Agriculture News in Marathi Rain, sleet in town Seven hundred and fourteen sheep and goats died | Page 2 ||| Agrowon

पाऊस, गारठ्याने नगरमध्ये  सातशे चौदा शेळ्या-मेंढ्याचा मृत्यू 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 डिसेंबर 2021

नगर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण, गारठा, संततधार पावसाचा पशुपालकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात दोन दिवसांत सुमारे ७१४ शेळ्या-मेंढ्याचा मृत्यू झाला आहे.

नगर ः नगर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण, गारठा, संततधार पावसाचा पशुपालकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात दोन दिवसांत सुमारे ७१४ शेळ्या-मेंढ्याचा मृत्यू झाला आहे. सहा तालुक्यांतील ४६ गावांतील शेतकऱ्यांचे यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बाधित ठिकाणी पंचनामे आणि मृत्यू झालेल्या शेळ्या-मेंढ्याचे पशुसंवर्धन विभागाकडून शवविच्छेदन केले जात आहे. मेंढ्याच्या लोकरी काढल्याने गारठ्याचा सर्वाधिक फटका बसला असल्याचे पशुसंवर्धन विभागातून सांगण्यात आले. 

नगर जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. दोन दिवसांपासून वादळी वारा, पावसासह हवेत मोठ्या प्रमाणात गारठा आहे. पावसाळा संपल्यानंतर शेळ्या-मेढ्या घेऊन भटकंती करत पशुपालक गाव सोडतात. दोन दिवस झालेल्या या पावसाचा व गारठ्याचा पारनेर तालुक्यातील काही गावांना तडाखा बसला आहे. भटकंती करणाऱ्या शेळी-मेंढी पालकांचे यात मोठे नुकसान झाले आहे. नगर, कर्जत, संगमनेर, श्रीगोंदा, पारनेर, अकोले तालुक्यांतील ४६ गावांतील १०६ पशुपालकांचे नुकसान झाले असून, ७१४ शेळ्या-मेंढ्याचा मृत्यू झाला आहे.

सर्वाधिक फटका पारनेर तालुक्यातील रांधे, पाडळी आळे, पळवे, पोखरी, वारणवाडी, पठारवाडी, कुरुंद, म्हसोबाझाप, खडकवाडी, वनकुटे, चोंभूत, शिरापूर, कातळवेढा, पारनेर (तिरकळ मळा), पुणेवाडी, पारनेर (पुणेवाडी फाटा), पारनेर (सोबलेवाडी), किन्ही, कान्हूर पठार, कळमकरवाडी (पाडळी रांजणगाव), निघोज, पिंपरी, विळद (नगर), नांदुर खांदरमाळ आदी गावांत बसला आहे. पशुसंवर्धन विभागाने संबंधित ठिकाणी पाहणी करून मृत शेळ्या-मेंढ्याचे शवविच्छेदन केले. असल्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी सांगितले. 

पिकांच्या नुकसानीची माहिती नाही 
नगर जिल्ह्यात पावसाने पशुधनासोबत खरिपातील व रब्बीतील पिकांचेही नुकसान झाले. नगर, कर्जत, संगमनेर, श्रीगोंदा, पारनेर, अकोले तालुक्यात शेतपिकांना, भाजीपाल्याला मोठा फटका बसला आहे. नगरच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे नुकसानीबाबत मात्र माहिती नाही. कृषी विभागाने नुकसानीबाबत फारसे गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. 

तालुकानिहाय बाधित गावे (कंसात मृत शेळ्या-मेंढ्याची संख्या) 
कर्जत ः १ (१२), नगर ः १ (३४), श्रीगोंदा ः १ (७), अकोले ः १ (४), पारनेर ः १९ (५०९), संगमनेर ः २३ (४८). 

कोयता थांबला; हंगाम लांबला 

सिद्धटेक, जि. नगर : मागील दोन दिवसांपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाच्या संततधारेमुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. मोसम सापडलेला ऊसतोडणी हंगाम त्यामुळे सर्वाधिक प्रभावित झाला आहे. दिवाळीनंतर धारदारपणे सुरू झालेला कोयता अवकाळीमुळे थांबला. ऊसतोडणी कामगारांच्या कोप्यांवरील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. दरम्यान, भीमाकाठावरील आडसाली उसाची तोडणी पूर्णपणे थांबल्याने व शेते वाफसा स्थितीत येण्यास वेळ लागणार असल्याने, गळीत हंगामही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 

नगर जिल्ह्यातील अनेक भागात अनेक दिवसांपासूनच्या ढगाळ हवामानानंतर भीमा नदीपट्ट्यात गुरुवारी (ता. २) सायंकाळपासून वादळी वाऱ्यासह संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दिवाळीनंतर जोमाने सुरू झालेल्या गाळप हंगामाला ब्रेक लागला आहे. शिवाय, शेतातील कामे ठप्प झाली आहेत. ऊसवाहतूक करणारी अनेक वाहने शेतातच अडकून पडली आहेत. 
वाहतुकीसाठी तोडलेला ऊस शेतात तसाच पडून आहे. अनेक ठिकाणी सऱ्यांमध्ये पाणी साचले आहे. त्याचप्रमाणे ढगाळ हवामानामुळे इतर भाजीपाला पिके, कांदा, तसेच फूल उत्पादकांसमोर रोग व किडींचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान ठाकले आहे. दरम्यान, रिमझिम पाऊस व दाट धुक्यामुळे कांदा व इतर नगदी पिकांवर बुरशी, करप्यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. 

प्रतिक्रिया 
अवकाळी पावसाचा परिणाम गाळप हंगामावर नक्कीच होणार आहे. सध्या आडसाली उसाची तोडणी सुरू असून, पावसामुळे ती पूर्णपणे थांबली आहे. पावसाच्या उघडिपीनंतर दोन ते तीन दिवसांत तोडणी पुन्हा सुरू होईल. 
- सुरेश तावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, अंबालिका शुगर


इतर बातम्या
मेळघाटच्या स्ट्रॉबेरीची पर्यटकांना भुरळचिखलदरा, जि. अमरावती : महाबळेश्वरच्या धर्तीवर...
नागपूर जिल्ह्यात एक कोटी ६३ लाखांचा...नागपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने...
शेतजमिनीची कर्जे माफ करा;...कुरुंदवाड, जि. कोल्हापूर ः कर्मवीर दादासाहेब...
सांगली बाजार समितीला पुन्हा मिळाली...सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसह सात...
अकोल्याचा सर्वसाधारण योजना नियतव्यय २००...अकोलाः जिल्ह्याच्या २०२२-२३ च्या सर्वसाधारण...
जवान अन् किसान देशाचे आधारस्तंभ:छगन...नाशिक: सैनिक जसे देशाचे रक्षण करतात, तसेच...
नाशिक: श्रमदान, लोकसहभागातून तीन दुर्गम...नाशिक: जिल्ह्याच्या पश्चिम भागातील आदिवासी...
यावल/फैजपूर, जि.जळगाव : हवामानमापक...यावल/फैजपूर, जि.जळगाव : तालुक्यात डिसेंबरमध्ये...
मंगळवेढ्यात मका खरेदी केंद्र सुरु, ...सोलापूर ः मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ...
जळगाव ः बोगस पशुवैद्यकांची यादी...जळगाव ः जिल्ह्यात बोगस डॉक्टर, बोगस पॅथॅलॉजी लॅब...
Top 5 News: रशिया-युक्रेन संघर्षाचा...1. सध्या पंजाबपासून झारखंडपर्यंत हवेचा कमी दाबाचा...
मोहरीच्या वायदेवापसीची मागणी का होतेय?वायदेबंदीला विरोध वाढतो आहे. मोहरीचे वायदे पुन्हा...
देशाची मोहरी क्रांतीकडे वाटचालपुणेः खाद्यतेल आणि पेंडच्या दरातील तेजीमुळे...
उत्तर भारतात मोहरी,हरभऱ्याला अवकाळीचा...अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे उत्तर भारतातील...
रब्बी पेरणीत मक्याचे वर्चस्ववृत्तसेवा - चालू रब्बी हंगामात (Rabbi Season...
कृषी ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकारचे...  कृषी क्षेत्रातील ड्रोनच्या (drone )...
यंदाच्या हंगामात इथेनॉलचा पुरवठा...वृत्तसेवा - इंधनाच्या आयातीवरील (Fuel Import)...
मस्त्यव्यावसायिकांनी शास्त्रशुद्ध...मस्त्यव्यवसाय क्षेत्राने देशांतर्गत गरजा...
भारत ठरला काकडीचा सर्वात मोठा...पुणे - भारत जगात काकडीची (Cucumber) निर्यात (...
किमान तापमानात घट शक्य पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त...