agriculture news in Marathi, rain in state, Maharashtra | Agrowon

राज्यात सर्वदूर पाऊस

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

पुणे ः राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (ता. १६) अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली येथे सर्वाधिक २८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारपर्यंत (ता. २०) उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.  

पुणे ः राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (ता. १६) अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली येथे सर्वाधिक २८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारपर्यंत (ता. २०) उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.  

राज्यात गुरुवारी सकाळपासूनच पावसाला सुरवात झाली. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांतील काही भागात सकाळी हलक्या सरी बरसल्या. पूर्व विदर्भातील अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पश्चिम विदर्भातील काही भागात हलक्या सरी, तर अनेक भागात ढगाळ हवामान होते. मध्य महाराष्ट्रातील नगरमधील अकोले, नाशिकमधील इगतपुरी, पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, साताऱ्यातील महाबळेश्वर, कोल्हापुरातील काही भागात हलका पाऊस पडला. कोकणातही पावसाच्या सरी बरसत होत्या.  

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर जिल्ह्यातील बहुतांशी भागात पाऊस झाला. अंबोली येथे सर्वाधिक  २४८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तसेच घाटमाध्यावरही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे भात पिकांना दिलासा मिळाला असून पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

खान्देशातील धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांतील काही भागात हलका पाऊस पडला असून अनेक भागात ढगाळ हवामान होते. महाबळेश्वर येथे १४०. ८ मिलिमीटर तर लामज येथे १२२ मिलिमीटर पाऊस पडला. दुष्काळी असलेल्या सोलापूर जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. कोल्हापुरातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.

मराठवाड्यात दमदार
अडीच महिने पावसाचा खंड असलेल्या बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेली लावली. उस्मानाबादमधील मंगळूर येथे सर्वाधिक १५० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर तुळजापूर ६७, सालगारा ६२, सावरगाव ९७, इतकल १२५ मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे खरिपातील पिकांना चांगलाच दिलासा मिळाला. गुरुवारी सकाळपासून मराठवाड्यात पावसाला सुरवात झाली होती.   

विदर्भात सर्वदूर पाऊस हजेरी
विदर्भातील परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील अनेक भागात सर्वदूर पाऊस पडला. विदर्भाच्या पूर्व भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून घरांचीही पडझड झाली आहे. गडचिरोलीतील पेरमिली येथे सर्वाधिक पाऊस पडला. त्यापाठोपाठ आहेरी येथे २४६, जिमलगट्टा २२८, अल्लापाल्ली २२०, सिरोंचा ११९, बामणी १०७, मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहे.

राज्यात गुरुवारी (ता. १६) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस ः मिलिमीटरमध्ये 
कोकण विभाग ः  नयाहडी ३६, करनाळा ३९, चौक ३९, महाड ३४, बिरवडी ४६, करंजवडी ४१, नाटे ३९, खारवली ४०, तुडली ३१, कोंडवी ३१, मरगतम्हाणे ३६,  रामपूर ३०, शिरगांव ४६, खेड ३०, शिरशी ३६, कुलवंडी ३२, धामनंद ४८, अबलोली ५०, मंडणगड ३२, देव्हरे ३४, टरवल ४३, अंगवली ४०, कोडगाव ३२, देवरुख ३४, तुलसानी ४९, माभले ३२, सवंडल ४३, भांबेड ३७, शिरगाव ५८, पाटगाव ५२, बापरडे ५५, मासुरी ३३, श्रावण ४५, सावंतवाडी ३८, आजगाव ३२, अंबोली २४८, कनकवली ६३, फोंडा ५२.८, सांगवे ८२, नांदगाव ५७, तालेरे ४२, वागडे ६५, कसाल ५०, मानगाव ४४, वैभववाडी ३२, भुइबावडा ४०, भेडशी ५८ तलवड ३३.

मध्य महाराष्ट्र ः इगतपुरी ३४, जामखेड ३०, खर्डा ६१ नाणज ३७, नायगाव २९, मुठे ४६, निगुडघर ३०, काले ३४, कार्ला ३८, लोणावळा ७८, राजूर ६९, आपटाळे ४८, शेळगी ३०,  सोलापूर ५५.९, होटगी ३६, बार्शी ६०, वैराग ६१, उपळाई ३५, गौडगाव ५८, पांगरी ५४, पानगाव ५६, नारी ५७, सुर्डी ५६, खांडवी ४७, अक्कलकोट ३५, दुधनी ४१, वागदरी ३८, किणी ३०, सावळेश्‍वर ३५, हेळवाक ६१, मरळी ३३, महाबळेश्‍वर १४०.८, तापोळा ९८, लामज १२२,करंजफेन ६६, आंबा ८१, राधानगरी ४०, गगनबावडा ४५, साळवण ४४, गवसे ४०, चंदगड ६२, हेरे ५९.

मराठवाडा ः मंथा ३८, ढोकसळ३३, पांगरी ३०, म्हाळसजावळा ३९, पिंपळनेर ३०, चौसाळा ३४, नेकनूर ४६, लिंबागणेश ३९, पाटोदा ३३, दसखेड ४५, अमळनेर ३९, जातेगाव ३१, केज ४२, युसूफ ३७, हनुमंत ३६, होळ ३७, विडा ३४, बनसारोळा ३०, नागापूर ४०, धारूर ३२, मुरूड ५७, लामजना ३७, भादा ३७, किल्लारी ३६, हडोळती ३१, कासार बालकुंड ३२, मदनसुरी ४१, कासारशिर्सी ५१, नागलगाव ४०, वाढवणा ३८, नळगिर ५२, पोहरगाव ३२, जळकोट ५०, घोणशी ६२, उस्मानाबाद शहर ५७, उस्मानाबाद ग्रामीण ३५, बेंबळी ३५, पडोली ६३, कासेगाव ५०, तेर ४६, तुळजापूर ६७, सालगारा ६२, सावरगाव ९७, मंगरूळ १५०, इतकल १२५, जळकोट ४५, नळदुर्ग ८ जवळा ४३, आंभी ३४, माणकेश्‍वर ५५, भूम ६७, लेत ४३, कळंब ४, इतकूर ३३, येरमाळा ४६, मोहा ४०, शिरढोण ४५, गोविंदपूर ४५, उमरगा ४१, डाळिंब ८१, नारंगवाडी ४२, मुरूम ४६, लोहारा ६०, माकणी ४५, जेवळी ६२, वाशी ३३, पारगाव ३२, तेरखडा ४२, सगरोळी ३२, मुक्रमाबाद ४१, माळाकोळी ४७, हदगाव ४२, तळणी ३३, निवघा ३८, तामसा ३९, पिंपरखेड ३९, आष्टी ६१, भोकर ३०, मोघाळी ३०, मातूळ ८०, किनी ६१, किनवट ६७, बोधडी ४२, इस्लापूर ५२, जलधारा ३४, शिवणी ३५, मांडवी ७१, दहेली ५४, हिमायतनगर ५८, जवळगाव ७०, सरसम ७८, माहूर ७२, वानोळा ५६, वाई ६१, सिंदखेड ५९, धर्माबाद ३७, गोळेगाव ३०, सिंधी ४३.

विदर्भ ः सांगवी म्हाळसा ५९, हियातनगर ५६,  औंढा ६२, येहळेगाव (तूकाराम) ५६, साखरा ६०,  हत्ता ४०, वाकद ५८, कळगाव ५५, तूप ५०, अंजनखेड ५१, माणिकवाडा ५१, पुसद ५६, उमरखेड ५८, महागाव ६७, गुंज ५८, कळी ५३, वणी १०५, राजूर ५६, शिंदोळा ५३, बोटोनी ५०, मुकुटबन ५५, घाटंजी ५३, पारवा ५५, आमदी ५३, खाट ५३.६, धानळा ५२.८, कोडामेंडी ५३.८, उमरेड ७१.२, बेला ५६.२, भिवापूर ६०, कारेगाव ७१, मोहाडी ९८, वार्थी ५७, केंद्री ६८, कान्हाळगाव ८५, आंधळगाव ७०, तुमसर ६९, मिटेवणी ६२, अड्याळ ६५, कोंढा ५६, पवनी ८९, चिंचळ ८०, असगाव ६७, आमगाव ५० साकोली ६४, आकोडी ६६, सांगडी ५२, लाखंदूर ११४, बारव्हा १२५, मासाळ ९९, लाखनी ८०, पोहारा ७४, पालंदूर ५६, पिंपळगाव ५७, रत्नारा ७१,  रावणवाडी ७३, गोंदिया ५८, खामरी ५८, कामठा ७०, काट्टीपूर ७३, तिरोडा ६८ , देवरी ९६, चिंचगड ५६, बोधगाव देवी ७७, अर्जुनी ८४, महागाव ७६, केशोरी ६५, सौदाद ९०, दारव्हा ७०, सडक अर्जुनी १२९, घुगस ५८, मूल ७०, बेंबळ ५०, वरोरा ६६, भद्रावती ११७, नांदोरी ७५, मुधोळी ५०, मांगळी ६५, धोडपेठ ७३, चिमूर ७४,  बह्मपूरी ९७, अन्हेर ७२, मेंढा ६९, मिढाळा ७५, नावरगाव ७०, शिंदेवाही ६६, मोहाली ५८, कोपर्णा १०८, गडचांदूर ८०, सावळी ६०, पाथरी ६०, विहाड ६०, बल्लारपूर ८०, जेवती ५९, पाटण ६४, गडचिरोली ५०, ब्राह्मणी ९०, पिसेवढथा ५६, वैरागड ६०, चामोर्शी ९१, कुंघाडा ६७, आष्टी ९०, येनापूर ६१, सिरोंचा ११९, बामणी १०७, आहेरी २४६, जिमलगट्टा २२८, अल्लापाल्ली २२०, पेरमिली २८६,  जरवंडी ५०, मुरूमगाव ७३, चाटेगाव ५३, पेंढरी ६८, देसाईगंज ६४, वडसा ६६, शंकरपूर ७६, मुलचेरा ७६, भामरागड १३०.


इतर अॅग्रो विशेष
संसर्गाचे थैमान, महाराष्ट्र, तामिळनाडू...नवी दिल्ली : जगातील अन्य देशांसोबतच भारतातही...
सहकारी क्षेत्रातील दुग्ध उद्योगांसमोर...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
दूध रूपांतर योजनेचे १०० कोटी थकले पुणे: राज्यातील अतिरिक्त दुधाचे खरेदी करून भुकटी...
मॉन्सूनसाठी तयार होतेय पोषकस्थिती...पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात उन्हाच्या झळा असह्य पुणे: सुर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा चटका...
नियमित कर्जदारांना द्या ५० हजाराचे...गोंदिया ः कोरोनामुळे प्रभावीत शेतीक्षेत्राला...
शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा...मुंबईः राज्यात  ५० हजार उद्योग सुरु झाले....
कापसाचा हमीभाव २६० रुपयांनी वाढवा :...नवी दिल्लीः कापसाच्या हमीभावात गेल्या वर्षीच्या...
भेसळयुक्‍त धान बियाणे पुरविणाऱ्या...भंडारा  ः गेल्या हंगामात भेसळयुक्‍त...
जालन्यातील मोसंबी उत्पादकांना लॉकडाऊनचा...अंबड, जि. जालना : कोरोना संकट काळातील लॉकडाऊनचा...
विदर्भात उष्ण लाट पुणे : राज्यात उष्ण व कोरडे हवामान असल्याने...
थकबाकीदारांना पीककर्जाचा मार्ग मोकळा;...मुंबई: खरीपाच्या तोंडावर थकबाकीदार...
कृषी उद्योगांसाठी अजूनही चीन हाच...पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर...
व्यवसाय सांभाळून शेतीमध्ये वाढविली...खासगी नोकरी सोडून आपला पेपर प्रॉडक्‍ट, प्लॅस्टीक...
दर्जेदार पेरू, सीताफळाच्या उत्पादनावर भरमाझ्याकडे पेरू आणि सीताफळाची लागवड आहे. पेरूच्या...
भारत-पाकिस्तानात जूनमध्ये टोळधाडीचे...संयुक्त राष्ट्रसंघ: टोळधाडीने पिकांचे मोठ्या...
गावोगावी फिरून विकली पंधरा टन द्राक्ष कोरोनामुळे बाजार समित्या बंद झाल्या, व्यापारीही...
राज्यातील बीज प्रक्रिया केंद्रांची कामे...पुणे: राज्यात नव्याने उभारली जाणारी बीज प्रक्रिया...