agriculture news in Marathi, rain in state, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यात मध्यम ते हलक्या सरी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 जून 2019

पुणे ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या अनेक भागांत पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी पडल्या. पूर्व विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतील अनेक भागांत पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत होत्या. उर्वरित जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची खरिपात पेरणी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. कोकणात भात रोपवाटिकेची कामे वेगाने सुरू असून, काही ठिकाणी रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. रत्नागिरी येथे सर्वाधिक ९०.८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. 

पुणे ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या अनेक भागांत पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी पडल्या. पूर्व विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतील अनेक भागांत पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत होत्या. उर्वरित जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची खरिपात पेरणी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. कोकणात भात रोपवाटिकेची कामे वेगाने सुरू असून, काही ठिकाणी रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. रत्नागिरी येथे सर्वाधिक ९०.८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. 

राज्यातील अनेक भागांत मॉन्सूनची गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा लागून राहिली होती. सोमवारी (ता. २४) व मंगळवारी (ता. २५) दिवसभर या भागांत ढगाळ हवामान होते. मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातही हवामान अंशतः ढगाळ होते. मात्र, मॉन्सून राज्याच्या अनेक भागांत जवळपास दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या जिल्ह्यांतील अनेक भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. हा पाऊस भात शेतीसाठी पोषक असल्याने भात रोपे चांगलीच तरारली आहेत.

मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नगर, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर तसेच खान्देशातही हवामान ढगाळ होते. सोमवारी दुपारनंतर या भागांतील अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडल्या. तर धुळे जिल्ह्यातील जवखेडे येथे सर्वाधिक ७५.३ मिलिमीटर पाऊस पडला, तर सांगलीतील मलकापूर येथे ६६ मिलिमीटर पाऊस पडला. सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर, खान्देशातील धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांतील अनेक भागांतही पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे खरीप पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. मराठवाड्यातही औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला, तर जालना, बीड, लातूर, उस्नानाबाद, नांदेड जिल्ह्यांतील अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली.

लातूरमधील पोहरगाव येथे ६४.८ मिलिमीटरची सर्वाधिक पावसाची नोंद झाली. जालनामधील तीर्थपुरी, उस्मानाबादमधील जागजी, परभणीतील माखणी या ठिकाणीही जोरदार पाऊस पडला. विदर्भातील अमरावती, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांतही पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे या भागांत कपाशी लागवडीची तयारी सुरू झाली असून खरिपातील तूर, मूग, उडीद, सोयाबीन या पिकांच्या पेरणीसाठी धावपळ सुरू झाली आहे. पूर्व पट्ट्यातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला.

तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता 
मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने पुढील दोन ते तीन दिवस राज्यात हवामान ढगाळ राहणार आहे. आज (ता. २६) कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील. तर गुरुवार ते शनिवार या दरम्यान कोकणात मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाची सरी पडणार असून अधूनमधून ऊन सावल्याचा खेळ सुरू राहील, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

कोकण ः ठाणे ४६, दहिसर २५.३, ठाकुरली ३७, शहापूर २९.३, किनहवळी ३९.३, गोरेगाव ३६.५, महाड २९, कोलाड २४, पोलादपूर २०, कोंडवी ६७, वाकण २२.५, दाभोळ २४.५, आंजर्ले ६६.८, वाकवली २८.३, वेळवी २२.५, मंडणगड ४१.५, जयगड ३४.८, फणसवणे २६.३, कोंडगाव ६१.८, देवळे ५७, देवरुख ९०.८, लांजा २४.८, भांबेड ४८.३, विलवडे ३५, शिरगाव ३३.५, पाटगाव ५६.५, बापरडे २५.३, तालेरे २७, वाडा ४७.५, कोणे ३२.५, बोयसर ३४.८, विक्रमगड ७३.५, तलवड २५.५.
मध्य महाराष्ट्र ः मालेगाव ५२.३, नांदगाव ४९.५, ताकेत २५, त्रिंबकेश्‍वर ३२.८, दुसाणे ३२.५, निजामपूर २४.५, ब्राह्मणवेल ३०, कुडाशी २८.३, उमरपट्टा २४, दहिवेल २५.५, बोराडी ६१.३, अर्थे ५५.३, जवखेडे ७५.३, सांगवी ३७, रनाळा ४३.३, शनिमांडळ ४७.३, सारंगखेडा २३.३, वडाळी ४७.५, श्रीगोंदा ४६.५, काष्टी ३३.५, बेलवंडी ३०.५, चिंभळा ४७.५, कोळेगाव ३१.८, संगमनेर ३८, धांदरफळ २१.३, तळेगाव ३२.५, समनापूर २३.३, घारगाव ५०, डोळासणे ३३.३, साकूर २५.५, पिंपरणे २७, श्रीरामपूर २१.३, उंदीरगाव २७, कोथरूड ४२.८, भोलावडे २५.५, संगमनेर ४६.८, विंझर २०.८, अंबावणे ४७.८, वडगाव आनंद ३६.८, कळंब ५२.३, रांजणगाव ४५.८, निमगाव ५०.५, कुंभारवळण २१.३, वाल्हा ५८.५, वडाळा २०, सोलापूर २४, वळसंग २२.३, पांगरी ३९.५, टाकळी २७.३, सावळेश्‍वर २९.५, भंडीशेगाव ३३.५, भाळवणी ४६.५, पुळूज २८, चळे५७.८, तुंगत २१.५, कासेगाव २६.३, इस्लामपूर ३५.८, सदाशिवनगर २८.८, सातारा ४०, वर्ये ४१.५, तासगाव २५, कराड ४९, सुपने ४२, सैदापूर ३०.३, मलकापूर ६६, शिरंबे ४७, किन्हई ३०.५, मायणी ५२.८, निमसोड ३७, होळ ५६, वाठार-नि ६०.३, संख ३४.३, कवठेमहांकाळ २९.५, हिंगणगाव ३६.३, शाळगाव २९.३
मराठवाडा ः पांचवडगाव १९.८, घनसांगवी २४.३, तीर्थपुरी ५७.५, शिरूर कासार १८, हारंगूळ २४, मुरूड ५४.३, किनगाव ४२.५, पोहरगाव ६४.८, पानगाव २९, कारेपूर २३.५, जळकोट ५०, घोणशी २२.५, जागजी ६०, गोविंदपूर २४.५, तरोडा ३०.८, कुंडलवाडी २९.३, जांब ३३, निवघा २२.८, मालेगाव २५.८, माखणी ५५.३, कांतेश्‍वर ३४.८.
विदर्भ ः कळमनुरी ३७.५, आंबा ४२, हट्टा ५५.३, पानकनेरगाव ३६.३, कवठळ २२.३, बीबी ३६.५, आसेगाव १९.३.

इतर अॅग्रो विशेष
मका उत्पादकांना १५०० कोटींचा थेट फटकाअकोला : राज्यात ऑक्टोबरमधील परतीच्या पावसाने...
भिजलेल्या कापसाचे दर निम्म्यावरनगर ः मोठ्या संकटातून वाचलेला कापूस यंदा पावसाने...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे (प्रतिनिधी) ः गेल्या दोन दिवसांपासून...
पीएम-किसानच्या पोर्टलवर दीपकचा झाला ‘...नांदुरा, जि. बुलडाणा ः शेतकऱ्यांना सध्या सर्वच...
सुरळीच्या अनुप यांनी जपली प्रयोगशीलता...अमरावती जिल्ह्यातील सुरळी (ता. चांदूरबाजार) येथील...
फळबागा केंद्रीत कोरडवाहू शेतीचा साधला...परभणी जिल्ह्यातील उजळंबा येथील प्रगतिशील शेतकरी...
सांगली : द्राक्षच्या उत्पादन खर्चातच...सांगली : चार वर्षांपासून जिल्ह्यात...
कलेढोणात अतिपावसामुळे द्राक्षबागांवर...कलेढोण, जि. सातारा : अतिपावसामुळे खटाव...
देशाची सामाजिक उद्योजकता दुर्लक्षित;...पुणे : देशातील अनेक तरुण-तरुणींना शेती...
कार्तिकीचा आज मुख्य सोहळासोलापूर ः कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी...
पंचनाम्यासाठी २० लाख विमाधारकांचे...पुणे: राज्यात अतिपावसानंतर आत्तापर्यंत २० लाख...
‘महा’ चक्रीवादळ निवळले; बुलबुलची...पुणे : ‘महा’ चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने येताना...
रब्बी विम्यासाठी दहा जिल्हे रखडणारपुणे (प्रतिनिधी) : ऑक्टोबरमधील चांगल्या...
कसमादे पट्ट्यात रुजतेय गुजरातचे देशी...गुजरात राज्यात ‘देशी रवय्या’ म्हणून प्रसिध्द...
कापसाचे ४५ टक्के क्षेत्रावर मोठे नुकसाननागपूर : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे खरिपात...
मुल्ला यांच्या शेतात पिकतो वर्षभर...वर्षभर मागणी असलेल्या, कमी जोखीम व देखभाल...
ग्रेटाचा सवाल : तुमची हिंमत तरी कशी...गत वर्ष दीड वर्षाच्या अल्प काळात स्वीडनच्या...
पीकविम्याकडून ‘द्राक्ष कोंडी’; मोठे...पुणे : हवामान आधारित पीकविम्यात द्राक्षाकरिता...
आता मदार रब्बीवरबऱ्याच दिवसांनंतर हवामान विभागाकडून एक सुखद अंदाज...
शेळी-मेंढी विकासात ‘नारी’च अग्रेसरउपासनी समितीस आढळून आले, की ऑक्टोबर २०००   ...