवडही करता येईना. सध्या फक्त अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी पट्ट्यातच पाऊस चालू आहे. मात्र तेथेही नेहमीच्या तुलनेत पावसाचा जोर कमी आहे.

आतापर्यंत पंधरा दिवसांत एकूण घाटघरला ३१६ मिलिमीटर, रतनवाडीला ३४६ मिलिमीटर, पांजरे येथे २९४ मिलिमीटर, भंडारदऱ्याला २४० मिलिमीटर, निळवंडे येथे १२२ मिलिमीटर, आढळा भागात ५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. 
जिल्ह्याच्या अन्य ठिकाणी यापेक्षा कमी पाऊस आहे. अकोल्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या पावसाने हरिचंद्रगडाच्या जवळ असलेला आंबीत प्रकल्प भरला असून, कळसूबाई शिखर पट्ट्यातील पावसामुळे भंडारदऱ्यातही पाणी येऊ लागले आहे. 

सध्या जिल्‍ह्यातील मुळा धरणात साडे एकतीस टक्के म्हणजे आठ टीएमसी तर भंडारदऱ्यात ४७ टक्के म्हणजे पाच टीएमसी, निळवंडेत सव्वा टीएमसी पाणीसाठा आहे. या शिवाय आढळा, भोजापूर, घाटशिळा, माणिकडोह, विसापूर, खैरी अन्य प्रकल्पात गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाणी आहे. यंदा पाऊस जोरात नसल्याने तसेच अकोल्यातही पावसाचा जोर कमी असल्याने धरणात गतीने  पाणीसाठा होत नसल्याचे जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अभियंता हरिचंद्र चकोर यांनी सांगितले.


इतर बातम्या
७२ तासांची सक्ती नको ः आयुक्तपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा...
पीकविमा योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून...
अखेर ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखलअमरावती : राज्य शासनाने केलेल्या करारानुसार इफ्को...
पळवाटांमुळे पीकविमा भरपाई दुरापास्तशेतकऱ्यांकडून पीकविम्याचा हप्ता भरतेवेळी...
अमरावतीतील २३ हजार हेक्टर शेती बाधित अमरावती : संततधार पावसाने जिल्ह्यातील ५०० गावे...
विमा कंपन्यांबाबत सरकारची बोटचेपी भूमिकापीकविमा योजनेमुळे शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्याच...
खामगाव बाजार समितीच्या  कारभाराविरुद्ध...बुलडाणा : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
केंद्र स्थापन करणार शेतकरी उत्पादक... नवी दिल्ली ः केंद्र सरकारने देशात सुमारे...
सांगलीत ४१ हजार हेक्टरवरील पिके...सांगली : गेल्या आठवड्यात झालेल्या पाऊस,...
धरणांतील पाण्याच्या विसर्गात घटपुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरू लागल्याने धरणांत...
पुण्यात पंचनामे गतीने सुरूपुणे : जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे करण्यास वेग...
परभणी ः मूग, उडदाच्या पीक स्पर्धेसाठी...परभणी ः कृषी विभागातर्फे खरीप हंगामापासून...
रत्नागिरी ‘झेडपी’चे  ८० कोटींचे नुकसान रत्नागिरी : अतिवृष्टीने चिपळूण, खेड, संगमेश्वरसह...
सांगोल्यातील रोगग्रस्त डाळिंब बागांची...सांगोला, जि. सोलापूर : वातावरणात होणारे बदल आणि...
पशुसंवर्धन विकासासाठी पशुपालक,...नाशिक : ‘‘आत्मनिर्भर भारत अंतर्गत २०२०-२१...
खानदेशात भिज पाऊसजळगाव : खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात हलका ते...
पशुचिकित्साकांच्या कामबंद  आंदोलनाचा...रिसोड, जि. वाशीम : पशुचिकित्सा व्यावसायिकांनी १६...
हिंगोलीत विमा कंपनीचा अनागोंदी कारभारहिंगोली ः जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना...
नाशिक विभागात मिळाल्या १६३१ भूमिहीनांना...नाशिक : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व...
नुकसानभरपाईपोटी मिळाले २७० रुपयेपाचोरा, जि. जळगाव : खडकदेवळा (ता. पाचोरा) येथील...