agriculture news in marathi, rain starts agin in akole taluka, nagar, maharashtra | Agrowon

अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात पाऊस सुरू

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

नगर   ः जिल्ह्यामधील अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात जोरदार पाऊस सुरू आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे निळवंडे धरण भरले आहे. या धरणातून ७५४० क्‍युसेक पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आले. मुळा नदीतूनही मुळा प्रकल्पात पाण्याची ४ हजार ७०५ क्‍युसेकने आवक सुरू आहे. जिल्ह्यातील काही भागात सोमवारी पावसाची रिपरिप सुरू होती.

नगर   ः जिल्ह्यामधील अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात जोरदार पाऊस सुरू आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे निळवंडे धरण भरले आहे. या धरणातून ७५४० क्‍युसेक पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आले. मुळा नदीतूनही मुळा प्रकल्पात पाण्याची ४ हजार ७०५ क्‍युसेकने आवक सुरू आहे. जिल्ह्यातील काही भागात सोमवारी पावसाची रिपरिप सुरू होती.

जिल्ह्यात यंदा अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. अकोले तालुक्‍यात मात्र अधून-मधून सातत्याने पाऊस सुरू आहे. त्यामुळे उत्तर भागाला काही प्रमाणात दिलासा मिळाला. अकोल्याच्या पश्‍चिम भागात होत असलेल्या पावसामुळे यंदाही दरवर्षीप्रमाणे भंडारदरा धरण १५ ऑगस्टपूर्वीच भरल्याचे जाहीर केले. मुळात हे धरण यंदा दरवर्षीपेक्षा पंधरा दिवस आधीच भरले.

दोन दिवसांपासून पुन्हा भंडारदरा, रतनवाडी, कळसुबाई परिसरात पावसाने जोर धरल्यामुळे ९.३० टीएमसी क्षमतेचे निळंवडे धरण रविवारी उशिरा भरल्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले. जिल्ह्याच्या अन्य भागात पाऊस नसला तरी अकोल्यात पडत असलेल्या पावसामुळे मुळा धरणातही पाण्याची अावक होत आहे. २६ टीएमसी क्षमतेच्या मुळा मुळा धरणात आतापर्यंत १७.८८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यामध्ये मूर पाऊस झाला. खरिपातील काही पिकांना यामुळे दिलासा मिळाला.

त्यानंतर दोन दिवस उघडीप दिलेल्या पावसाने सोमवारी पुन्हा काही भागात हजेरी लावली. जोरदार नसला तरी पावसाची रिपरिप दुपारनंतर सुरू होती. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत ५४.७४ टक्के पाऊस झाला आहे. अजूनही नेवासा, नगर, पाथर्डी, पारनेर, कर्जत, श्रीगोंदा या तालुक्‍यात ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस झालेला नाही. सोमवारी सकाळपर्यंत झालेला पाऊस (मिमी) ः घाटघर ४१, रतनवाडी ३७, पांजरे ३५, वाकी १८, निळवंडे ३, भंडारदरा  २९ .


इतर ताज्या घडामोडी
कापूस उत्पादकांचे शोषण थांबवा: विजय...नागपूर: देशात कापसाचे दर कमी होत असतानाच...
फवारणीनंतर १८ एकरातील कपाशीने टाकल्या...अकोला ः जिल्ह्यातील म्हातोडी येथील शेतकऱ्याने...
खडसेंच्या पक्षांतराने बदलणार राजकीय...जळगाव ः भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे...
मक्याची लॉट एंट्री न झाल्याने ‘शोले...सटाणा, जि. नाशिक: हमीभावाने खरेदी केलेल्या...
परभणी जिल्ह्यात महावितरणची ६३७...परभणी :  जिल्ह्यातील वीजचोरीला आळा...
ला निनामुळे मान्सून प्रभावितलॉकडाऊनची परिस्थिती पाहता, महाराष्ट्रात...
तंत्रज्ञान हरभरा लागवडीचे...जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पीक...
शेतमालाची निर्यात वाढविण्यासाठी काम...नाशिक : ``सेंद्रिय कृषी उत्पादन कसे वाढेल....
पिकांच्या वाढीसाठी द्या शिफारशीत...प्रत्येक अन्नद्रव्याचे पिकांच्या शरीरात विशिष्ट...
परभणीत ६५३ शेतीशाळांद्वारे बांधावर...परभणी : ‘‘कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
सांगलीतील १५ साखर कारखान्यांची धुराडी...सांगली : कोरोना संकटाची तीव्रता कमी होत असतानाच...
सिंधुदुर्गाला पुन्हा पावसाने झोडपलेसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या बहुतांश भागात बुधवारी (...
पुणे विभागात अडीच लाख हेक्टरवर पिकांना...पुणे ः पिके काढणीच्या अवस्थेत असताना परतीच्या...
मका, ज्वारी, बाजरीची १ नोव्हेंबरपासून...जळगाव ः जिल्ह्यात शासकीय बाजरी, मका व ज्वारीची...
अकोल्यातील चराई क्षेत्रावरील...अकोला ः ग्रामीण भागात प्रत्येक गावातील गुरांना...
अमरावती जिल्ह्यात ६२ टक्के पीककर्ज वाटपअमरावती : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सोलापूर जिल्ह्यात सरसकट भरपाई द्या,...सोलापूर ः ‘‘गेल्या आठवड्यात  दक्षिण...
नवरात्रीमुळे फुलांच्या दरात वाढपुणे ः नवरात्रीनिमित्त फुलांना वाढलेली मागणी...
शिरापूर बंधाऱ्यावर स्वयंचलित दारांचे...सोलापूर ः उत्तर सोलापूर तालुक्यातील शिरापूर...
खानदेशात पावसाची हजेरी, पिकांना फटकाजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. २१) दुपारी व...