कापसाचा नवीन हंगाम (२०१९-२०) सुरू होऊन जवळपास दोन महिने संपायच्या बेतात आहेत, परंतु आज सु
ताज्या घडामोडी
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊस
सिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये मंगळवारी (ता. २१) मध्यरात्री अवकाळी पाऊस झाला. सह्याद्री पट्ट्यात तासभर मुसळधार, तर काही भागांत हलका पाऊस झाला. या पावसामुळे पूर्व पट्ट्यातील आंबा पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगावात वादळी वाऱ्यासह गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले.

गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मंगळवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे ऊन नसले तरी उष्मा जाणवत होता. दरम्यान, रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सह्याद्री पट्ट्यात विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरवात झाली. कणकवली तालुक्यातील फोंडा घाट, घोणसरी, वैभववाडी तालुक्यांतील कुर्ली, सडुरे, आर्चिणे लोरे, खांबाळे या भागांत सुमारे तासभर चांगला पाऊस झाला.
हा पाऊस पूर्व पट्ट्यातील आंबा हंगामाला नुकसानकारक ठरणार आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात या भागात आंबा शिल्लक आहे. पाऊस अधूनमधून पडल्यास त्यावर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी (ता. २२) सकाळपासूनदेखील जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. वातावरणातील उष्माही वाढल्याचे चित्र राहिले.
मिरज, तासगावात, वादळ वारा, गारांसह जोरदार पाऊस
मिरज पूर्व भागातील आरग, बेडग, शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी, लिंगणूर, खटाव भागांत तर तासगाव तालुक्यात मंगळवारी (ता. २१) रात्री सातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर मोडून पडली. आरग भागात एका ठिकाणी वीज कोसळली. जोऱ्याच्या वाऱ्यासह काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
विजेच्या कडकडाटासह मिरज पूर्व भागातील गावात पाऊस झाला. वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर मोडून पडली. ग्रामीण भागातील विद्युत वीजपुरवठा खंडित झाला.
द्राक्ष बागेचे नुकसान
तासगाव तालुक्यात द्राक्ष बागांना गारपिटीचा जबर तडाखा बसला. तालुक्यातील सावळज परिसरासह सुमारे ३ हजार एकर द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरड छाटणी झालेल्या वेलींना तयार काड्या झाल्या होत्या. त्यामुळे कोवळ्या पानांची पानझड झाली.
- 1 of 581
- ››