सिंधुदुर्गात काही ठिकाणी रिमझिम

rain in Some places in Sindhudurga
rain in Some places in Sindhudurga

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सोमवारी (ता. २) काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. सर्व जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळी वातावरण तयार झाले. अचानक बदललेल्या हवामानामुळे आंबा, काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे दोन दिवसांपासून थंडी गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान साडेआठ वाजण्याच्या सुमारास कणकवली, वैभववाडी, कुडाळ, सांवतवाडीतील काही भागात तुरळक पाऊस झाला. सह्याद्री पट्ट्यात इतर ठिकाणांपेक्षा अधिक पाऊस झाला. पावसानतंर जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे.

रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदारांची चिंता पुन्हा वाढली आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दोन दिवस होत नाहीत, तोपर्यंत पुन्हा अचानक वातावरण बदलल्यामुळे बागायतदारांच्या समस्येत वाढ झाली. सध्या काही बागांमध्ये मोहोरण्याची प्रकिया सुरू आहे. काही बागांना पालवी येत आहे.

ढगाळ वातावरणामुळे मोहोर आणि पालवीला कीड रोंगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. काजूप्रमाणे आंबा बागायतदारही चिंतेत आहेत. आवश्‍यक थंडीच नसल्यामुळे अनेक आंबा बागा अद्यापही मोहोरलेल्या नाहीत. त्यामुळे आंबा हंगाम आणखीच लांबणीवर पडणार आहे. अजूनही आंब्याला मोहोर नाही. डिसेंबर, जानेवारीत आंब्याला मोहोर आला, तर यावर्षीचा आंबा हंगाम शेतकऱ्यांना फारसा लाभदायक होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आतापासून चिंता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com