agriculture news in marathi, Rain in Solapur; But less emphasis | Agrowon

सोलापुरात पाऊस; पण जोर कमी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 जून 2019

सोलापूर : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) रात्री झालेल्या किरकोळ पावसानंतर सोमवारी (ता. २४) सलग दुसऱ्या दिवशी सकाळीच मॉन्सूनने काही ठरावीक भागांत हजेरी लावली. प्रामुख्याने पंढरपूर, मोहोळ, माळशिरस तालुक्‍यांमध्ये पावसाला सुरवात झाली. पावसाने हजेरी लावली असली तरी त्यामध्ये फारसा जोर नव्हता. शिवाय तो सरसकट झाला नाही.  

सोलापूर : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) रात्री झालेल्या किरकोळ पावसानंतर सोमवारी (ता. २४) सलग दुसऱ्या दिवशी सकाळीच मॉन्सूनने काही ठरावीक भागांत हजेरी लावली. प्रामुख्याने पंढरपूर, मोहोळ, माळशिरस तालुक्‍यांमध्ये पावसाला सुरवात झाली. पावसाने हजेरी लावली असली तरी त्यामध्ये फारसा जोर नव्हता. शिवाय तो सरसकट झाला नाही.  

सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यातील ९१ मंडळांमध्ये सरासरी ८.४६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. गेल्या पंधरवड्यापासून पावसाची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे. पण पाऊस काही येत नाही. दोन दिवसांपूर्वीही काही ठरावीक भागांत हलकी हजेरी लावून पाऊस परतला; पण पुन्हा रविवारी वातावरण चांगले तयार झाले. सोमवारी मात्र पहाटेपासून प्रत्यक्षात त्याने सुरवात केली, पण त्यात फारसा जोर नव्हता. पंढरपूर, मोहोळ, माळशिरस या भागांत मात्र त्याने बऱ्यापैकी हजेरी लावली. पण अन्य भागाला मात्र नुसत्याच वाकुल्या दाखवल्या. 

पंढरपूर शहर आणि आसपासच्या गावातून सोमवारी पहाटे ५ नंतर रिमझिम पावसाला सुरवात झाली होती. ५ वाजल्यानंतर पावसाचा जोर काही प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. सकाळी ७ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतामध्ये पाणी साठले होते. उपरी, वाखरी, भाळवणी, तुंगत, मगरवाडी, इसबावी या भागांत पाऊस झाला. मोहोळ आणि माळशिरस, मंगळवेढ्याच्या काही भागांतही पावसाने हजेरी लावली. 

अन्य भागांत उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी या भागांत मात्र पहाटे केवळ रिपरिप होऊन तो थांबला. त्यात फारसा जोर नव्हता. सोमवारी दिवसभर कधी ढगाळ आणि कधी ऊन असे वातावरण राहिले. दुष्काळामुळे आधीच शेतकरी चिंतेत आहेत, पण पाऊस सातत्याने लांबत असल्याने त्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली होती. पण पावसाने उशिरा का होईना सुरवात केल्याने काहीसे समाधान व्यक्त होत आहे.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...